आ. किरण लहामटेंचा दारुन पराभव, पिचडांचा ऐतिहासिक विजय.! पतसंस्थांच्या चौकशा ह्याच विजयाचे शिल्पकार.!!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यात २०१९ च्या बदलानंतर अनेक राजकीय बदल घडत गेले. कधी पिचडांना धक्के बसले तर कधी महाविकास आघाडीचे पारडे जड भरले. तीन महिन्यापुर्वी अगस्ति कारखान्यात गायकर गटाला ऐतिहासिक यश मिळाले. मात्र, त्यानंतर जेव्हा दुधसंघाच्या निवडणुका लागल्या. तेव्हा सुरूवातीपासून चित्र वेगळे दिसले आणि नंतर चित्र पुर्णत: बदलुन गेल्याचे पहायला मिळाले. यात निवडणुकीचा आत्माच काढून घेण्यात आला. तो म्हणजे, कैलास वाकचौरे, विठ्ठल चासकर आणि भाऊपाटील नवले यांनी जेव्हा आपले अर्ज मागे घेतले. तेव्हाच पतसंस्थांच्या चौकशी आणि १३० व्यक्तींना तीन खोके एकदाम ओके करुन टाकण्यात एका गटाला यश आले. इकडे मात्र सार्या दुनियेचे चिंगू मानसे. प्रचारादरम्यान साधी भेळ खाल्यावर पैसे कोणी द्यायचे अशी तोंडलपवी परिस्थिती होती. त्यामुळे, जो काही घोडेबाजार झाला तो सर्वश्रुत आहे. यात मात्र, बिनविरोधची प्रक्रिया, अनेकांच्या शंकास्पद भुमिका, चौकशा आणि खोके हा मुद्दा फार महत्वाचा ठरला आणि पिचड गट १३ आणि आमदार गट २ असा सामना झाला. यात नगरपंचायतीनंतर पिचड साहेबांना पुन्हा उभारी मिळाली आहे. यात तिळमात्र शंका नाही.
बिनविरोध झाली असती.!
जेव्हा दुधसंघाची निवडणुक लागली. तेव्हा वातावरण ताईट दिसून येत होते. मात्र, नंतरच्या काळात सामोपचाराने बसून निवडणुक बिनविरोध व्हावी असा प्रस्ताव पुढे आला होता. आठ जागा महाविकास आघाडीला आणि सात भाजपाला, त्यात पहिल्यांदा चेअरमन बहुमताकडे आणि नंतर आडिच वर्षे विरोधकांकडे असा प्रस्ताव पुढे आला. तुम्हाला आश्चर्य वाटेल. की, खुद्द पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील यात संमती दर्शविली होती. मात्र, डॉ. किरण लहामटे यांनी त्यास नकार दिला. विशेष म्हणजे अजित दादा देखील तयार असल्याचे बोलले जाते. मात्र, लहामटे यांच्या भुमिकेनंतर त्यांनी कोणतीही प्रतिक्रीया नोंेदविली नाही. कारण, त्यांना आमदार संभाळायचे असतात. डॉ. लहामटे यांच्या ठाम भुमिकेनंतर स्थानिक नेते काही बोलु शकले नाही. अखेर भाजपाने देखील सगळ्यांना धडा शिकविण्याचा निर्णय घेतला आणि महाविकास आघाडीला भुईसपाट केले.
पतसंस्थांच्या चौकशा आणि दबावगट.!
गेली ४० वर्षे कारखान्यासाठी, दुधसंघासाठी येथील पतसंस्था चांगल्या वाटत होत्या. मात्र, २०१९ नंतर सगळ्या विरोधकांच्या पतसंस्था अचानक वाईट झाल्या. त्यांच्यात घोटाळे झाल्याचे अर्ज सहकार आयुक्तांकडे जाऊ लागले. का? तर पतसंस्थांचे संस्थापक सोडून गेले म्हणून..!! कारखान्याला हा दबावगट सुरू झाला आणि दुधसंघाच्या निवडणुकीत खर्या अर्थाने तो अधिक प्रबळ होत गेला. म्हणून विठ्ठल चासकर आणि भाऊपाटील नवले यांचे अर्ज मागे गेले. विशेष म्हणजे कैलास वाकचौरे, महेश नवले यांसारख्या व्यक्तींनी देखील आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे, खर्या अर्थाने भाजपाचा विजय सोपा होऊन गेला. म्हणजे २०१४ साली जसे फाईली उघडून दबावगट निर्माण करुन अनेक व्यक्तींना पक्षप्रवेश दिले आणि सत्ता देखील काबिज केली. तसाच फंडा अकोले तालुक्यात दुधसंघाच्या निवडणुकीत पहायला मिळाला अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
तीन खोके एकदम ओके.!
कारखाना हातून गेल्यानंतर फक्त दुधसंघ बाकी होता. त्यामुळे, काही झालं तरी सत्ता मिळविण्यासाठी वाट्टेल ते अशी भुमिका विरोधकांची होती. तर, विरोधक सहकारातून संपवायचे म्हणून अनेकांनी कंबर कसली होती. मात्र, दोन्ही गटांकडून मलिद्यांचे वाटप करण्यात आले. असे बोलले जाते. की, तीन खोके एकदम ओके करुन बहुमताचा शाश्वत आकडा पार केला होता. त्यामुळे, गुलाल आपलाच हे पुर्वीच सोशल मीडियावर कार्यकर्ते विश्वासाने फिरवत होते. तर, जेव्हा पॅनल तयार झाले तेव्हाच अनेकांना पराजय दिसला होता. इकडे शरद चौधरी, गोरख मालुंजकर, सुरेश गडाख, प्रतापराव देशमुख अशी मोजकी लोक वगळले. तर, हा पॅनल दिलाय कशाला असा प्रश्न उपस्थित केला जात होता. विशेष म्हणजे विजय पाहिजे, गुलाल अंगावर पाहिजे अन पैसे खर्च करायला देखील कोणीतरी मसिहा पाहिजे. असल्या विचारांचे काही उमेदवार होते. त्यामुळे, धपकन पडण्यापलिकडे यांच्याकडे कोणताही मार्ग नव्हता. तर, मार्केटला तीन लाखांचा बाजारभाव फुटल्याचे सोशल मीडियावर फिरत होते. तर, एकवेळी वाढीव रक्कम देऊन विजय खेचण्यासाठी प्रयत्न केल्याचे बोलले गेले.
विजय झाला हे महत्वाचे.!!
विजय कसा झाला हे फार महत्वाचे नाही. विजय घडवून आणण्यासाठी डावपेच फार महत्वाचे असतात. ते भाजपाकडून खेळले गेले त्यात काही गैर नाही. त्यामुळे भाजपाला १३ आणि महाविकास आघाडीला २ असा निकाल लागला. विशेष म्हणजे अगस्ति कारखान्याच्या वेळी जो वादळी प्रचार केेला गेला. सार्वभौमने जसे लेख लिहीले, महाविकास आघाडीतील नेते जसे एकत्र फिरताना दिसले, सोशल मीडियाचा जसा वापर झाला. त्यापैकी कोणताही प्रकार दुधसंघाच्या निवडणुकीत होताना दिसला नाही. एकीकडे शरद चौधरी आणि दुसरीकडेे गोरख मालुंजकर हे विजयी होतात आणि बाकी लोक पडतात हे देखील गमक आहे. काही झालं तरी भाजपला तथा पिचड साहेबांना या विजयाने पुन्हा उभारी आणि भरारी घेण्यासाठी चांगली संधी मिळाली आहे. मात्र, ज्यांना आता आमदार व्हायचे आहे. त्यांनी लोकनेता, मी जनतेत आहे, मी कामे केली, मी लोकप्रिय आहे, मतांचे विभाजन पथ्यावर पडेल, जनता मला तारेल ह्या भ्रमात राहु नये. कारण, खोके फेकल्याशिवाय मतदार बाहेर पडणार नाही. हेच या निवडणुकांनी दाखवून दिले आहे. मात्र, हे लोकशाहीला घातक आहे हे देखील तितकेच सत्य आहे.
सर्वसाधारण 15 जगासाठी 30 उमेदवार निवडूनक रिंगणात होते. यामध्ये अमृतसागर सह दुध व्यावसायिक व प्रक्रिया संघ सर्वसाधारण मतदार संघ- आवारी आप्पासाहेब दादापाटील (शेतकरी विकास) -विजयी -80 आंबरे रामदास किसन (शेतकरी विकास)- विजयी गडाख सुरेश संपत (शेतकरी समृद्धी) 63पराभूत गायकर अरुण दिनकर (शेतकरी विकास) 64 विजयी, चाैधरी बबन किसन (शेतकरी विकास) 69 विजयी, चाैधरी शरद कारभारी (शेतकरी समृद्धी) 66 विजयी, डोंगरे सुभाष सुर्यभान (शेतकरी विकास) 73 विजयी, देशमुख जगन वसंत (शेतकरी विकास) 66 विजयी, देशमुख प्रतापराव लक्ष्मण (शेतकरी समृद्धी) 55 पराभूत, नवले शिवाजी लक्ष्मण (शेतकरी समृद्धी) 51पराभूत , नाईकवाडी गंगाधर गणपत (शेतकरी विकास) 65 विजयी, मालुंजकर गोरक्ष गणपत (शेतकरी समृद्धी) विजयी 71 विजयी, मुंढे बाळासाहेब भाऊराव (शेतकरी विकास) 60 पराभूत, मांडे सोपान काशिनाथ (शेतकरी समृद्धी ) 55 पराभूत, वाकचाैरे दादापाटील रामभाऊ (शेतकरी समृद्धी) 50 पराभूत, वाकचाैरे रावसाहेब रामराव (शेतकरी विकास) 76 विजयी, वैद्य दयानंद नामदेव (शेतकरी विकास) 61पराभूत, शेवाळे गुलाबराव पंढरीनाथ (शेतकरी समृद्धी) 58 पराभूत, शिंदे विजय रंगनाथ (शेतकरी समृद्धी)–45 पराभूत, हांडे पोपट रविद्र ( शेतकरी समृदी )– 47 पराभूत.
महीला राखीव १) औटी सुलोचना भाऊसाहेब (शेतकरी विकास) –75विजयी, २) गजे अर्चना गाैराम (शेतकरी समृद्धी) 51 पराभूत, ३) गायकर नलिनी भाऊसाहेब (शेतकरी समृद्धी) 51 पराभूत, ४)धुमाळ अश्विनी प्रवीण (शेतकरी विकास) 79 विजयी,
अनु.जाती जमाती १)गंभिरे नंदु संपत (शेतकरी समृद्धी) 33 पराभूत , २) पिचड वैभवराव मधुकर (शेतकरी विकास) 97 विजयी,
भ.जा.वि.जमाती १) बेनके बाबुराव शंकर (शेतकरी विकास)-75विजयी, २) बेनके सुभाष विठ्ठल (शेतकरी समृद्धी) 55 पराभूत ,
इतर मागासवर्ग १) तिकांडे रामहारी गोपिनाथ (शेतकरी समृद्धी) 49 पराभूत, २) वाकचाैरे आनंदराव रामभाऊ (शेतकरी विकास) 81 विजयी