पोलीस अधिकार्याने पोलीस कर्मचार्याकडे १० लाख मागितले.! पोलीस कर्मचार्याने स्वत:ची गोळ्या घालुन आत्महत्या केली.! अकोल्यातील धक्कादायक प्रकार.!
सार्वभौम (अकोले) :-
पोलीस अधिकार्यांनी षडयंत्र रचून एका पोलीस कॉन्स्टेबरलवर महिला पोलीसाने विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला होता. तो गुन्हा मागे घेण्यासाठी आणि अवैध धंद्यातून ५ लाख नुकसान झाले. असे १० लाख रुपयांची मागणी कर्मचार्याकडे केली होती. हा सर्व प्रकार पोलीस अधिक्षकांना सांगून देखील त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे, प्रचंड तणावाखाली आलेले पोलीस कर्मचारी भाऊसाहेब दगडू आघाव (राजूर पोलीस ठाणे) यांनी स्वत:ला गोळी घालुन आत्महत्या केली. ही घटना शनिवार दि. १ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळच्या वेळी घडली. यात आघाव यांनी सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश रामभाऊ निमसे, शिवाजी फुंदे आणि एका महिला पोलीसाच्या नावे चिठ्ठी लिहून यांना आत्महत्येस कारणीभूत धरावे असे म्हटले आहे. त्यामुळे, राजुरमधील हाप्तेखोरी, खोटारडे गुन्हे आणि पोलीस खाते किती भ्रष्ट आहे. हे या चिठ्ठीतून पुढे आले आहे. आता पोलीस अधिकार्यांनी या घटनेची चौकशी सुरू केली असून यात नेमकी काय होते. याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भाऊसाहेब आघाव हे मुख्यालयात नेमणुकीस होते. तर त्यांची ड्युटी राहुरी तालुक्यातील मुळा डॅम येथील मुख्य गेटवर लावण्यात आली होती. ते जेव्हा राजूर पोलीस ठाण्यात नेमणुकीला होते. तेव्हा त्यांच्यावर विनयभंगाचा एक खोटा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला होता. तेव्हा त्यांना मुख्यालयात जमा केले होते. मात्र, तेव्हापासून ते म्हणत होते. की, मी असा काही प्रकार केला नाही. उगच मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणात त्यांची खात्या अंतर्गत चौकशी देखील चालु होती. तर, हा गुन्हा केवळ आकस बुद्धीने दाखल केला होता. असे आता सुसाईड नोटनुसार पुढे येऊ लागले आहे. जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हापासून ते प्रचंड अस्वस्थ होते. मात्र, जेव्हा पोलीस खात्यात देखील आपल्याला न्याय मिळत नाही. तेव्हा त्यांनी स्वत:वर गोळी झाडून संपवून घेतले आहे.
त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. की, अजित दादा पवार यांच्या बंदोबस्तासाठी मी अकोल्याला गेलो होते. तेव्हा मला तेथे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे साहेब भेटले. ते म्हणाले की, तुम्ही शेंडी येथे ओपी असताना सर्व दोन नंबर धंदे बंद केले. त्यामुळे, मला ५ लाख रुपयांचे नुकसान झाले. मी एएसआय निमसे यांना हाताशी धरुन एका महिला पोलीस कर्मचार्याच्या माध्यमातून तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मला शेंडी ओपीचे पैसे चालु झाले. आता तुम्ही मला १० लाख रुपये द्या. मी तुम्हाला या गुन्ह्यातून सोडवितो. तेव्हा आघाव म्हणाले की, मी १० लाख रुपये कशाचे देऊ.! तेव्हा साबळे म्हणाले. की, ५ लाख रुपये माझे आणि विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी निमसे याने महिला कर्मचार्यास तयार केले. म्हणून त्याला दोन लाख रुपये द्यावे लागेल तर गुन्हा मागे घेण्यासाठी महिला कर्मचार्यास तीन लाख रुपये द्यावे लागतील. असे १० लाख द्या.
तर, या व्यतिरिक्त तुमची विभागीय चौकशी चालु आहे. त्यातून बाहेर काढण्यासाठी डी.ई चे काम पाहणारे शिवाजी फुंदे भाऊसाहेब यांना एक लाख रुपये द्यावे लागणार आहे. तेव्हा आघाव साबळे यांना म्हणाले. की, इतकी मोठी रक्कम माझ्याकडे नाही असे म्हणून ते निघुन गेले. त्यानंतर काही दिवसांनी विभागीय चौकशी झाली आहे असे म्हणून फुंदे यांनी आघाव यांना बोलावून घेतले. तेव्हा फुंदे म्हणाले की, मी तुम्हाला चौकशी अहवालातून सुखरुप बाहेर काढले आहे. त्यामुळे, आता साबळे साहेबांनी जसे सांगितले तसे करा. मात्र, तेव्हा देखील आघाव यांना सांगितले. की, माझ्याकडे इतके पैसे नाहीत. मी ही रक्कम देऊ शकत नाही. तेव्हा देखील आघाव तेथून निघुन गेले. आता १० लाख रुपये आणायचे कोठून? यांने पैसे द्यायचे कसे? अशा अनेक प्रश्नांमध्ये आघाव प्रचंड तणावात जिवण जगत होते. मात्र, एक अंतीम पर्याय म्हणून त्यांनी पोलीस अधिक्षकांकडे आपली कैफित मांडली.
दरम्यान, जेव्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी आघाव यांना वॉर साठी बोलविले होते. तेव्हा, आघाव यांनी त्यांच्याबाबत घडलेला प्रकार कथन केला होता. मात्र, पोलीस अधिक्षक महोयद यांनी त्यांच्याकडे फार गांभिर्याने पाहिले नाही. जर, एक बॉस म्हणून आरोप का होईना. चौकशी करतो, पाहतो असे काही सांगितले असते. तर, कदाचित त्यांचाच सहकारी आज त्यांच्यात असता. मात्र, पोलीस अधिक्षकांना आघाव यांची तक्रार फार महत्वाची वाटली नाही. सर्व घटनाक्रम एकेल्यानंतर पाटील साहेबांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. असे चिठ्ठीत म्हटले आहे. त्यामुळे, आज न्यायाचे सर्व दरवाजे बंद झाल्याने मी हताश झालो आहे. म्हणून मी माझे जीवण संपवत आहे. माझ्या मृत्युला सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश रामभाऊ निमसे, शिवाजी फुंदे आणि एका महिला अशा चौघांना दोषी धरावे असे म्हटले आहे.