कोण बनेगा अगस्ति मे व्हा.चेअरमन.! यादी गेली दादांकडे.! नाराजीवर हा जालीम उपाय.! कारखान्यात कुरघोडी नको.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत समृद्धी विकास मंडळाला जनतेने भरभरुन यश दिले. हे यश इतके मोठे होते की, त्याची इतिहासात नोंद झाली. मात्र, दुदैवाने चेअरमन कोण आणि व्हा-चेअरमन कोण? याबाबत अद्याप एकवाक्यता नाही. खरंतर, जेव्हा आमदार साहेबांनी इच्छुक व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या त्यात अगदी बोटावर मोजाण्याइतक्या लोकांनी स्वत:चे नाव न घेता काही पात्रता असणार्या व्यक्तींची नावे पुढे केली. मात्र, चेअरमन होण्यासाठी एकमताने सिताराम पाटील गायकर साहेब यांचे नाव पुढे आले. परंतु, व्हा-चेअरमन करायचे कोणाला? हा दांडगा प्रश्न २१ जणांसह आमदारांना पडला होता. जेव्हा पेच प्रसंग निर्माण होईल तेव्हा अजित दादा त्यावर मार्ग काढतील. त्यामुळे, आमदार साहेबांनी ९ ते १० जणांची नावे आज मुंबईला पाठविली होती. त्यानंतर, दादा त्यावर निर्णय घेणार असून उद्या सकाळी थेट नियुक्ती जाहिर होणार आहे. त्यामुळे, चेअरमन कोण? हा मुळ प्रश्न नव्हता. तर, प्रचंड गोपनियतेनंतर उद्या अचानक व्हा-चेअरमन पदाचे नावे पुढे येणार असल्याने तालुक्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
जुनी फळी होऊ शकते.!
खरंतर, व्हा-चेअरमन होण्यासाठी जुन्या फळीतून सिताराम पाटील गायकर साहेब हे चेअरमन होणार आहे. त्यामुळे, त्यांना सोबती म्हणून अशोकराव भांगरे, अशोकराव देशमुख, मच्छिंद्र धुमाळ, रामनाथ वाकचौरे, कैलास वाकचौरे, अशोकराव आरोटे, पर्बतराव नाईकवाडी, कैलास शेळके, मिनानाथ पांडे यांच्यातून कोणाची वर्णी लागु शकते. तर, यात कैलास वाकचौरे आणि अशोक देशमुख, पर्बत नाईकवाडी यांची नावे आघाडीवर राहु शकतात. तर, पक्षाचा क्रायटेरीया लावला तर एम.शेठ यांनी देखील व्हा.चेअरमन पदासाठी आपली भुमिका मांडली आहे. अर्थात ती काही गैर नाही. तर, निवडणुकीतील आकडेवारी पाहता कैलास वाकचौरे यांच्यामुळे पक्षाला बर्यापैकी फायदा झाला आहे. त्यामुळे, नेमकी जेष्ठांचा फॉर्म्युला लावला तर यातून नेमके कोण? हा फार महत्वाचा मुद्दा ठरणार आहे.
यंग जनरेशन होऊ शकते.!
खरंतर, गायकर साहेब हे जुन्या फळीतले आहेत. ते कारखान्यात सर्वस्व नेतृत्व करणार आहे. त्यामुळे, त्यांच्यासोबत कसोशीने धावपळ करण्यासाठी जर नव्या चेहर्यांना संधी द्यायची ठरली तर ते काही वावघे ठरणार नाही. त्यात विकासराव शेटे, विक्रमभाऊ नवले, प्रदिपजी हासे, मनोज देशमुख, सुधिर शेळके सचिन दराडे यांचा देखील विचार होऊ शकतो. तर, विकासराव आणि विक्रमभाऊ यांची नावे येथे आघाडीवर राहु शकतात. तर, येथे जर कॉंग्रेस म्हणून काही प्रश्न उभे केले. तर, कॉंग्रेसला संधी देण्याचा विचार केल्यास देखील विक्रमभाऊ यांना आज किंवा येणार्या काळात संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे, सिनियर आणि ज्युनियर यात तरुणांना संधी मिळाल्यास जनतेत चांगला मेसेज जाऊ शकतो. मात्र, दादा काय निर्णय घेतात हे महत्वाचे आहे.
आदिवासी बांधवांना संधी.!
खरंतर, डॉ. किरण लहामटे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. आम्हाला आमदारकी आहे. त्यामुळे, येथील स्थानिक स्वराज्यसंस्था आणि सहकार यात वैयक्तीक मला तरी वाटा नको आहे. बहुजन समाजाला प्रतिनिधित्व मिळावे इतकीच माझी प्रांजळ इच्छा आहे. तर, ज्या जनतेने आपल्यावर विश्वास टाकला आहे. त्यांना हा कारखाना कर्जमुक्तीकडे नेवून दाखवायचा आहे. त्यामुळे, ती सुरूवात मी माझ्या कुटुंबापासून केली आहे. कारण, त्यांनी जी काही ९ ते १० नावे व्हा.चेअरमन पदासाठी दादांकडे पाठविली आहे. त्यात त्यांचे वडील यमाजी लहामटे यांचे नाव नाही. तर, आता अशोकराव भांगरे यांची काय भुमिका आहे. त्याबाबत स्पष्टोक्ती नाही. त्यामुळे, त्यांच्या मनातील चलबिचल वेगळी आहे. विशेष म्हणजे आता जिल्हा परिषद अध्यक्ष आरक्षण हे आदिवासी बांधवांसाठी राखीव आहे. त्यामुळे, त्यांनी जिल्ह्यात पुन्हा नेतृत्व केले तर अधिक चांगले होईल. मात्र, त्यांनी नकळत का होईना आपली इच्छा कारखान्यात व्यक्त केल्याने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
हा बाजार कशासाठी?
खरंतर, समृद्धी मंडळाचे उमेदवार हे डॉ. लहामटे, सिताराम पाटील गायकर, अशोकराव भांगरे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले होते. त्यात गायकर साहेबांची भुमिका फार महत्वाची होती. तर, चेअरमन म्हणून त्यांची एकमताची निवड असून व्हा.चेअरमन करण्यासाठी बैठका घेणे, नावे मुंबईला पाठविणे, प्रत्येकाची मने जाणून घेणे हा खेळ मांडणे हे काही सुज्ञ व्यक्तीना पटले नाही. हा एक तालुक्याचा शुल्लक विषय होता, निवडणुकीत कोणाचे किती योगदान आहे, कोणी किती मदत केली आहे, कोण कोणाच्या जिवावर निवडून आले आहे, कोणी सर्वाधिक धावपळ केली आहे हे प्रत्येकाला माहित होते. त्यामुळे, ज्याने त्याने अंथरुन पाहून पाय पसरणे अपेक्षित होते. चारदोन महत्वाच्या नेत्यांनी बसून हा प्रश्न सहज साडविला असता. इतकी लोकशाही दाखविली की, काहींनी थेट चेअरमन पदावर दावा केला. त्यामुळे, आमदारांसह गायकर साहेबांच्या शब्दापुढे कोणी गेले नसते. अगदी उद्या निवड आहे तरी व्हा-चेअरमन कोण? हे माहित नाही. त्यामुळे, उद्याचे नाराजीनाट्य काही कमी असेल असे नाही.
हा तोडगा काढला पाहिजे.!
खरंतर, उद्या व्हा-चेअरमन आणि तज्ञ संचालक म्हणून काही व्यक्तींची निवड होण्याची शक्यता आहे. खरंतर, तज्ञांना वेळ असू शकतो. मात्र, व्हा-चेअरमनची उत्सुकता बाकी फार मोठी आहे. आता हे यश काही एकाचे नाही. त्यामुळे, वर्षे-वर्षे किंवा प्लस मायनस करून योग्य व्यक्तींना संधी देणे गरजेचे आहे. तर, तज्ञ संचालक म्हणून देखील ज्यांचे फार योगदान आहे. ज्यांना शब्द दिले आहेत तो पुर्ण करणे अपेक्षित आहे. तर, हे करत असताना जरा सामाजिक क्रायटेरीया देखील लक्षात घेणे गरजेचे आहे. प्रत्येक सामाजाला कसे प्रतिनिधित्व मिळेल याचा विचार केला पाहिजे. आता हे सर्व अवघड असले तरी यातून काहीतरी सुवर्णमध्य काढणे फार महत्वाचे आहे. मात्र, काहींनी नाराज होण्याचे काही काम नाही. जे निष्ठावान आहे, त्यांनी मनात शंका देखील आणण्याचे गरज नाही. गायकर साहेबांनी तिकीट दिले नाही तरी निष्ठेने काम करणारी काही नेते मंडळी आहेत. त्यामुळे, आपला माणूस म्हणून प्रत्येकाने नाराज न होता. सामंजस्याने कारखान्यात एकोप्याने काम करणे अपेक्षित आहे. कारखान्यात कुरघोडीचे राजकारण केले तर काय होईल. हे नव्याने सांगण्याची गरज नाही.!!!