नराधम.! इयत्ता 8 वीच्या मुलीस शाळेतून घरी सोडतो असे म्हणत झाडाझुडपात नेवून दोन वेळा अत्याचार.! कडेलोट करण्याची धमकी.! नराधम अटक.
सार्वभौम (संगमनेर) :-
तुला घरी सोडतो म्हणुन इयत्ता 8 वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थीनीला जवळेबळेश्वर परिसरात व शिरसगाव धुपे रोडलगत नेऊन घाटात झाडाझुडुपांमध्ये व दगडाच्या पाठीमागे नेऊन अत्याचार केल्याची घटना शुक्रवार दि.14 जुलै 2023 रोजी सकाळी 11 ते 5 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. हा प्रकार काही लोकांनी पाहिल्यामुळे ही धक्कादायक बाब समोर आली आहे. हा प्रकार कोणाला सांगितला तर विद्यार्थीनीला कड्यावरून लोटून देण्याची धमकी दिल्याने 12 वर्षांची विद्यार्थीनी घाबरून गेली. जेव्हा आई वडील गावावरून आले तेव्हा मुलीने सर्व घडलेला प्रकार सांगितला. वडिलांनी थेट तालुका पोलीस ठाणे गाठुन तक्रार दिली यावरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात पंकज शरद डुबे (रा. पेमगिरी, ता. संगमनेर) याच्यावर पोक्सो व गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ बेड्या ठोकल्या आहे. आरोपी पंकज डुबे याला आज कोर्टासमोर हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.याचा पुढील तपास प्रभारी पोलीस उपअधीक्षक आर. वमने करत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 12 वर्षीय पिडीत मुलीचे आई वडील हे पेमगिरी येथे शेत मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. त्यांची 12 वर्षांची मुलगी पेमगिरी गावातीलच एका विद्यालयात इयत्ता 8 वीचे शिक्षण घेते. आरोपी पंकज डुबे हा देखील गावातीलच असल्याने त्याचे शाळेतील परिसरात नेहमी येणे जाणे असायचे. इयत्ता 8 वीत शिकणारी पिडीत मुलगी ही सकाळी 10 वाजता शाळेत जाते व 5 वाजता घरी येते. ही 12 वर्षांच्या मुलीला वडील तिच्या मामाकडे दि.11 जुलै 2023 रोजी पाठवतात. तेथुनच ती शाळेत ये-जा करत होती. दि. 16 जुलै 2023 रोजी पिडीत मुलीचे आई वडील हे वडिलांच्या आईला भेटण्यासाठी सिन्नर येथे जातात. त्यावेळी तिन्ही मुलं हे पेमगिरी परिसरात राहतात. दि.18 जुलै 2023 रोजी दुपारी 3 वाजता पिडीत मुलीचे आई वडील गावावरून घरी येतात तेव्हा इयत्ता 8 वीत शिकणारी मुलगी ही खुप घाबरलेली व रडत होती. यावेळी तिला वडिलांनी विचारले काय झाले. का रडते ? तेव्हा इयत्ता 8 वीत शिकणाऱ्या मुलीने वडीलांना सांगितले की, शुक्रवार दि. 14 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास शाळा भरून गेल्यावर मी शाळेच्या कोपऱ्यावर उभी असताना आरोपी पंकज डुबे हा गाडीवर आला व म्हणाला की, शाळा आता भरून गेली आहे. तु गाडीवर बस तुला घरी सोडतो. असे म्हणुन मुलीला गाडीवर बसवले.
दरम्यान, गाडीवर बसताच आरोपी पंकज डुबेच्या मनात वाईट भावना असावी त्याने पिडीत मुलीला घेऊन शिरसगावधुपे रोडने घाटाच्या दिशेने बाळेश्वर मंदिराकडे घेऊन गेला. तेथे मंदिरात दर्शन घेऊन घरी जाऊ असे म्हणुन पुन्हा पेमगिरीकडे जाताना मध्ये रस्त्यावर गाडी थांबुन दगडाच्या पाठीमागे नेले व जबरदस्तीने संभोग केला. त्यानंतर पुन्हा घराकडे जात असताना घाटसंपताच आरोपी पंकज डुबे याने झाडाझुडपाच्या शेजारी गाडी घेतली तेथे बळजबरीने नेऊन पुन्हा बलात्कार केला. तेथे मात्र काही लोकांनी पाहिले. त्यामुळे, ही बाब उघडकीस आली पण तेथुन आरोपी पंकज डुबे याने पळ काढला व पिडीत मुलीला गाडीवर बसवुन गावातील वडाच्याझाडाजवळ सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान सोडले. तेथुन पिडीत मुलगी ही मामाच्या घरी गेली.
ही घडलेली घटना जर कोणाला सांगितली तर तुला कड्यावरून लोटून देईन अशी धमकी दिली होती. त्यामुळे, पिडीत मुलीने ही गोष्ट कोणाला सांगितली नाही. मात्र, आई वडील गावावरून येताच घडलेला प्रकार पिडीत मुलीने सर्व सांगितला. हे ऐकताच आई वडिलांची तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली. त्यांनी नातेवाईकांना बोलावून थेट तालुका पोलीस ठाणे गाठले. वडिलांनी घडलेला प्रकार पोलीस ठाण्यात कथन केला. त्यावरून पोलिसांनी तक्रार दाखल केली. यावरून आरोपी पंकज शरद डुबे (रा.पेमगिरी, ता. संगमनेर) याच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या. आरोपी पंकज डुबे याला न्यायालयापुढे हजर केले असता त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक वमने करत आहेत.