तो म्हणाला, नवरा आहे का घरात, नाही म्हणताच घरात घुसला, मित्राच्या बायकोवर बळजबरी करण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                   संगमनेर तालुक्यातील वडझरी परिसरातील 21 वर्षीय महिला घरकाम करत असताना जवळचा व्यक्ती पाणी पिण्यासाठी घरी आला. मिस्टर घरी आहे का? असे विचारले असता पिडीत महिला नाही. म्हणताच तिला घरी एकटी पाहुन याची नियत फिरली. तो पिडीत महिलेला बळजबरीने नको तिथे हात लावुन नाजुक संबंध करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक रविवार दि.7 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास पीडिताच्या घरामध्ये घडली. हा प्रकार घडताच पिडीतीने  सर्व घटना आपल्या पतीला सांगितली. त्यानंतर थेट संगमनेर तालुका पोलीस ठाणे गाठवुन 21 वर्षीय पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सचिन संजय राऊत (रा. वडझरी, ता. संगमनेर) याच्या विरुद्ध विनयभंगासह गंभीर कलमान्वये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.

            याबाबत सविस्तर माहिती अशी की, 21 वर्षीय पिडीत महिला ही वडझरी परिसरात राहते. त्यांना एक मुलगा आहे. पती कामानिमित्त घरातुन बाहेर जात असल्याने घरातील सर्व काम पिडीत महिलेला करावे लागते. आरोपी सचिन राऊत हा देखील याच परिसरात राहत असल्याने त्याचे पिडीत महिलेच्या घरी येणे जाणे होते. तो एक व्यक्ती म्हणुन या पिडीत महिलेवर वाईट नजर ठेवत होता. वेळोवेळी पिडीत महिलेला परिसरात पाहत असल्याने या आरोपी सचिनची नियत या 21 वर्षीय महिलेवर फिरली. मात्र, एक जवळचा विश्वासु व्यक्ती म्हणुन त्याच्यावर कोणी काही शंका घेतली नाही. पण सर्वांना अंधारात ठेऊन तो नजर ठेवत होता.

           दरम्यान, रविवार दि.7 सप्टेंबरला पती घरी नसताना आरोपी सचिन हा दुपारी 2:30 वाजण्याच्या दरम्यान पिडीत महिलेच्या घरी आला. पिडीत महिला व दिडवर्षांचा मुलगा दोघेच घरी होते. तेथे आरोपी सचिन हा आला व पिडीत 21 वर्षीय महिलेला म्हणाला की, तुमचे मिस्टर कोठे गेले आहे. तेव्हा पिडीत महिला म्हणाली की, ते कामावर गेले आहे. त्यानंतर आरोपी सचिन हा पिडीत महिलेला म्हणाला की, मला पाणी प्यायचे आहे. पिडीत महिलेने एक ग्लास सचिनला पाणी दिले. त्याने पाण्याचा ग्लास बाजूला ठेवून दिला. त्यानंतर आरोपी सचिन याच्यातील हैवान जागा झाला. तो घरात नको ते चाळे करू लागला. पिडीत महिलेला सोप्यावर लोटून लगट करून बळजबरीने महिलेच्या इच्छेविरुद्ध नाजुक संबंध करण्याचा प्रयत्न करू लागला. आरोपी सचिन यातील वासनांध राक्षस पाहुन पिडीत महिला आरडा ओरडा करून प्रतिकार करू लागली.

      दरम्यान,आरडा ओरडा एकुण पिडीत महिलेचे नातेवाईक घरात पळत आले. त्यानंतर आरोपी सचिन याने तेथुन धुम ठोकली. त्यानंतर पिडीत महिलेचे पती कामावरून घरी आले. घरी येताच घडलेली सर्व घटना सांगितली. त्यानंतर पतीची तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी आरोपी पाठीशी न घालता तक्रार देण्यासाठी तालुका पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर पिडीत 21 वर्षीय महिलेने घडलेली सर्व कैफियत पोलिसांना सांगितली. पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून  आरोपी सचिन संजय राऊत (रा. वडझरी, ता. संगमनेर) याच्यावर विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.