बेशरम नवरा आणि नराधम दिर, व्हाटसअपवर अश्लिल व्हिडिओ टाकून रात्री खोलीत घुसला, नवरा म्हणतो घुसूदे.! पीडितेवर अत्याचार, संगमनेरात चौघांवर गुन्हा दाखल.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

               संगमनेर शहरातील चैतन्यनगर परिसरात दिर भाऊजई या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क 22 वर्षीय भाऊजईला अश्लील व्हिडीओ दाखवुन दिराने अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. ही घटना दि. 24 जानेवारी 2022 ते 15 मे 2022 या कालावधी मध्ये वेळोवेळी झाल्याचे पिडीतेच्या सांगण्यावरून लक्षात आले आहे. या प्रकरणी पिडीतेचा नवरा,सासु, सासरा दिराला पाठीशी घालुन पिडीतेला धमकी देत असल्याने नवऱ्यासह,सासु, सासरा, दिर आशा चौघांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल होताच आरोपी फरार आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले करत आहेत.

          याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिडीत महिलेचे पहिलं लग्न तुळजापूर येथे झाले होते. मात्र,काही अंतर्गत कलहामुळे आपल्या पतीला पिडीत महिलेने सोडुन दिले. ती केस कोर्टात चालु असताना संगमनेर शहरातील चैतन्य नगरचे पिडीत महिलेला स्थळ आले. पिडीत महिलेने स्पष्ट सांगितले की, माझे पाहिले लग्न झाले आहे ती केस देखील कोर्टात चालु आहे. मात्र, संगमनेरातील चैतन्यनगर परिसरातील स्थळाने ते मान्य करून पिडीत महिलेला लग्नाला साद घातली. पिडीत महिलेच्या वाडीलांच्या मागे लागुन लग्न जमवले. दि. 31 जुलै 2020 रोजी संगमनेर येथील चैतन्य नगर परिसरातील चेतना कॉलनी येथे पिडीतेचे दुसरे लग्न झाले. पती व सासु एका खाजगी कंपनीच्या प्रोडक्टचे मार्केटिंग करायचे तर दिर या कंपनीचे वस्तु विकायचे सासरा अपंग असल्याने घरीच असायचे. त्यांचा संसार एक वर्षे अगदी सुरळीत चाला नंतर पिडीत महिलेला दिवस गेले पिडीत महिला माहेरी गेली. त्यांना 25 जुन 2021 रोजी पिडीतेला मुलगा झाला. ऑगस्ट 2021 मध्ये पिडीत महिला पुन्हा मुलाला घेऊन सासरी संगमनेर येथे आल्या. काही दिवसांनी पिडीत महिलेचा पती व सासु कंपनीची मार्केटिंगसाठी औरंगाबाद व पुणे येथे बाहेर जात आहोत असे सांगुन घरून निघुन जायचे व पंधरा-पंधरा दिवस घरी येत नसतं.

             दरम्यान, दि.5 जानेवारी 2022 रोजी पिडीत महिलेचा वाढदिवस होता. पिडीत महिलेच्या दिराने न मागता ऑनलाइन साडी गिफ्ट दिली व व्हाट्सऍपवर मेसेज करू लागला. हे पिडीत महिलेने आपल्या पतीला कळवले मात्र, पतीने हा विषय कानामागे टाकला आणि तो नेहमी ऑनलाइन वस्तु मागत असतो असे पिडीत महिलेला बोले. हळुहळु आरोपी दिराची नियत भाऊजई फिरत होती. दि. 9 जानेवारी 2022 रोजी सकाळी अंदाजे दहा वाजता सुमारास पती व सासु मार्केटिंग करण्यासाठी बाहेर जातात. दुसऱ्या दिवशी दि. 10 जानेवारी 2022 रोजी पिडीत महिला घरी आपल्या रूम मध्ये झोपली होती. त्याचवेळी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पिडीत महिलेच्या व्हॉट्सऍपवर आरोपी दिर अश्लील मेसेज करत "भाभी तुम मेरे को बहुत पसंद हो, भाभी मै तुमसे बहुत प्यार करता हुं,भाभी दरवाजा खोलो" असे मेसेज केले व व्हॉट्सऍपवर व्हिडीओ कॉल केले. परंतु पिडीत महिलेने उचलले नाही. त्यानंतर आरोपी दिर हा रोज अश्लिल व्हिडीओ व मेसेज टाकु लागला. मागे-मागे येऊन रूम मध्ये घुसून अश्लील वर्तन करू लागला. हे पिडीत महिलेने आपल्या पतीला फोन द्वारे सांगितले पतीने आल्यावर पाहु असे बोलुन फोन कट केला.

           दि. 16 जानेवारी 2022 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पती व सासु औरंगाबाद वरून घरी आले त्यांना दिराचे सर्व चावटाळ चाळ्यांचे स्क्रिन शॉट काढुन दाखवले. मात्र, पती म्हणाला की हे फक्त मेसेज आणि व्हिडीओच आहे काही होत नाही. त्यानंतर दोन तीन दिवसांनी पती व सासु पुणे येथे मिटिंग आहे म्हणुन गेले. संध्याकाळी पुन्हा दिर मेसेज अश्लील व्हिडीओ फोटो पाठवू लागला. दि. 22 जानेवारी 2022 रोजी पिडीत महिला एकटीच लहान बाळाला घेऊन झोपली असताना रात्री 12 ते 1 च्या दरम्यान पिडीत महिलेच्या रुमचे दार वाजवले म्हणुन पिडीत महिलेने दरवाजा उघडला तर समोर दिर दिसला. तो लगेच रूममध्ये बळजबरीने घुसला. आरोपी दिराला पिडीत भाऊजईने हुसकून देण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपी दिराने पिडीत भाऊजईचे तोंड दाबुन धरले व आरोपी दिर म्हणाला तुम्ही शांतबसा,जास्त शहाणपणा करू नका असे म्हणून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. व जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी ही पीडित महिला त्याच्या दबावाला आणि धमक्यांना बळी पडली नराधम दिराने या धमकीचा फायदा उचलत अश्लील व्हिडीओ दाखवुन तिच्यावर जबरी बलात्कार केला. पिडीत महिलेने हा सर्व प्रकार आपल्या पतीला व सासुला सांगितला पण त्यांनी देखील नराधम दिराला पाठीशी घालुन पिडीत महिलेला धमकी दिली. त्यामुळे पिडीत महिलेला ह्या असाह्य गोष्टी सांगावे तरी कोणाला? असा प्रश्न तिला पडला होता. त्यामुळे, पिडीत महिलेने हा सर्व प्रकार पोलीस ठाण्यात संगीतला त्यानंतर नराधम दिरासह,पती, सासु, सासरा आशा चौघांवर गुन्हा ठोकला.