ब्रेकिंग.! जनतेचा कौल झुगारुन डॉ. किरण लहामटे रात्री १ वाजता अजित दादांच्या गटात दाखल.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
शरद पवार साहेब हे माझे दैवत आहे. मी सदैव त्यांच्या सोबत आहे असे ठामपणे सांगणारे अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे हे रात्री १ वाजता अजित पवार यांच्या गटात जाऊन दाखल झाले आहेत. त्यांनी अजित पवार यांनी दिलेल्या संख्याबळ कागदावर सही केली होती. त्यामुळे, येणाऱ्या काळात राष्ट्रवादी पक्ष हायजॅक करण्यासाठी ३६ आमदारांची गरज असणार आहे. म्हणून लहामटे अजित पवार यांना कोणत्याही परिस्थितीत हवे होते. त्यानुसार दादांचे खंदे समर्थक बाळासाहेब जगताप हे गेल्या तीन दिवसांपासून अकोल्यात ठाण मांडून होते. तर, बबन वाळुंज हे देखील दादांशी हॉट लाईन असल्याने प्रत्येक माहिती उपमुख्यमंत्री महोदय यांच्यापर्यंत पोहचत होती. त्यामुळे, आमदारांच्या प्रत्येक हलचालिंवर लक्ष असलेले आमदार महोदय रात्री थेट दादांच्या गटात सामिल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे, जनता जनता म्हणून डोक्यावर नाचविणारे आमदार किती खोक्यांना बळी पडले अशी उलटसुलट चर्चा सुरु होती. या संदर्भात आमदार, व त्याचे खाजगी स्विय सहायक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलले नाही. मात्र, ३ दिवस अकोल्यात ठाण मांडून बसलेल्या जगताप यांनी माहिती दिली.की आमदार पहाटे १ वाजता दादांच्या गटात सामील झाले आहेत.
मुळ राष्ट्रवादी सोडून अजित पवार हे शिंदे-फडणविस सरकारमध्ये दाखल झाले. सत्तापिपासू आणि खोक्यांची अभिलाषा असणारी मंडळी त्यांच्या गोटात जाऊन दाखल झाली. मात्र, जे आमदार अद्याप शरद पवार की अजित पवार या द्वंद्वात होते. त्यांची मनसुबे आता बदलु लागले आहेत. तर, ज्यांनी आपली भुमीक जनतेच्या मनावर अशी ठेवली होती. त्यांना जनतेेने शरद पवार यांचा कौल दिला होता. मात्र, पवार साहेबासोबत असल्याचे सांगून पुन्हा अजित पवारांच्या गोटात सामिल होणारे काही आमदार आहेत. त्यात डॉ. किरण लहामटे यांचे नाव अग्रस्थानी येऊ लागले आहे. कारण, लहामटे यांनी पहिल्यांदा आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले आणि आता अचानक यु टर्ण घेतला आहे. त्यामुळे, जनतेच्या मनावर अधिराज्य गाजविणारे आमदार आता जनतेच्या रोषाला सामोरे जाताना दिसत आहे. खरंतर ते पहिल्याच वेळी कोणतीही नौटंकी न करता दादांसोबत गेले असते तर थोडाफार रोष आणि पुन्हा गाडी पुर्वपदावर आली असती. मात्र, शरद पवारांकडे येऊन पुन्हा दादांकडे जाणे ही त्यांची राजकीय आत्महत्या ठरणार आहे.
खरंतर, पिचड साहेब यांनी देखील विकासाच्या मुद्द्यावर पक्षबदल केला होता. त्यामुळे त्यांना प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. त्याचे परिणाम २०१९ ला काय झाले हे नव्याने सांगण्याची गरज नाही. पण, निष्ठा आणि पक्ष यावर बोलणारे आमदार आता काय म्हणून जनतेला सामोरे जातील हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पवार साहेबांनी तुम्हाला काय कमी केलं होतं असे पिचड साहेबांना ठणकावून विचारणाऱ्या आमदारांना आता जनतेनेच हा प्रश्न केला तर ते काय उत्तर देतील? पवार साहेब दैवत आहे तर दैवताला धोका देणे योग्य आहे का? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. मात्र, एक बाकी नक्की. की, डॉ. लहामटे मंत्री होऊ किंवा आब्जावधी निधा आणू पण जनतेचा कौल हा शरद पवार यांच्या पाठीशी आहे. अजित पवार फुटले तरी लहमटे त्यांच्या सोबत गेले नाही याचा प्रचंड आनंद शरद पवार यांना होता. त्यामुळे ते लहामटे यांच्या घरी थेट लव्हाळी येथे येणार होते. पण, आमदारांच्या एका निर्णयाने सर्व गोष्टींवर पाणी फिरले आहे. आता २०२४ ला मतदारांनी त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले तर तेव्हा वाईट वाटण्याचे काही कारण नसेल.