अखेर राजुरचे सहा.पोलीस निरिक्षक नरेंद्र साबळे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल.! भाऊसाहेब आघव यांची गोळ्या घालुन आत्महत्या.!

 


सार्वभौम (अकोले) :- 
                        अकोले तालुक्यातील राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक नरेंद्र साबळे यांनी पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब आघाव यांच्याकडे १० लाख रुपयांची मागणी केली होती. तर, त्यात सहायक पोलीस उपनिरिक्षक प्रकाश निमसे याने एका पोलीस महिलेला हाताशी धरुण आघाव यांच्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला होता. तो गुन्हा दाखल करताना साबळे यांनी सहभाग घेतला होता. तर, हा गुन्हा मागे घेण्यासाठी आघाव यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. तसेच या पाच लाखातील तीन लाख रुपये हे गुन्हा दाखल केलेल्या महिलेला देण्याचे ठरले होते. त्यानंतर ही महिला गुन्हा मागे घेणार होती. तर, आघाव यांची नियुक्ती शेंडी येथे असताना त्यांनी त्या परिसरातील अवैध धंदे बंद केले होते. त्यामुळे साबळे यांचे हाप्तेखोरीतून पाच लाख रुपयांचे नुकसान झाले होते. त्यामुळे असे एकंदर १० लाख रुपये आघाव यांच्याकडे मागितले होते. तसेच जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा त्यांची विभागीय चौकशी लागली. ती निल करण्यासाठी आरोपी पोलीस कर्मचारी शिवाजी फुंदे याने एक लाख रुपये मागितले होेते. ही रक्कम देणे शक्य नसल्यामुळे आघाव प्रचंड तणावात होते. त्यामुळे, आघाव यांच्याकडे पैसे मागून त्यांना मानसिक त्रास देऊन त्यांना चौघांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात चौघांवर कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
           त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. की, अजित दादा पवार यांच्या बंदोबस्तासाठी मी अकोल्याला गेलो होते. तेव्हा मला तेथे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे साहेब भेटले. ते म्हणाले की, तुम्ही शेंडी येथे ओपी असताना सर्व दोन नंबर धंदे बंद केले. त्यामुळे, मला ५ लाख रुपयांचे नुकसान झाले. मी एएसआय निमसे यांना हाताशी धरुन एका महिला पोलीस कर्मचार्‍याच्या माध्यमातून तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मला शेंडी ओपीचे पैसे चालु झाले. आता तुम्ही मला १० लाख रुपये द्या. मी तुम्हाला या गुन्ह्यातून सोडवितो. तेव्हा आघाव म्हणाले की, मी १० लाख रुपये कशाचे देऊ.! तेव्हा साबळे म्हणाले. की, ५ लाख रुपये माझे आणि विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी निमसे याने महिला कर्मचार्‍यास तयार केले. म्हणून त्याला दोन लाख रुपये द्यावे लागेल तर गुन्हा मागे घेण्यासाठी महिला कर्मचार्‍यास तीन लाख रुपये द्यावे लागतील. असे १० लाख द्या.

तर, या व्यतिरिक्त तुमची विभागीय चौकशी चालु आहे. त्यातून बाहेर काढण्यासाठी डी.ई चे काम पाहणारे शिवाजी फुंदे भाऊसाहेब यांना एक लाख रुपये द्यावे लागणार आहे. तेव्हा आघाव साबळे यांना म्हणाले. की, इतकी मोठी रक्कम माझ्याकडे नाही असे म्हणून ते निघुन गेले. त्यानंतर काही दिवसांनी विभागीय चौकशी झाली आहे असे म्हणून फुंदे यांनी आघाव यांना बोलावून घेतले. तेव्हा फुंदे म्हणाले की, मी तुम्हाला चौकशी अहवालातून सुखरुप बाहेर काढले आहे. त्यामुळे, आता साबळे साहेबांनी जसे सांगितले तसे करा. मात्र, तेव्हा देखील आघाव यांना सांगितले. की, माझ्याकडे इतके पैसे नाहीत. मी ही रक्कम देऊ शकत नाही. तेव्हा देखील आघाव तेथून निघुन गेले. आता १० लाख रुपये आणायचे कोठून? यांने पैसे द्यायचे कसे? अशा अनेक प्रश्‍नांमध्ये आघाव प्रचंड तणावात जिवण जगत होते. मात्र, एक अंतीम पर्याय म्हणून त्यांनी पोलीस अधिक्षकांकडे आपली कैफित मांडली.

दरम्यान, जेव्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी आघाव यांना वॉर साठी बोलविले होते. तेव्हा, आघाव यांनी त्यांच्याबाबत घडलेला प्रकार कथन केला होता. मात्र, पोलीस अधिक्षक महोयद यांनी त्यांच्याकडे फार गांभिर्याने पाहिले नाही. जर, एक बॉस म्हणून आरोप का होईना. चौकशी करतो, पाहतो असे काही सांगितले असते. तर, कदाचित त्यांचाच सहकारी आज त्यांच्यात असता. मात्र, पोलीस अधिक्षकांना आघाव यांची तक्रार फार महत्वाची वाटली नाही. सर्व घटनाक्रम एकेल्यानंतर पाटील साहेबांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. असे चिठ्ठीत म्हटले आहे. त्यामुळे, आज न्यायाचे सर्व दरवाजे बंद झाल्याने मी हताश झालो आहे. म्हणून मी माझे जीवण संपवत आहे. माझ्या मृत्युला सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश रामभाऊ निमसे, शिवाजी फुंदे आणि एका महिला अशा चौघांना दोषी धरावे असे म्हटले आहे होते. त्यानुसार चौघांना आरोपी करण्यात आले आहे.