इयत्ता १० वीची विद्यार्थीनी चार महिन्यांची गरोदर.! नराधमास ठोकल्या बेड्या.! नात्याने केला घात.!
सार्वभौम (राजूर) :-
अकोले तालुक्यातील साकीरवाडी परिसरात इयत्ता १० वीच्या वर्गात शिकणारी अल्पवयीन विद्यार्थीनी चार महिन्याची गरोदर असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या विद्यार्थीनीचे पोट दुखू लागल्याने तिला सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर हा प्रकार लक्षात आला. ही घटना एप्रिल २०२३ या दरम्यान घडली असून अगदी नात्याला काळीमा फासावा अशी असे. यात पोलिसांनी चौकशी केली असता यात किसन नामदेव भांगरे (रा. साकीरवाडी, ता. अकोले, जि. अ.नगर) हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांनी आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, पीडित विद्यार्थीनी ही अकोल्यातील एका कॉलेजमध्ये इयत्ता १० वीचे शिक्षण घेत आहे. दि. ४ जुलै २०२३ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास तिचे पोट दुखत होते. त्यापुर्वी देखील दुखत होते मात्र, तिला आपण गर्भवती असल्याचा कोणताही संशय आला नाही. त्यामुळे, तिने काही वेदनाशामक गोळ्या घेतल्या आणि आराम केला. मात्र, त्याचा काही एक फायदा झाला नाही. उलट तिचे पोट अधिक दुखत राहिले. वय कमी असल्यामुळे आणि घडलेला प्रकार कोणाला सांगता येत नसल्याने तिने ज्या काही वेदना होत होत्या त्या निमुटपणे सहन केल्या.
दरम्यान, वेदना असहाय्य झाल्यामुळे तिने याबाबत आपल्या आई व चुलत्यास कल्पना दिली. त्यानंतर त्यांनी मुुलीस थेट नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जेव्हा डॉक्टारांनी तपासणी केली तेव्हा समजले की, विद्यार्थीनी ही चार महिन्यांची गरोदर आहे. डॉक्टरांनी दिलेला संदेश हा आईसाठी प्रचंड धक्कादायक होता. आपल्या मुलीच्या अज्ञानपणाचा कोणीतरी गैरफायदा घेतला आहे हे तिच्या लक्षात आले. मात्र, कोणी? याचे उत्तर तिने थेट मुलीस विचारले. मात्र, आईच्या भितीपोटी तिने घडला प्रकार सांगणे टाळले. काही झालं तरी याचा शोध लागणे गरजेचे होते. त्यामुळे, काही व्यक्तींनी मुलीचे समुपदेशन केले आणि तिने जो काही प्रकार सांगितला तो प्रचंड धक्कादायक होता.
पीडित मुलगी म्हणली की, एप्रिल २०२३ रोजी माझे आई वडिल हे शेतात गेले होते. तर घरातील बहिनी आणि अन्य व्यक्ती देखील बाहेर गेले होते. तेव्हा आरोपी किसन भांगरे हा घरात आला होता. त्याने घरात कोणी नसल्याचा फायदा घेतला आणि प्रेमाचे नाटक करुन पीडित तरुणीस स्वयंपाक घरात ओढत नेले. माझे तुझ्यावर प्रेम आहे आपण लग्न करु असे फालतु बोलून तिच्यावर बळजबरी अत्याचार केला. त्यानंतर हा प्रकार येथेच थांबला नाही. तर भांगरे याने पीडितेवर अनेकदा अत्याचार केले आणि निघुन गेला. त्यानंतर मुलगी शाळेत आली असता तिला चार महिन्यानंतर त्रास होऊ लागला आणि त्यांचे कारणामे वैद्यकीय अहवाल आल्यानंतर समोर आले. आता पीडितेच्या फिर्यादीहुन राजूर पोलीस ठाण्यात गंभिर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.