संगमनेरला अस्वस्थ व अस्थिर करुन PI देशमुख यांची बदली, तरुणाईचे वाटोळे आणि राजकीय कुटाळे थांबविण्याचे PI बारवकर यांच्यापुढे आव्हान.!
सार्वभौम (संगमनेर):-
संगमनेर शहरातील जाणताराजा परिसरातील एका महिलाच्या गळ्यातून गंठन ओढून नेल्याची घटना शुक्रवार दि.5 नोव्हेंबर रोजी सायं. 7 वाजण्याच्या दरम्यान घडली. संगमनेर शहरात सायंकाळ झाली की, चैनस्नॅचिंगच्या घटना आता पाउलो पाऊली होत आहे. येथील मोटारसायकल चोरी, मोबाईल चोरी, चैन स्नॅचिंग लुटमार आणि अवैध धंद्यांवर न बोललेच बरे इतकेच काय! राजकीय पदाधिकारीचे मुले उत्तेजीत करणारे औषध मेफेंटरमाइन ड्रग्ज सारखे पदार्थ विकताना पकडले जातात तर शिवसेना पदाधिकाऱ्यावर पोलीस ठाण्यात हात उचलला म्हणुन रात्रभर राडा होतो. महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले मांस आणि गांजा यासह नको-नको ते कारभार अगदी खुलेआम चालतात. मात्र, पोलीस काय करतात.? तर, मलिदा गोळा करण्यात आणि नेत्यांच्या उटारेटा करण्यात धन्यता मानतात. त्यामुळे, राजकीय हस्तक्षेपामुळे चालणारे धंद्यांना खाकीकडुन अभय मिळवुन संगमनेरात नको ते धंदे चालू झाल्याने संगमनेर शहरातील नागरिक त्रस्त आहे. तर नवीन आलेल्या पोलीस निरीक्षकांपुढे हे मोठे आव्हान आहे.
दरम्यान, संगमनेर शहरातील तरुण व्यसनाच्या विळख्यात अडकत आहे. सुशिक्षित घराण्यातील मुले देखील नशा करताना आढळून आले. तर चंद्रशेखर चौक परिसरात नशा करण्यासाठी पैसे दिले नाही. म्हणून अल्पवयीन मुलाने शिक्षण प्रशिक्षण केंद्रातील तंत्रज्ञ यांच्या डोक्यात दगड टाकुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तो व्यक्ती महिनाभर आय. सी. यु मध्ये होता. त्यामुळे, शुल्लक कारणावरून येथे जीवघेणे प्रकार होतात. अकोलेनाका, गुंजाळवाडी येथे नशा करणाऱ्या मुलांची टोळी सक्रीय होऊन अनेक व्यापारी, गाडीवर जाणारे सर्वसामान्य व्यक्ती खरेदी करून जात असताना त्यांना चाकू, टणकवस्तूचा धाक दाखवुन लूटमार झाली आहे. वारंवार या गोष्टी अकोलेनाका परिसरात घडल्याने काही अधिकाऱ्यांची चौकशी लागुन वरिष्ठांनी वेतनवाढ बंद केली आहे. जेव्हा तत्कालिन पोलीस निरीक्षक देशमुख होते तेव्हा त्यांचे हात बरबटले आहेत असे म्हणुन फार मोठा जनप्रक्षोभ उभा राहिला त्यानंतर त्यांची उचलबांगडी करण्यात आली होती. मात्र, झालं काय.!त्यानंतर दोन तीन अधिकारी येऊन देखील समाधानकारक काम संगमनेर शहरातील जनतेला पाहिला मिळाले नाही. असा सुर जनतेतून येत आहे. सणासुदीच्या दिवशी महिला बाहेर पडल्या की त्यांच्या गळ्यावर डल्ला मारला जातो, तरुणी शाळेत निघाल्या की भर रस्त्यात त्यांची छेडछाड केली जाते. शहरभर अवैध धंदे बोकाळले आहेत, शहरातील बेशिस्त गर्दी तर जैशी थे आहे. यामुळे, संगमनेरकरांनी खाकीवर नाराजी दाखवली आहे. तर, अनेकांनी वरिल विषय जनता खुलेआम बोलु लगली आहे.
खरंतर, संगमनेर शहर जस-जसे विकसित होत चाले आहे. तसतशी सराईत गुन्हेगारी देखील वाढत चालली आहे. व्यापारी व सामान्य मनासांची मोठ्या प्रमाणात फसवणुक झाल्याचे गुन्हे दाखल होत आहे. अनेक बँकेना चुना लावून फरार झालेला "शहाणे" याचा औरंगाबाद हायकोर्टाने जामीन फेटाळला तरी देखील तो सापडत नाही. त्याच्यासोबत गुन्ह्यात असणारे शेकडो लोक आजही खुलेआम फिरतात तरी देखील पोलिसांची कारवाई शून्य आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार वारंवार गुन्हे करतच आहे. युपी, एम.पी, बिहार अशा अन्य राज्यातुन लोक आलेत, त्यांची कोठे नोंद नाही, येथील महिलांवर अन्याय अत्याचार होत आहे. तरी ऍक्शन घेण्यास पोलीस तयार नाही. मालदाड रोड परिसरात आजही सहज हायप्रोफाइल एमडी, ड्रग्ज सारखी नशा मिळते. ती अहिल्यानगर वरून येणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळते. मात्र, हद्दीत असणाऱ्या स्थानिक पोलिसांना नाही.
दरम्यान, संगमनेर शहरात पोलिसांवर हात उचलणे शिवीगाळ करणे ही आता फॅशन होऊ लागली आहे. आज देखील दोन पोलिसांवर अरेरावी करण्याचा प्रयत्न झाला. किरकोळ कारण दाखवून सोडुन देण्यात आले. त्यामुळे, येथे पोलिसच काय! येथे आमदारांवर देखील तरुणांकडून मालपाणी लॉन्स मध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे, सामन्यांचे काय असा प्रश्न सहज निर्माण होत आहे. त्यामुळे, कायदासुव्यवस्था वेशिवर टांगली असुन ती सुरळीत करण्यावर आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे. व्यापारीवर्ग देखील स्टँड परिसरात लागणारे बॅनर त्यामुळे, होणारी ट्रॅफीक यावर सोशल मिडीयातून आवाज उठवत आहे. हे सर्व सुरळीत ठेऊन कायदा सुव्यवस्थेचा धाक निर्माण करण्यासाठी नव्याने आलेल्या पोलीस निरीक्षकांपुढे मोठे आव्हान आहे.
