तु माझा नवरा बळकवला, दोन सवतींचे भांडण.! खोटं प्रेम करुन लग्न केलं, प्रियकरावर गुन्हा दाखल.! तु मला माफ कर...!!
सार्वभौम (संगमनेर) :-
सहज एका तरुणाशी ओेळख झाली आणि त्याचे रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. दोघांचे प्रेम ऊतू जाऊ लागल्याने भेटीगाठी आणि कालांतराने विषय हाताबाहेर निघुण गेला. नंतर मात्र लग्नाचा विषय पुढे आला आणि चार मित्रांच्या साक्षीने आळंदीत लग्न देखील पार पडले. या दरम्यान, पैसा कमी पडला की हा बहाद्दर तिच्याकडून राजरोस चारदोन हजार रुपये घेत होता. तिचे प्रेम उदार असल्यामुळे, पैशाला काय तोटा आहे का? असे मागता करता ५५ हजार रुपये तिने त्याच्यावर उघळले. लग्नानंतर जेजुरीगड देखील यांनी चढला. मात्र, संसाराला सुरूवात होण्यापुर्वीच पुर्ण विराम मिळाला. कारण, याचे पहिले लग्न झाले होते. हा नगरला गेला आणि हिने त्याच्या मोबाईवर फोन केला पण नेमकी त्याच्या खर्या बायकोने उचलला. त्यानंतर याची भांडाफोड झाली आणि काल प्रेयसी असणार्या तरुणीने आज याच्यावर थेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून आला आरोपी केले आहे. ही घटना दि. २९ आक्टोबर २०२२ रोजी घडली असून यात राहुल एकनाथ सोनवणे (रा. सह्याद्री कॉलेजच्या शेजारी, संगमनेर) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जानेवारी २०२२ मध्ये राहुल सोनवणे याची ओळख शिवाजीनगर परिसरात राहणार्या एका रुपाली सोबत झाली होती. दोघांच्या नजरा-नजरीचा सहवास त्यांना एकत्र आणण्यास सहाय्यभूत ठरला. त्यानंतर त्यांची मैत्री आणि कालांतराने एकमेकांवर आगाध प्रेम झाले. सोनवणे याने आपल्या प्रेयसीकडे शारिर सुखाची मागणी केली. मात्र, तिने देखील त्याला स्पष्ट शब्दात सांगितली. पहिली लग्नगाठ मग बाकी थाट.! त्यामुळे, त्याच्यातील प्रेम अधिक वृद्धींगत होत गेले. राहुल हा तिच्या घरी देखील जाऊ लागला. त्यामुळे, त्यांच्यात कौटुंबिक नेते देखील निर्माण होऊ लागले होते. अशात रुपाली हिने आपल्या भावास आणि वहिनीस याची ओळख करुन दिली. इतकेच काय.! याचे माझ्यावर प्रेम असून माझे देखील याच्यावर प्रेम आहे असे सांगून प्रस्ताव देखील सादर केला होता. मात्र, माणुसच बनावट असल्याचे हिच्या लक्षात आले नाही. आंधळ्या प्रेमापोटी ही बिचारी वहावत गेली.
दरम्यान, एरव्ही मुली मुलांना लुटतात असे पहायला मिळते. मात्र, राहुल सोनवणे याने तिच्याकडून कधी दोन हजार तर कधी पाच हजार अशी काढत गेला. तर, त्याचा मोबाईल जुना आणि खराब झाला आहे. म्हणून त्याने हिच्या नावे ३२ हजार रुपयांचा एक नवा मोबाईल देखील घेतला होता. याच्याकडे पैसे नसल्याने हिच्या खात्यातून हप्त्याची रक्कम कट होत होती. आता हा सिलसिला कोठेतरी थांबला पाहिजे. म्हणून रुपाली हिने त्याला विनंती केली. की, आता तरी आपण लग्न करू. मात्र याच्याकडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. मुलीच्या भावाने राहुल यास आई वडिल यांच्याबाबत महिती विचारली असता. ती दोघे नगरला असतात असे म्हणून अन्य माहिते देण्यास टाळाटाळ केली. तर, आपण लवकरच लग्न करु असे म्हणून त्याने लग्नाची तारीख ठरविली. मात्र, आई वडिल लग्नासाठी पाहिजेच असे काही नाही असे देखील सांगितले.
या सर्व प्रकारानंतर दि.२९ आक्टोबर २०२२ रोजी राहुल याचे मित्र आणि नवरीबाई यांनी आळंदी येथे जाऊन लग्न देखील केले. तर, नवदाम्पत्याने त्यानंतर थेट देवदर्शनासाठी जेजुरी गाठली. यांनी गड चढून भंडारा उधळला. फोटो देखील काढले. त्यानंतर हे पुन्हा संगमनेर येथे आले. त्यानंतर यांनी रुपालीच्या भावाच्या घरातच तात्पुरता आपला संसार थाटला. आता नव्याने घर उभे करण्यासाठी दि. १ नोव्हेंबर २०२२ रोजी राहुल तिला म्हणाला. की, मी नगर जातो आणि तेथे आपल्याला भाड्याने खोली पाहतो. तेथे रुम पाहुन झाली की मी तुला घ्यायला येतो. तो निघुण गेल्यानंतर हिने त्यास वारंवार फोन करुन विचारणा केली. मात्र, अद्याप चांगली खोली मिळाली नाही. त्यामुळे, तुला इकडे आणून ठेवता येणार नाही. आपली चांगली व्यावस्था झाली की मग मी तुला घ्यायला येईल. त्याच्या बोलण्यावर हिने विश्वास ठेवला आणि संगमनेर येथे त्याची वाट पाहिली.
दरम्यान, दि. १२ नोव्हेंबर २०२२ रोजी राहुल सोनवणे हा संगमनेर येथे आला. तो आपल्या प्रेयसिला म्हणाला. की, माझ्यावर लोकांच्या पैशांची देणेदारी आहे. त्यामुळे, तु सध्या ३० हजार रुपये दे. मी तुला नंतर जैसे थे परत करेल. मात्र, तीने सांगितले की माझ्याकडे इतकी रक्कम नाही. मात्र, मी तुला १५ हजार रुपये वहिनींकडून घेऊन देऊ शकते. १५ का होईना सोनवणे याने ती रक्कम घेतली आणि तो पुन्हा नगरला निघुण गेला. त्याची वाट पाहिली, फोन केले. मात्र, तो परत आला नाही. म्हणून दि. १७ नोव्हेंबर रोजी रुपाली थेट नगरला गेली. त्याला तारकपूर बस स्थानक येथे बोलावले. ठरल्याप्रमाणे तो आला देखील. त्यांच्यात काही चर्चा झाली आणि नंतर दोघे एका लॉजवर मुक्कामी राहिले. तेव्हा त्याने एक खळबळजन माहिती हिला दिली. तो म्हणाला. की, माझे यापुर्वी लग्न झाले आहे. त्यामुळे, माझी आई वडिल आपल्याला घरात घेणार नाही. त्यानंतर मात्र, आपली फसवणुक झाल्याचे हिच्या लक्षात आले.
दरम्यान, तिची समज काढून राहुल म्हणाला. की, तु संगमनेर येथे जा. मी मागून येतो. तुला २ वाजता फोन करतो. त्यानंतर रुपाली मागे आली. तिला २ वाजता फोन आला नाही म्हणून तीने ५ वाजता राहुल यास फोन केला. मात्र, तो राहुच्या पत्नीने उचलला. ती म्हणाली की, मी राहुलची बायको आहे. तु त्याच्यासोबत कशाला लग्न केले. तुझा त्याच्याशी काही संबंध नाही. तेव्हा हिने तिला सांगितले. की, त्याने मला फसवुन लग्न केले आहे. पहिल्या लग्नाबाबत मला काही एक कल्पना नव्हती. त्याने माझ्याकडून विश्वासाने पैसे देखील घेतले आहे ते मला देऊन टाका. त्या फोन नंतर मात्र रुपाली यांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि राहुल एकनाथ सोनवणे (संगमनेर) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.