हाय, नाईस डिपी.! प्रतिष्ठीत व्यक्ती भाळला, पाच लाखांचा हानीट्रॅप, महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल, वह बुलाती हैं. मगर जाने का नही.!
सार्वभौम (लोणी) :-
व्हाट्सएपच्या डीपीला लाईक करत नाईस डीपी असे बोलुन 23 वर्षाच्या तरुणीने प्रतिष्टीत व्यक्ती सोबत गुटरगु चालु केली. त्यानंतर फोन केला आणि तुम्हाला जाणून बुजून मेसेज केला तुमचा डीपी मला आवडला असे गोड गोड बोलु लागली. बोलण्यातुन भुरळ पडण्याचा प्रयत्न केला. कॉल दरम्यानच्या सर्व रेकॉर्डिंग करून घेतल्या. तुम्ही मला मदत करा नाहीतर मी तुमची गावात बदनामी करील अशी धमकी देऊन बड्या नेत्याच्या समर्थकाच्या सहाय्याने पाच लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवार दि. 29 जुन 2023 रोजी रात्री 7:30 वाजण्याच्या दरम्यान घडला. जेव्हा आपल्याला कट रचुन पैसे उकळले आपल्यावर हनीट्रॅप झाला हे लक्षात आले तेव्हा पिडीत प्रतिष्ठित व्यक्तीने लोणी पोलीस ठाणे गाठले व आज त्याने 13 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला. यामध्ये एका बड्यानेत्याचे समर्थक श्रीकांत तान्हाजी मापारी (रा.लोणी खु, ता. राहता), रणजीत उत्तम आहेर (रा. लोणी, ता. राहता), मनीषा विजय साबळे (रा. नाशिक) यांच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोणी खुर्द परिसरातील एक राजकीय प्रतिष्ठित व्यक्ती आहे. त्यांचा गावात मोठा जनसंपर्क आहे. त्यांना 29 जुन 2023 रोजी रात्री 7:51 वाजण्याच्याच्या सुमारास अनोळखी नंबर वरून व्हाट्सऍपवर मेसेज आला. हाय नाईस डीपी असे दोन मेसेज आले. त्यानंतर त्याच दिवशी 9:26 वाजण्याच्या दरम्यान पुन्हा काय ग कुठं असा मेसेज आला. तु कधी कॉल पण करत नाही. असे मेसेज येऊ लागले. पिडीत प्रतिष्टीत व्यक्तीने कोण? असा मेसेज केला असता अनोळखी नंबर वरून लगेच रिप्लाय आला की, विसरली का? त्यावर पिडीत प्रतिष्ठीत व्यक्तीने बोल ना, कॉल कर ना असा मेसेज केला. त्यावर अनोळखी नंबर वरून ओके लगेच करते असा मेसेज आला. त्यानंतर रात्री 9:33 च्या दरम्यान लगेच कॉल आला तो पिडीत प्रतिष्टीत व्यक्तीने उचला असता. तुम्ही कोण आहेत असे विचारले. तिने नाव सांगितले मनीषा साबळे बोलते. व मी तुम्हाला जाणुन बुजुन मेसेज केला आहे. असे ही ती बोलत होती. महिला अनोळखी असल्याने प्रतिष्टीत व्यक्तीने फोन कट केला. पुन्हा विचार करून पिडीत प्रतिष्टीत व्यक्तीने फोन केला असता. ती महिला फोन उचलुन गोड-गोड बोलु लागली. प्रतिष्टीत व्यक्तीला आपल्या मोहात फसू लागली. मला तुमची मदत हवी आहे असे ती बोलु लागली.
दरम्यान, दोन्ही कडुन झालेल्या फोनची या महिलेने रेकॉर्डिंग करून घेतली. तुम्ही मला मदत केली नाही. तर मी तुमची बदनामी करीलव विनयभंगाचा व बलात्काराचा गुन्हा दाखल करील अशी धमकी दिली. तीने लोणी येथील बैलबाजाराजवळ आताच्या आता या असे बोलु लागली. तेथुन प्रतिष्टीत व्यक्तीचे घर जवळ असल्याने तो पिडीत व्यक्ती तळेगाव रोड येथील बैलबाजाराजवळ गेले. तेथे रोडलगत एक महिला होती. त्या महिलेला जाऊन विचारले असता तुम्ही मला फोन केला होता का? महिलेने डीपी पाहिला असल्याने ती हो म्हणाली. त्यावर ती महिला प्रतिष्ठित व्यक्तीशी लगट करू लागली. तुम्हाला मी ओळखत नाही तुम्ही असे करू नका. असे म्हणताच महिलेने नाव सांगितले. मला तुमच्या गावातीलच लोकांनी नंबर दिला आहे. ती महिला अंगावर येत असल्याने रोडवरील लोक जाताना येताना पाहत होती. एक व्यक्ती थांबला असता आमचे नवरा बायकोचे भांडण आहे तुम्ही भांडणात पडु नका असे बोलुन काढून दिले. त्यानंतर ही महिला पैश्याची मागणी करू लागली.पाच लाख आताच्या आता द्या असे म्हणुन कपडे काढु लागली. पिडीत प्रतिष्टीत व्यक्ती पूर्णपणे घाबरून गेला. तुला पैसे देतो असे म्हणुन या महिलेला शांत केले. प्रतिष्टीत व्यक्ती घरी आला व्यवहारसाठी ठेवलेले पाच लाख घेतले व त्या महिलेकडे घेऊन गेले.
दरम्यान, आरोपी मनीषा साबळे या महिलेला पैश्याची बॅग दिली असता अंधारातुन गावातीलच आरोपी रणजीत आहेर व श्रीकांत मापारी हे लोक बाहेर आले. तेथे येऊन तुम्ही गावात बोभाटा केला तर तुला जिवंत सोडणार नाही जर केली तर बाईमार्फत बदनामी करील अशी धमकी दिली. त्यावेळी पिडीत प्रतिष्टीत व्यक्तीचे असे लक्षात आले की, आपल्यावर कट रचुन पैसे उकळण्यासाठी हा प्रकार केला होता. प्रतिष्टीत व्यक्तीची बदनामी होऊ नये म्हणुन आजपर्यंत तक्रार दिली नाही. जेव्हा आपल्यावर हनीट्रॅप करून बदनामी चालावली. राजकारणातुन बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले गेले हे लक्षात आले असता प्रतिष्टीत व्यक्तीने थेट लोणी पोलीस ठाणे गाठले व आपली कैफियत सांगितली यावरून बड्यानेत्याचा पंटर श्रीकांत तान्हाजी मापारी (रा. लोणीखुर्द,ता. राहता), रणजीत उत्तम आहेर (रा. लोणीखुर्द, ता. राहता), मनीषा विजय साबळे (रा. नाशिक) यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.