..अखेर मा.मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नीवर संगमनेरात गुन्हा दाखल.! ३४ लाख ४५ हजारांची फसवणूक केली.!सार्वभौमच्या वृत्ताने जाग आली.!
सार्वभौम (संगमनेर) :-
रोखठोक सार्वभौमच्या बातमीनंतर संगमनेर पोलिसांना जाग आली आहे. कारण, पहिली तक्रार पाहून दुसरी व्यक्ती मुंबईहून येतो आणि रातोरात गुन्हा दाखल करुन निघुन जाते. हा कोणता न्याय आहे.? याबाबत रोखठोक सार्वभौमने आवाज उठविला असता. आज दि. 3 सप्टेंबर रोजी रात्री मा. मंत्री धनंजय मुंडे यांची पत्नी करुणा मुंडे यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करुणा मुंडे यांना नवा पक्ष काढायचा होता. त्यासाठी ४० लाख रुपयांची गरज होती. म्हणून त्यांनी भारत संभाजी भोसले (रा. कोंची, ता. संगमनेर, जि. अ.नगर) यांना बळीचा बकरा करुन ३४ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केली. तर, मुंडे यांनी पक्ष काढला नाही मग पैसे घेतले कशासाठी.? म्हणून भोसले यांनी पैशीची मागणी केली असता. मुंडे यांनी उडवाउडविची उत्तरे दिली. त्यानंतर भारत भोसले यांनी या प्रकरणाबाबत पोलिसांना सांगितले तर पोलिसांनी या प्रकरणाला दिवाणी खटला असे सांगून भोसले यांना काढून दिले. तेव्हा भोसले यांनी पोलीस अधिक्षकांचे दार ठोठावले. मात्र झाले काय? पुन्हा भिजत घोंगडे पडले. मात्र ही बाब करुणा मुंडे यांना समजली असता त्यांनी रातोरात संगमनेर गाठले आणि फिर्याद देऊन भोसले यांना आरोपी केले. अर्थात गुन्हा दाखल झाला तो खरा की खोटा हेच शोधण्याचे काम पोलिसांचे आहे. मात्र, नेत्याची बायको म्हणून वेगळा न्याय आणि सामान्य माणूस असला की वेगळा न्याय. असली दुटप्पी भूमिका वर्दीकडून अपेक्षित नाही. मुळात संगमनेर पोलीस ठाण्यात प्रचंड मोठा राजकीय हस्तक्षेप आहे. त्यामुळेच खऱ्या अर्थाने शहरात अराजकता माजत चालली आहे. तोंड पाहून कामे करायची आणि मलिदा भेटेल त्यातच इन्ट्रेस दाखवायचा. असली घाणेरडी पोलिसिंग नगर जिल्ह्यात कोठे गेल्या २० वर्षात पहायला मिळाली नाही ती संगमनेरात दिसू लागली आहे. असे मत सुज्ञ व्यक्तींनी मांडले आहे. आता मुंडे यांनी भोसले यांच्या मोबाईलवर खल्लास करण्याची धमकी दिली आहे. तर भोसले हे देखील काही कमी उपद्व्यापी नाहीत. त्यामुळे, या प्रकरणाला आता नेमके काय वळण लागते. याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, भोसले यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, करुणा मुंडे आणि माझी ओळख झाली होती. त्यांना एक नवा पक्ष उभा करायचा होता. त्यासाठी त्यांनी माझ्याकडून ४ लाख रुपये घेतले होते. मात्र, त्यानंतर मुंडे यांनी माझ्याकडे ३६ लाख रुपयांची मागणी केली. कारण पक्ष स्थापन करण्यासाठी ४० लाख रुपये हवे असे त्यांनी सांगितले होते. आता ३६ लाख ही रक्कम फार मोठी असल्याने भोसले यांनी असमर्थता दर्शविली. मात्र, मुंडे ताई यांनी सोने गहाण ठेऊन पैसे द्या. मी नंतर देईल असे सांगितले. म्हणून भोसले यांनी त्यांच्याकडील १३.७३० तोळे व त्यांचे मित्र बालमभाई शेख यांचेकडील ११.१२२ तोळे सोने एका बँकेत गहाण ठेवले आणि पहिल्यांदा २२ लाख ४५ हजार व नंतर १२ लाख असे ३४ लाख ४५ हजार रुपये करुणा मुंडे यांच्या एचडीएफसी बँकेत वर्ग केले. मात्र, पक्ष उभारणीसाठी ४० लाख रुपये झाले नव्हते. त्यामुळे, आणखी काही तडजोड करणे गरजेचे होते.
दरम्यान, ३४ लाख ४५ हजार रुपये करुणा मुंडे यांना दिले होते. पुढे विद्या संतोष आभंग यांच्या मालकीचा घुलेवाडी येथील बंगला दि. ७ जानेवारी २०२२ रोजी मुंडे यांनी नोंदवून घेतला आहेत. कारण, हा बंगला म्हणजे पक्षाचे कार्यालय असेल असे दाखविण्यासाठी नोंद करुन फसवणुक केल्याचे म्हटले आहे. त्यानंतर संगमनेर येथे दि. ७ जानेवारी २०२२ रोजी करुणा मुंडे यांनी विद्या आभंग यांना ९ लाख १० हजार इतकी रक्कम दिली. तर त्यातील ५ लाख रुपये हे पुन्हा मुंडे यांच्या खात्यावर दि. ११ फेब्रुवारी २०२२ रोजी वर्ग केले आहेत. तर उर्वरीत रक्कम त्यांना रोख दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तर, काही दिवस उलटले तरी करुणा मुंडे यांना पक्षाची नोंदणी केली नाही. त्यामुळे, भोसले यांनी पैसे परत करण्याची विनंती केली. मात्र, ताईंनी वारंवार टाळाटाळ व उडवाउडविची उत्तरे दिली. तेव्हा भोसले यांना खात्री झाली. की, ताईंनी आपला विश्वास संपादन करुन गोड बोलून कार्यक्रम केला आहे. म्हणून झालेल्या ३४ लाख ४५ हजार रुपयांच्या व्यावहाराची सर्व कागदपत्रे घेऊन भोसले यांनी पोलीस ठाणे गाठले. मात्र, त्यांना न्याय मिळाला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील चालढकल केल्याने त्यांनी थेट पोलीस अधिक्षक कार्यालय गाठले आणि पुराव्यासह कागदपत्रे सादर केली. मात्र, पोलीस अधिक्षक कार्यालयातून देखील योग्यतो प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, माध्यमांनी विशेषत: सार्वभौमने यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असता पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यात करुणा धनंजय मुंडे उर्फ करुणा अशोक शर्मा यांच्यावर कलम ४२० व ५०६ नुसार आरोपी करण्यात आले आहे.
हे वागणे बरे नव्हे.!
गेल्या कित्तेक वर्षापासून संगमनेर तालुक्यातील सर्वच पोलीस ठाण्यात तोंड पाहून गुन्हे दाखल केले जातात अशा प्रकारचा आरोप केला जात आहे. एव्हाना राजकीय हस्तक्षेपाशिवाय पोलिसांना संविधानाची आंमलबजावणी अशक्य वाटू लागली आहे की काय.? अशा प्रकारचा सवाल जनतेच्या मनात आहे. कारण, थोडं कटू वाटेल पण पोलीस ठाणे म्हणजे राजकीय उणिधुणी व कड काढण्याचे आड्डे बनू पहात आहे. अर्थातच हे प्रॉपर पोलिसिंग आणि लोकशाहीला प्रचंड घातक आहे. विशेषत: खुद्द पोलिसांना तर अधिक हानिकारक आहे. त्यामुळे, पोलिसांनी तरी राजकीय व्यक्तींच्या ताटाखालचे मांजर होऊन काम करणे अपेक्षित नाही. संगमनेर शहरातील गुन्ह्यांचा सर्वे केला तर लक्षात येईल. की, असे कित्तेक गुन्हे आहेत ज्यात हकनाक प्रतिष्ठीत व्यक्ती, सरकारी कर्मचारी, अगदी पोलीस देखील आणि पत्रकार, समाजसेवक यांना गुन्ह्याच्या स्वरुपात बळी दिले आहे. हे सुसंस्कृत पणाचे लक्षण नसून लोकशाही, सार्वभौमत्व आणि व्यक्तीस्वतंत्र्यावर गंडांतर आणणारी बाब आहे. सुदैवाने संगमनेरात अद्याप सामाजिक चळवळी जिवंत आहेत. त्यामुळे, सामान्य व्यक्तींना झगडून, भांडून, संघर्ष करुन का होईना न्याय मिळेल आशी आपेक्षा ठेऊ..!!