कारखाना कधीच बंद पडणार नाही, अन कर्मचार्यांचे पगार सुद्धा कमी होणार नाही, सत्ता गेल्याने विरोधक अफवा पसरवत आहे.!
जसा कारखाना विरोधकांच्या ताब्यातून गेला आहे. तेव्हापासून तालुक्यात आफवांच्या प्याव फुटले आहे. हा कारखाना वर्षभरात बंद पडणार, काही कामगारांना काढून टाकणार, त्यांचा ३० टक्के पगार कपात करणार, कारखान्यात दोनशे कोटी घोटाळा झाला, अधिक दराने खरेदीविक्री केली जाते. अशा प्रकारच्या बावड्या उठविण्याचे काम सुरू आहे. मात्र, मी सर्व शेतकरी बांधव आणि कर्मचारी यांना छातीठोकपणे सांगतो. की, एकही कर्मचारी कमी होणार नाही आणि कोणाचा पगार देखील कमी होणार नाही. तर विशेष म्हणजे कारखाना ज्या क्षमतेने पुर्वी चालत होता. त्यापेक्षा अधिक क्षमतेने तो चालेल. तर, गेल्या २८ वर्ष कारखाना अविरत चालला आहे. त्याच यशस्वितेने तो येणार्या काळात चालेल. मात्र, जसजशा निवडणुका लागतील, तसतसे आरोप प्रत्यारोप होत राहतील, नको-नको त्या आफवा पसरविल्या जातील, २८ वर्षे जे झोपले होते. ते आता जागे होतील. मात्र, कोणाच्याही आफवांना बळी पडू नये. सत्ता गेल्यानंतर मानसे अस्वस्थ होतात आणि नको-नको त्या थराला जातात. त्यामुळे, ऊस उत्पादक शेतकरी आणि दुध उत्पादक बांधवांना हे निवडणुका होईपर्यंत सोसावे लागणार आहे. फक्त एका कानाने एका आणि दुसर्या कानाने सोडून द्या.! अशा प्रकारची प्रतिक्रिया अगस्ति कारखान्याचे चेअरमन सिताराम पा. गायकर यांनी दिली.
गायकर म्हणाले की, वर्षीक मिटींगमध्ये जे काही मुद्दे मांडण्यात आले. त्यातील जे कारखान्याच्या हितासाठी महत्वपुर्ण आहे त्याचा नक्कीच विचार केला जाईल. मात्र, ज्यामागे राजकारण आहे. ज्यांना आत्ता-आत्ता जाग येऊ लागल्या आहेत, ज्यांना जाणिवपुर्वक आकडेवारी कळु लागली आहे. त्यात आम्ही अज्ञान आहोत असे काही नाही. परंतु, काही व्यक्तींच्या मतांशी मी सहमत असून त्यावर येणार्या काळात योग्य निर्णय घेण्यात येईल. खरंतर कारखाना चालविणे म्हणजे सहज बोलण्याइतके सोपे नाही. चढ उतार सुरूच असतात, संकटे आणि अनेक आडचणींना देखील सामोरे जावे लागते. मात्र, सर्व माहित असून देखील आपण काही करु शकत नाही. अशी देखील परिस्थिती असते. कारखान्यात पगारावर जास्त पैसा जातो हे अजित दादांनी सांगितले आहे. हे खरे असले तरी आज आपण कर्मचारी कमी करु शकत नाही यावर मी स्वत: ठाम आहे. त्यांचे पगार देखील कमी करु शकत नाही हे देखील मीच मांडले आहे. मात्र, विरोधातील चारदोन डोके एकत्र येतात आणि नको त्या आफवा पसरवितात. त्यामुळे, एक म्हण आहे. सत्य घरातून बाहेर येईपर्यंत खोटं हे गावभर फिरुन आलेलं असतं..!!
या सगळ्या गोष्टींमध्ये पगार कपात किंवा कर्मचारी कमी हा पर्याय होऊ शकत नाही. त्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही कर्ज आहे. त्याचे १० वर्षे पुनर्गठण करुन त्याचे हाप्ते पाडून मिळाले तर मोठा आधार होऊ शकतो. तसेच एक खेळते भांडवल होण्यासाठी इथेनॉल प्रकल्पावर लक्ष केंद्रीत करता येणे शक्य आहे. साखर उतारा कशा पद्धतीने वाढविता येईल याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. पाच हजार पेक्षा जास्त शेतकर्यांनी आपले शेअर्स पुर्ण केले नाही. त्यांनी शेअर्स भरले तर कारखान्याला मोठी मदत होणार आहे, त्यावर काम सुरू आहे. अगस्तिच्या कार्यक्षेत्रात 4 साडेचार लाख टन असून अजून दोन अडिच लाख टन ऊस उपलब्ध झाला तर गेटकेनची गरज पडणार नाही. त्यावर आता काम सुरू आहे. विशेष म्हणजे जो २६५ जातीचा ऊस आहे. त्या ऐवजी व्ही.एस.आयने च्या काही जाती विकसित केल्या आहेत. त्या आपल्या कार्यक्षेत्रात आणण्याचे काम सुरू आहे. एफआरपी आणि अन्य गोष्टींचा विचार केला तर आपण इतर कारखान्यांच्या तुलनेत कारखानदारीच्या स्पर्धेमध्ये राहण्यासाठी भांडवल आणि विद्यमान परिस्थिती यात ताळमेळ बसविण्याचे काम करावे लागणार आहे. त्यामुळे, आम्ही योग्य नियोजनाने काम करत असून काही व्यक्तींकडून फक्त आणि फक्त आफवा पसरविण्याचे काम केले जात आहे.
खरंतर तुलनात्मक काम पाहिले तर आज १ नोव्हेंबर २०२२ रोजी कारखाना सुरू झाला आहे. तर २५ नोव्हेंबर पर्यंत ८० हजार मेट्रीक टन ऊस गाळप केला आहे. त्यात काही आंदोलने आणि तांत्रिक बाबी देखील आल्या. मात्र, तरी सुद्धा ७१ हजार क्विंटल साखर घेऊन १०.२६ चा उतारा घेण्याचा प्रयत्न केला आहे. जुन्या झालेल्या मशिन आणि अन्य काही गोष्टी यांचा सामना करावा लागत आहे. मात्र, तरी गेल्या महिनाभरात जे काही काम आहे त्यात अधिक सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. तरी देखील काही लोक आफवा पसरवत आहे. की, कारखाना फक्त दिवसा चालतो आणि रात्रभर बंद असतो. म्हणजे, सामान्य शेतकरी आणि नागरिकांचे फक्त कान भरविण्याचे काम सध्या जोरदार चालु आहे. का? तर फक्त दुधसंघाची निवडणुक आली आहे. येणार्या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती येणार आहे. फक्त आम्हीच कसे लायबल होतो. हे दाखविण्याचे बाळबोध काम काही व्यक्तींचे सुरू आहे.
मी विश्वासानं सांगतो. कारखाना बंद पडू देणार नाही, कोणत्याही कर्मचार्याला काढून टाकणार नाही, कोणाचा पगार कमी करणार नाही. वेळेला पर्यायी मार्ग काढू पण शेतकरी आणि कर्मचारी यांच्या भावनांशी आम्ही खेळणार नाही. फक्त माझी तमाम शेतकर्यांना विनंती आहे. की, सत्ता गेल्याने अनेकांच्या काळजावर घाव बसला आहे. त्यामुळे, दुसर्याला बदनाम करण्यासाठी विरोधक वाट्टल त्या थराला जाण्याचा प्रयत्न करतील. त्यांना आपण बळी पडू नये. तर, विशेष म्हणजे, डॉ. किरण लहामटे साहेब यांच्यासारखा कार्यसम्राट आमदार आपल्याला मिळाला आहे. २४ तास जनतेच्या सेवात असणारा माणूस आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपुर्वी त्यांनी संयुक्त जयंतीला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी तारीख दिली होती. त्यानंतर वर्षीक मिटींगची तारीख ठरली होती. त्यामुळे, त्यांच्या अनुपस्थितीचे राजकारण कोणी करु नये. जनतेच्या सुख दु:खात सहभागी होणार आमदार, सत्ता असो वा नसो निधी आणणारा आमदार राज्यात कोठे पहायला मिळणार नाही. त्यामुळे, त्यांच्या कर्तुत्वाची तुलना कोणी हजर-गैरहजरीत करु नये असे त्यांनी मत व्यक्त केले.