देशातील सर्वात जास्त आयएएस व आयपीएस अधिकारी मराठी शाळेतुन घडले आहेत- आ. सत्यजित तांबे


- सुशांत आरोटे

सार्वभौम (अकोले)

  राज्यात बर्‍याच ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा बिकट अवस्थेत आहे. मात्र, ज्या ठिकाणी पालक जागरुक आहेत किंवा शाळा व्यवस्थापन समिती केवळ कागदावर नसून प्रॉपर काम करते आहे. अशा ठिकाणच्या शाळा कधीच बंद पडत नाही. मी जेव्हा १० वर्षे जिल्हा परिषदमध्ये सदस्य म्हणून काम केले तेव्हा माझ्याकडे सर्वात जास्त तक्रारी शिक्षकांच्या विषयी येत होत्या. तेव्हा माझ्या लक्षात आले. की, ज्या गावांमध्ये शिक्षकांविषयी तक्रारी जास्त आहे. तेथील शाळा चांगली असून गुणवत्ता देखील उत्तम असल्याचे मला पहायला मिळाले असे मत नाशिक पदविधार मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी यांनी व्यक्त केले. ते अकोले तालुक्यातील उंचखडक बु येथील जिल्हा परिषद शाळेच्या ध्वजारोहण प्रसंगी बोलत होते. यावेळी शाळेचे देणगीदार, पत्रकार, पालक व विद्यर्थी यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व शॉल बुके देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब खरात होते.



उंचखडक बु येथील जिल्हा परिषदेची शाळा बंद पडणे ही बाब मुळात दुर्दैवी आहे. मात्र, आता तरुणांनी शाळा सुरु केली असून येणार्‍या काळात गावाने त्यांना सपोर्ट करणे गरजेचे आहे. शाळेला चांगले शिक्षक लाभले आहेत. मात्र, केवळ त्यांच्यावरच विसंबून न राहता पालकांनी आपल्या पाल्याकडे घरी देखील लक्ष दिले पाहिजे. पुरुष लोकांना फार कामे असतात, त्यांना गुवागुंड्या करण्यासाठी वेळ हवा असतो. मात्र, महिलांनी विशेषत: लक्ष दिले पाहिजे. पुरूषांना आता आपली मानसिकता आणि रिकामे उद्योग सोडून मुलांच्या भविष्यासाठी त्यांना वेळ दिला पाहिजे. खरंतर, आपला तेव्हा जन्म न झाल्याने भारत स्वातंत्र्यपुर्व काळात आल्याला इंग्रजांशी लढण्याचे भाग्य लाभले नाही. आता सिमेवर जाण्याचे भाग्य लाभले नाही. पण, आरोग्य, शिक्षण, समाजसेवा अशा अनेक गोष्टी देशासाठी करुन अधुनिक स्वातंत्र्यविर होण्याचे भाग्य आपल्याला लाभेल. आज उंचखडक बु येथील शाळा सुरू करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले आहे, ते अधुनिक काळातील स्वातंत्र्यसैनिक आहेत असे आ. तांबे म्हणाले. समाजातील प्रत्येकाने पीडित, वंचित घटकांसाठी काम केले पाहिजे असे काम सामाजिक तर आहेच मात्र, ते देशासाठी देखील आहे म्हणून प्रत्येकाने अधुनिक स्वातंत्र्यसैनिक म्हणून काम करण्याचा बहुमान मिळविला पाहिजे.

बंद पडलेली शाळा सुरू करणे वाटते तितके सोपे नाही. त्यामुळे, सागर शिंदे आणि त्यांच्या टिमने जे काम केले ते फार उल्लेखनिय आहे. एखादे काम लोकसहभागातून उभे राहते आणि ते यशस्वी देखील होते याचे हे उत्तम उदा. आहे. खरंतर शिक्षण विभागाचे कौतुक करण्याचा फारसा प्रसंग येत नाही. मात्र, आज उंचखडक बु ची शाळा, येथील के.जीचे वर्ग, डिजिटल क्लासरुम, सुसज्ज बैठक आणि मुलांची गुणवत्ता पाहुन शिक्षण अधिकारी जालिंदर खताळ यांनी जी काही शाळेला मदत केली त्यांचे कौतुक केले पाहिजे असे तांबे म्हणाले. यावेळी शिक्षण अधिकारी जालिंदर खताळ, अधिकारी अशोक कदम, सरपंच सुलोचनाताई शिंदे, बबनराव देशमुख, हेमंत आवारी, गणेश आवारी, आबासाहेब मंडलिक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षक रवी रुपवते व दत्तात्रय मंडलिक यांनी तर आभार महादेव आहेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र शिंदे, अक्षय देशमुख, श्यामराव देशमुख, संजय गावंडे, उद्धव देशमुख, तुषार देशमुख, दिनेश मंडलिक, प्रकाश देशमुख, संदेश खरात, माधुरी हासे, शितल देशमुख, हर्षदा देशमुख, आदिती हासे, यशश्री शिंदे, सागर देशमुख, विकास खरात, दिलीप देशमुख, अदित्य मंडलिक, अंकुश शिंदे आदींनी केले.

हे श्रेय्य झेडपी शाळांना जाते.!

भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा फक्त आठ टक्के लोकांना लिहीता वाचता येत होते. तेव्हा शिक्षणाचा अधिकार देखील नव्हता. मात्र, भारत स्वातंत्र्य झाला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती केली. त्यात मोफत शिक्षणाची तरतुद केली. त्यानंतर आज ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करताना देशातील ९७ टक्के लोक साक्षर आहेत. हे स्वातंत्र्याचे महत्व आहे. तर, या सर्व साक्षरतेचे महत्व जिल्हा परिषद शाळेंना जाते. कोणी झेडीपी शाळेंना कितीही नावे ठेवली. तरी, आएएस, आयपीएस अधिकारी व संशोधक हे  देखील मराठी शाळेतून शिकून गेलेले जास्त आहेत.

स्वातंत्र्याच्या चळवळीत अकोल्याचे मोठे योगदान.!

देशातील स्वातंत्र्याच्या चळवळीत अकोले तालुक्याचे फार मोठे योगदान आहे. इंग्रजांच्या विरुद्ध लढायचं आणि पुन्हा अकोले तालुक्यातील दरी खोर्‍यात येऊन दडून बसायचे. या तालुक्यातील कित्तेक लोकांनी देशासाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही. भाऊसाहेब थोरात यांनी त्यांच्या पुस्तकात अकोले तालुक्याच्या योगदानाची गाथा लिहीली आहे. त्यामुळे, येथील लोक क्रांतीकारी असून लढा देणे हा येथील मातीचा गुण आहे. या तालुक्यातील मुळा, प्रवरा, आढळा विभागातील लोकांचे तालुक्यासाठी फार मोठे योगदान आहे.