टोकाच्या वादातून प्रेयसीची हत्या करुन प्रियकराने आत्महत्या केली, सैराटची पुनरावृत्ती तर नाही ना.! तपास सुरु.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

               संगमनेर शहरातील इंदिरा नगर परिसरात पतीने पत्नीची हत्या केली. नंतर स्वतः गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना रविवार दि.7 सप्टेंबर रोजी दुपारी 2:40 दरम्यान घडली. यामध्ये वैष्णवी संजय खांडेकर (वय 22,रा.घोडेकर मळा, ता. संगमनेर), कुलदीप सुनील अडांगळे (वय 35 ,रा. इंदिरानगर,ता. संगमनेर) असे मयत व्यक्तींचे नाव आहे. तर ही हत्या का करण्यात आली. हे कारण अद्यापही गुलदस्त्यात असले तरी मुलीच्या डोक्यावर घाव असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे, डोक्याला मार लागल्याने डोक्याध्ये मोठ्याप्रमाणात रक्तस्राव झाला असावा अशी माहिती समोर येत असुन. पुढील तपास पोलीस करत आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  कुलदीप अडांगळे हा संगमनेर शहरातील इंदिरागल्ली येथे राहत होता. तो ड्रायव्हिंग करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. वैष्णवी देखील संगमनेर शहरात राहत होती. ती ब्युटी पार्लरचा कोर्स करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत होती. कुलदीप हा देखील याच परिसरात राहत असल्याने तो ड्रायव्हिंगचे काम करत होता. त्यामुळे, तो ब्युटी पार्लर येथील महिलांना चारचाकी वाहनात ये-जा करून सोडवत होता. तेथे वैष्णवी व कुलदीपची ओळख झाली. त्यानंतर हाय, हॅलो सुरू झाले. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांचे मन जुळवू लागले.

           दरम्यान, कुलदीप आणि वैष्णवी यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, लग्नाला घरचे होकार देतील का? त्यामुळे दोघांनीही पळून जाऊन लग्न केले. लग्न केल्यानंतर मुंबई येथे स्थाईक झाले. कुलदीप हा ड्रायव्हिंग करत असल्याने त्याने एका शाळेत स्कुलबसवर ड्रायव्हिंग करू लागला. तर वैष्णवी ही देखील घर सांभाळून जॉब करत होती. काहीकाळ लोटल्यानंतर दोघांमध्ये छोट्या-छोट्या कारणावरून वाद होऊ लागले. वारंवार होणाऱ्या वादाला कंटाळुन वैष्णवी ही काही महिन्यांपूर्वी संगमनेरला माहेरी निघून आली. त्यानंतर काही दिवसांनी कुलदीप हा देखील संगमनेरला आला. तो आल्यानंतर वैष्णवीला भेटण्यासाठी गेला. त्याने वैष्णवीची समजुत काढण्याचा प्रयत्न केला. 

         दरम्यान, कुलदीपने आपली पत्नी वैष्णवी हिला इंदिरागल्ली मधील आपल्या घरी आणले. तेथे देखील वाद होऊ लागले. हा वाद इतका टोकाला गेला की, यामध्ये वैष्णवीच्या डोक्याला मार लागला. तिचा डोक्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. ती जागीच खाली कोसळली तिचा मृत्यु झाल्याचे लक्षात येताच कुलदीप याने टोकाचे पाऊल उचलले. त्याने देखील गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली.  यामध्ये वैष्णवी संजय खांडेकर (वय 22, रा. घोडेकरमळा, ता. संगमनेर), कुलदीप सुनील अडांगळे (वय 35, रा. इंदिरागल्ली, ता. संगमनेर) हे मयत झाले आहे. ही घटना काही नातेवाईकांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर दोघांची बॉडी शवविच्छेदन करिता ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी येथे नेण्यात आले. महिलेचे शवविच्छेदन लोणी येथे करण्यात आले. शवविच्छेदनात वैष्णवी हिच्या डोक्यात रक्तश्राव झाल्याचे समोर आले आहे. वैष्णवीचा अकस्मात मृत्यू नसुन खुन करण्यात आला आहे. हा खुन का करण्यात आला? याचे कारण अद्याप गुलदस्त्यात असले तरी पोलीस याचा पुढील तपास करत आहे.