शाळेत जाणाऱ्या मुलीस लिफ्ट देऊन नंतर लॉजवर नेले.! अल्पवयीन असुनही अत्याचार केला आणि पुन्हा शाळेत सोडले.! गुन्हा दाखल, नराधम अटक.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                   इयत्ता 10 वीत शिकणाऱ्या मुलीशी शाळेत जाताना ओळख झाली. मग काय.! फोनवर हाय, हॅलो गुलुगुलु बोलणं तेथुन ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. तुला शाळेत सोडतो म्हणुन मुलीला गाडीवर बसवले शाळेजवळ सोडले. पण, पुन्हा फोन करून बोलावून घेतले. आपण बाळेश्वरला दर्शनाला जाऊ असे म्हणुन गाडीवर बसवुन थेट संगमनेर शहरातील एका हॉटेलवरील रूममध्ये नेले. तेथे नेताच दरवाजा बंद केला आणि पाठीमागून मिठी मारून तु मला फार आवडतेस असे म्हणुन बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. ही धक्कादायक घटना शनिवार दि. 22 जुलै 2023 रोजी सकाळी 11:30 ते 4:30 वाजण्याच्या दरम्यान घडली. यामध्ये पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गणेश सुखदेव भडांगे (रा. शेंडेवाडी, ता. संगमनेर) याच्यावर पोक्सोसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. 

         दरम्यान, गुन्हा दाखल होताच आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या आहे. आरोपी गणेश भडांगे याला आज न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे करत आहेत. खरंतर, संगमनेर शहरासह तालुक्यात महिला अत्याचारासह शाळेतील अल्पवयीन मुलींवर देखील अत्याचार वाढत आहे. यामध्ये पोक्सो सारखे गंभीर गुन्हे वारंवार घडत आहेत. त्यामुळे, इथे शाळा, कॉलेज, वाडी-वस्तीवर सामाजिक कार्यकर्त्यांनी, लोकप्रतिनिधीनी, महिला आयोगाने जन जागृती करणे गरजेचे आहे. त्यामुळे, संगमनेर तालुका जितका विकसित होत चालेला आहे. तितके येथे अल्पवयीन मुली-महिला यांची असुरक्षितता वाढत आहे का? असा प्रश्न संगमनेरातील सुज्ञ नागरिकांनी उपस्थित केला आहे.

            याबाबत सविस्तर माहिती अशी की, 14 वर्षीय पिडीत मुलीचे आई वडील हे हिवरगाव पठार भागातील परिसरात शेती करून उदरनिर्वाह करतात. त्यांना एक मुलगा व एक मूलगी आहे. पिडीत मुलगी इयत्ता 10 वीत साकुर परिसरातील शाळेत शिक्षण घेते. ती घरुन येणाऱ्या जाणाऱ्या गाडीला हात करून शाळा ते घर असा प्रवास करत असते. काही दिवसांपूर्वी 14 वर्षीय पिडीत मुलीची ओळख आरोपी गणेश सुकदेव भडांगे याच्याशी होते. आरोपी गणेश याने पिडीत मुलीला फोननंबर देऊन काही  अडचण आली तर मला फोन कर असे बोलुन नंबर दिला. त्यानंतर फोन द्वारे ओळखीचे रूपांतर घट्ट मैत्रीत झाले.  दि. 22 जुलै 2023 रोजी सकाळी वाजण्याच्या सुमारास 14 वर्षीय पिडीत मुलगी घरून शाळेत जाण्यासाठी निघाली. हिवरगाव फाटा येथे येताच रस्तामध्ये आरोपी गणेश भडांगे हा मोटारसायकलवर भेटला व म्हणाला की, मी तुला शाळेत सोडतो. त्यानंतर 14 वर्षीय पिडीत मुलगी त्याच्या गाडीवर बसवुन साकुर परिसरातील शाळेमध्ये येते. शाळेत येताच पुन्हा 10:30 वाजण्याच्या सुमारास आरोपी गणेश भडांगे हा शाळेतुन 14 वर्षीय पिडीत मुलीला बोलावतो व म्हणतो की, आपण बाळेश्वर येथे देवदर्शन करून येवु. आरोपी गणेश हा पिडीत मुलीला गाडीवर बसवतो.           

दरम्यान, गाडीवर बसताच आरोपी गणेश भडांगे याच्या मनात वाईट भावना असावी. त्याने पिडीत मुलीला घेऊन थेट संगमनेर शहरातील एक हॉटेल गाठवले. तेथे एक रूम घेऊन 14 वर्षीय पिडीत मुलीला घेऊन गेला. तेथे रूममध्ये शिरताच त्याने दरवाजाला कडी लावली. आणि पाठीमागे जाऊन मिठी मारली. तु मला फार आवडते असे म्हणू लागला. पिडीत मुलीने प्रतिकार केला. तु जे काही करतो ते मी आई वडिलांना सांगेल असे म्हणताच आरोपी गणेश भडंगे याने पिडीत मुलीला मारहाण करण्यास सुरवात केली. व म्हणाला की, तु जर कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या कुटुंबाला जिवे मारून टाकील असे म्हणुन बळजबरीने बलात्कार केला. त्यानंतर शाळा सुटायच्या दरम्यान त्याने पुन्हा गाडीवर बसवुन तिला साकुर परिसरातील शाळेपुढे सोडले. 

दरम्यान, पीडित मुलगी घरी गेली. त्यानंतर तिने घडलेला प्रकार आई वडिलांना सांगितला. हे ऐकताच आई वडिलांचा पारा सरकला व त्यांनी थेट घारगाव पोलीस ठाणे गाठले व घडलेली सर्व कैफियत पोलीस ठाण्यात सांगितली. 14 वर्षीय पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी गणेश सुखदेव भडांगे (रा. शेंडेवाडी, ता. संगमनेर) याच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी गणेश भडांगे याला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत. त्याला आज न्यायालयापुढे हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे करत आहेत.