कॉलेज विद्यार्थीनीचा कपडे बदलताना व्हिडिओ व्हायरल.! तालुक्यात एकच खळबळ, आरोपी सापडला, पण...!!

 

सार्वभौम (अकोले) :-

     दि. ११ जुलै २०२३ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास माझ्या मोबाईलवर एक लिंक आली होती. अर्थात ती एका मित्रानेच टाकली आणि खाली म्हटलं होतं, पहा साहेब आपल्या मुली कशा शिकार होतात. मी मोठ्या उत्सुकतेने लिंक ओपन केली आणि त्यात पाहिलं एक मुलगी कोठेतरी काट्या कुपाट्यात जाऊन तिच्या अंगावरील कपडे बदली करत होती. आदिवासी समाजाची मुलगी कॉलेजला आली होती परंतु भलतेच चाळे करताना दिसली. भयानक गोष्ट अशी की, तिच्यासोबत असणारा विकृत तरुण एका मोबाईलमध्ये शुटिंग काढत होता. मात्र, तरी देखील ही कपडे बदलुन त्याच्याशी चर्चा करत होती. त्याचे पहिले प्रेम आणि हिचे पहिले प्रेम अशा रंजक चर्चेत तिचे आयुष्य उध्वस्त होणार होते. याची तिला जरा देखील कल्पना नव्हती. आता हा व्हिडिओ २०१८ सालचा होता. मात्र, संबंधित व्यक्तीने तो पाच वर्षानंतर त्याच मुलीचे बनावट फेसबुक खाते खोलून तो अपलोड केला होता. सुदैवाने तो माझ्या हाती लागला आणि कोण कुठली मुलगी आपला काही एक संबंध नसताना तो डिलीट करण्यासाठी रात्री प्रयत्न केले आणि तो व्हिडिओ डिलीट झाला.

त्याचा शोध घेतलाच पाहिजे.!

संबंधित तरुण, ज्याने कोणी हे असले कारणामे केले आहे. त्याने यापुर्वी एक मुलगी पटविली होती. तिला देखील मोहात पाडून तिचा असाच व्हिडिओ काढला होता. तर या विकृत व्यक्तीने तो सोशल मीडियात देखील टाकला होता. मात्र, ते प्रकरण दाबले गेले. मुलीचा प्रश्‍न असल्यामुळे फारसे कोणी पुढे येत नाही. म्हणून या तरुणाने दुसर्‍यांचा असले कृत्य केले. जर पहिल्याच वेळी त्याच्या नांग्या ठेचल्या असत्या. तर, हा दुसरा डंख बसला नसता. संबंधित व्हिडिओ फेसबुकहून हाटला आणि त्यानंतर या बहादराने सगळ्या इमेज डिलीट केल्या. आता हा आयडी कोठून आणि कोण चालवितो आहे. याचा तपास करणे फार सोपे आहे. त्यासाठी पीडित तरुणीने पुढे येणे गरजेचे आहेे. तसे झाल्यास गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करून त्यास कठोर शिक्षा होऊ शकते.

मदत केलेल्या सर्वाचे आभार.! 

खरंतर संबंधित क्लिप हाती आल्यानंतर मुलगी कोण आणि कुठली आहे. याचा विचार जरा देखील आला नाही. विशेष म्हणजे तिनेच काय.! तिच्या कोणत्याही नातेवाईकांनी मदत मागितली नाही. मात्र, तयार केलेली क्लिप ही एका विद्यार्थीनीची आहे आणि तिला देखील जगण्याचा अधिकार आहे. जर तिला आपली क्लिप व्हायरल झाल्याचे समजले तर तिची मानसिकता काय होईल असे काही क्षणात वाटले. विषय युपी बिहारचा नव्हे तर अकोले तालुक्यातील एका मुलीचा होता म्हणून कोणताही विलंब न करता जी-जी पोलीस मित्र सायबर शाखेत काम करतात विशेषत: अभिजीत अरकल सर यांच्याशी संपर्क केला. तज्ञ व्यक्तींशी चर्चा केली. त्यांनी तत्काळ यंत्रणा हलविण्यास सुरूवात केली. संशयीत व्यक्तीचे नाव देखील समोर आले. तर, काही वेळानंतर तो व्हिडिओ फेसबुकहुन डिलीट झालेला दिसला. त्यानंतर आम्ही सखोल माहिती काढण्यास सुरूवात केली तेव्हा फार धक्कादायक गोष्टी समोर आल्या.

पाच वर्षानंतर जाग आली.!

वास्तवत: तो व्हिडिओ सन २०१८ साली संबंधित तरुणी कॉलेजला आली असता ती एका मुलासोबत अडोशाला एका काट्या कुपाटीत गेली होती. तेथे ती आपल्या कॉलेजच्या बॅगमधून एक ड्रेस काढते आणि तो बदलत असते. तेव्हा तो व्हिडिओ काढण्यात आला आहे. आता हा व्हिडिओ चार ते पाच वषार्र्नंतर आज फेसबुकवर संबंधित तरुणीचे बनावट खाते खोलुन त्यावर तो अपलोड करण्यात आला होता. २०१८ ची ती तरुणी आज २०२३ मध्ये तिचा भुतकाळ विसरुन कुठच्या कोठे आहे. संपुर्ण लाईफ तिने नव्याने सुरू केली आहे. मात्र, आज अचानक तिचा फेसबुक प्रोफाईल फोटो आणि त्यावर कपडे बदलतानाचा काढलेला व्हिडिओ. त्यामुळे, ती पुर्णपणे घाबरुन गेली होती. हे जुनं दुखणं कोणी उकरलं? याबाबत तिला कल्पना नव्हती. कारण, तिला फेसबुक चालविता येत नाही. सोशल मीडियाचे फारसे ज्ञान नाही, मग या उचापती केल्या कोणी? त्यानंतर सर्व प्रकार लक्षात आला. पण, यातून एक गोष्ट नक्की. ती अशी की, आपले जुने कारणामे आणि त्याचे जर व्हिडिआ किंवा फोटो असतील तर एक दिवस असली संक्रांत तुमच्यावर नक्की येणार आहे.

मुलींनो सावधान.!

खरंतर प्रेम ही फार सुंदर संकल्पना आहे. मात्र, आजकाल ते फार म्हणजे फार दुर्मीळ झाले आहे. आता प्रेम म्हणजे एक वासनांध शक्त झाली आहे. बदलत्या वयानुसार शरिराच्या गरजा भागविण्यासाठी जिवांचा अकांत केला जातो. मुलींना भावनिक करुन प्रेमाच्या जाळ्यात ओढले जाते. तर काही विकृत नराधम प्रेमी आपल्या प्रेयसिचे नग्न व्हिडिओ किंवा फोटो काढून तिला बदबाद करण्याचा प्रयत्न करत असतात. कोठे इन्स्टाग्रामवर फोटो टाकणे तर कधी फेसबुक व्हाटसऍपवर व्हिडिआ टाकून मुलींचे आयुष्य उध्वस्त करणे यात त्यांना धन्यता वाटते. त्यामुळे, मुलींना विनंती आहे. की, प्रेम करा किंवा नका करु, पण ज्याच्यावर विश्‍वास ठेवला त्याला सुद्धा तुमचे सर्वस्व देऊ नका. तुमचे व्हिडिओ आणि फोटो काढणे म्हणजे तुम्ही ब्लॅकमेल करण्याचे साधन निर्माण करुन दिल्यासारखे आहे. त्यामुळे, डोळस बुद्धीने प्रेम करु नका आणि कोणावर विश्‍वास टाकू नका. अन राहिलेच तुम्ही गाफील. तर, जन्म आणि मृत्युच्या दरम्यान तुम्हाला एकदा तरी घाणेरड्या परिस्थितीतून जावे लागेेल हे विसरु नका. म्हणून देर से लेकीन दुरुस्त करो.!!

टिप :- (मुलीचे गाव गाव कोणी विचारु नये, क्लिप किंवा लिंक टाका असे मेसेज करु नये. ही बातमी अन्य मुली व विद्यार्थीनी यांनी जागरुक रहावे यासाठी केली आहे.)