अपंग मुलीवर मोरीत चेंबुन केला अत्याचार, बापाने जाब विचारला तर दांड्याने मारहाण.! नराधमाची मुजोरी जेलमध्ये, ४ दिवस कोठडी.!
सार्वभौम (संगमनेर) :-
आई वडील घरी नसल्याचा डाव साधुन ओळखीच्या माणसाने 20 वर्षीय अपंग मुलीवर अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. ही घटना सोमवार दि. 10 जुलै 2023 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील अकलापूर शिवारात घडली. जेव्हा पिडीत मुलीने विरोध केला. मात्र, एक हात अपंग असल्याने ती फारसा विरोध करू शकली नाही. तिला नराधमाने जोरात ओढले व तिच्यावर मोरीमध्ये जबरी संभोग केला. जेव्हा आई वडील कामावरून आले. पिडीत मुलीने घडलेला प्रकार सांगितला त्यांनी नातेवाईकांना घेऊन थेट पोलीस ठाणे गाठले व पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सचिन ठका खंडागळे (रा. पत्र्याची वाडी अकलापूर, ता. संगमनेर) याच्यावर गुन्हा दाखल होताच आरोपी सचिन खंडागळे याला पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकल्या आहे. त्याला आज कोर्टात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे करत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिडीत मुलीचे आई वडील हे अकलापूर परिसरात वाट्याने शेती करतात. त्यांना दोन मुलं व एक मुलगी आहे. छोटा मुलगा व मुलगी हे घरीच राखण असायचे. आरोपी सचिन खंडागळे व पिडीत मुलीचे घर थोड्या अंतरावर असल्याने त्याचे नेहमी घरी येणे जाणे असायचे. त्यामुळे, तो पिडीत मुलीच्या घरी येत असत. त्याची पिडीत मुलीवर अगदी बारीक नजर राहत होती. मात्र, एक पुरुष व्यक्ती म्हणुन त्याची तिच्यावर वाईट नजर होती. सोमवार दि. 10 जुलै रोजी नेहमी प्रमाणे आई वडील व मोठाभाऊ हे दररोजच्या कामासाठी घराबाहेर गेले. पिडीत मुलगी व तिचा 14 वर्षांचा लहान भाऊ हे दोघेच घरी होते. पिडीत मुलीला एकटी पाहुन या वासनांध नराधमाची नजर या पिडीत मुलीवर पडली.
ती सायंकाळी चुल पेटवत असताना हा नराधम आरोपी सचिन खंडागळे हा पीडीत मुलीच्या घरी स्वतःच्या मुलाला घेऊन आला. पिडीत मुलीच्या भावाला व आरोपी सचिनच्या मुलाला नराधम सचिनने घराच्या पाठीमागे खेळायला पाठवले. हे जाताच नराधम सचिनने घरात एकांती पाहुन पिडीत मुलीच्या घरात शिरकाव केला व दरवाजा बंद केला. आरोपी सचिन खंडागळे याला पाहुन पिडीत मुलीने आरडा ओरडा केला व बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पिडीत मुलीचा हात लहान पणापासूनच अपंग असल्याने तिला प्रतिकार करता आला नाही. त्यावेळी पिडीत मुलीने चावा घेण्याचा प्रयत्न केला परंतु नराधम सचिनने तोंड दाबले व हात धरून ओढून अत्याचार केला.
दरम्यान, नराधम सचिन खंडागळे हा घरी निघुन गेला. पिडीत मुलगी आई वडिलांची वाट पाहत होती. अंधार पडताच पिडीत मुलीचे आई वडील आले. पिडीत मुलीने आईला पाहताच मिठी मारली व रडत रडत घडलेला प्रकार सांगितला. हे ऐकुन आई वडीलांची तळपायाची आग मस्तकात गेली. ते थेट आरोपी नराधम सचिन खंडागळेच्या घरी गेले. पिडीत मुलीच्या आईने नराधम सचिन खंडागळेला जाब विचारला तु माझ्या मुलीसोबत असे का केले असे विचारले असता नराधम सचिनने जवळ पडलेले लाकूड उचलले व पिडीत मुलीच्या आईच्या हातावर मारले. त्यावेळी पिडीत मुलीचे वडील देखील नराधम सचिनला धरायला गेले त्यावेळी तो म्हणाला तुम्ही कुठवर पण जा तुम्हाला मोडुन तोडुन टाकीन अशी धमकी दिली. पिडीत मुलीच्या वडिलांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांना सांगितले ते पिडीत मुलीच्या पाठीशी धावुन आले. त्यांनी थेट घारगाव पोलीस ठाणे गाठले व घडलेली सर्व कैफीयत पोलीस ठाण्यात सांगितली त्यावरून घारगाव पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमान्वये गंभीर गुन्हा दाखल केला. व आरोपी सचिन खंडागळे याचा छडा लावुन तात्काळ बेड्या ठोकल्या त्याला आज दुपारी कोर्टापुढे हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे करत आहेत.