शिक्षक महिलेवर मित्राचा अत्याचार, अनैतिक संबंधातून गर्भ आणि नारळाच्या पाण्यातून बाळाची पोटातच हत्या.! संगमनेरच्या दोघांवर गुन्हा दाखल.!
सार्वभौम (संगमनेर) :-
एका 41वर्षीय शिक्षक महिलेची संगमनेरात जुनी पेन्शन हक्क संघटने मध्ये एका युवकाबरोबर ओळख झाली. मग काय.! फोनवर हाय बाय बोलुन या तरुणाचे शिक्षक महिलेवर प्रेम जडले. तु मला फार आवडते अशा बड्याबड्या बाता करून त्याने लग्नाचे आमिष दाखविले आणि चारचाकी गाडीत रस्त्याच्या कडेला कोकणगाव परिसरात जबरी संभोग केला. यातुन शिक्षक महिला गर्भवती राहिली. या तरुणाने शिक्षक महिलेला विचारात घेऊन गोडी-गोडीत नारळाच्या पाण्यातुन औषध देऊन गर्भपात देखील केला. या दरम्यान दोघांमध्ये वाद झाला तेव्हा या तरुणाने व त्याच्या मित्राने शिक्षक महिलेला मारून टाकण्याची धमकी दिली. ही धक्कादायक घटना दि. 25 जुन 2022 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र, तेव्हापासून तर आजवर आरोपी तरुण हा वेळोवेळी पिडीत शिक्षक महिलेला आश्वासन देऊन विचारात घेऊन भेटत गेला. परंतु, नंतर फोन उचलला नाही व भेटायला देखील आला नाही नंतर पिडीत शिक्षक महिलेला आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे, मंगळवार दि. 20 सप्टेंबर 2022 रोजी पिडीत महिला शिक्षकाने संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले आणि आपली तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी योगेश अण्णासाहेब थोरात (रा.घुलेवाडी,ता. संगमनेर) व त्याचा मित्र गणेश शेंगाळ (रा.संगमनेर) या दोघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महाले करत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 41 वर्षीय पिडीत शिक्षक महिला राहुरी तालुक्यात एका मराठी शाळेवर शिक्षिका आहे. तिचा 2010 साली पतीसोबत घटस्फोट झाला होता. तेव्हापासून शिक्षक महिला विभक्त राहते. पिडीत शिक्षक महिलेची जुलै 2019 मध्ये पेन्शन संदर्भात शिक्षक महिलेची ओळख आरोपी योगेश थोरात या युवका बरोबर झाली. पिडीत शिक्षक महिला व आरोपी योगेश थोरात हे एमपीएससीचा अभ्यास करत असल्याने दोघांमध्ये नेहमी फोनवर सारखे बोलणे होत होते, त्यातूनच त्यांची घट्ट मैत्री झाली. पिडीत शिक्षक महिला व आरोपी योगेश थोरात यांच्यामध्ये मैत्रीपलीकडे जवळीक वाढु लागल्याने पिडीत महिला शिक्षिकेने आरोपी योगेश थोरातला सांगितले की, मी एक घटस्फोट महिला असुन मला एक अठरा वर्षांचा मुलगा आहे. मी तुझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे. त्यामुळे, आपण मैत्रीच्या मर्यादा ओलांडायला नको. परंतु त्यावेळी आरोपी योगेश थोरात म्हणाला की, या गोष्टीचा मला काही एक फरक पडत नाही. माझे तुझ्यावर अतोनात आत प्रेम आहे. मी तुझ्यासोबत लग्न करून तुला आयुष्यभर सांभाळेल. हे बोलणे पिडीत शिक्षक महिलेला भावनिक वाटल्यामुळे आरोपी योगेश थोरात बरोबर अजुन जवळीक वाढली. त्यामुळे, पिडीत शिक्षक महिला आरोपी योगेशला भेटण्यासाठी अधुन-मधुन संगमनेरला येत होत्या. तर आरोपी योगेश थोरात हा देखील पिडीत शिक्षक महिलेच्या घरी राहुरी येथे जात होता. आरोपी योगेश थोरात हा पिडीत शिक्षक महिलेला म्हणायचा की, गाडी रिपेअरसाठी व वडीलांच्या आजारासाठी पैशांची गरज आहे. तेव्हा पिडीत शिक्षक महिलेने आरोपी योगेश थोरात याच्या बँक खात्यावर तीन लाख पन्नास हजार रुपये टाकले. त्यापैकी, आरोपी योगेशने एक लाख परत केले. त्यावेळी आरोपी योगेश हा पिडीत शिक्षक महिलेला पुणे येथील लॉजवर वेळोवेळी घेऊन गेला व तेथे मी तुझ्या सोबत आहे. मी तुझ्या सोबत लग्न करेल व तुला आयुष्यभर सांभाळेल असे म्हणायचा.
दरम्यान, ऑक्टोबर 2021 मध्ये आरोपी योगेश पिडीत महिला शिक्षिकेला म्हणाला की, घरातील लोक मला लग्न करण्यासाठी फोर्स करत आहे. माझी आई म्हणत आहे. मी सांगितलेल्या मुलींशीच तुला लग्न करावा लागेल. तेव्हा पिडीत महिला शिक्षक म्हणाली की, तु मला असं फसवु शकत नाही. प्रेम माझ्या सोबत व लग्न दुसऱ्या सोबत तु असं कसं काय करू शकतो. तेव्हा आरोपी योगेश म्हणाला ठीक आहे. मी नाही लग्न करणार असे बोलुन आरोपी योगेशने तो विषय थांबवला. जानेवारी 2022 मध्ये आरोपी योगेशने पुन्हा त्याचा लग्नाचा विषय काढला की, आता माझे घरातील लोक ऐकत नाही. मला आता लग्न करावेच लागेल. असे म्हणुन आरोपी योगेशने पिडीत शिक्षक महिलेला भावनिक करून तु जर मला लग्न करू दिले नाही. तर माझी बॉडीच दोन ते चार दिवसात घरी येईल. तेव्हा पिडीत महिलेकडे कुठलाच पर्याय शिल्लक नसल्याने पिडीत शिक्षक महिलेने लग्न करण्यापासुन आरोपी योगेशला थांबवु शकली नाही. आरोपी योगेश त्यावेळी पिडीत शिक्षक महिलेला म्हणाला की, मी फक्त माझ्या आईसाठी लग्न करीत आहे. माझे प्रेम फक्त तुझ्यावर आहे. मी तुला कधीच अंतर देणार नाही. असे म्हणुन तो हळदीच्या दिवशी संगमनेर वरून राहुरीला पिडीत महिला शिक्षकाला भेटण्यासाठी गेला. आरोपी योगेशचे लग्न झाल्यापासून पिडीत शिक्षक महिला त्याच्यापासून तुटक राहत होती. परंतु आरोपी योगेश हा पिडीत महिला शिक्षकाला सारखा भेटत होता. आणि म्हणत होता की, मला मुलगी आवडली नाही. मी तिला घटस्फोट देणार आहे. आपण त्यानंतर कोर्ट मॅरेज करू. तेव्हा पिडीत महिला शिक्षिका म्हणाली की, आपले कोर्ट मॅरेज झाल्यावरच आपल्यात नाजुक संबंध होतील.
दरम्यान, आरोपी योगेश याने पिडीत महिला शिक्षिकेला 25 जुन 2022 रोजी संगमनेरला भेटण्यासाठी बोलवले. पिडीत शिक्षिका भेटुन सोडवण्यासाठी आरोपी योगेश चारचाकी गाडी मध्ये राहुरीला सोडवण्यासाठी चालला होता.आरोपी योगेशने आठ वाजण्याच्या दरम्यान कोकणगाव परिसरात गाडी थांबवली व रस्तेच्या कडेला गाडी थोडी आत मध्ये नेऊन चारचाकी गाडीमध्ये आरोपी योगेशने पिडीत शिक्षक महिलेच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. पिडीत शिक्षक महिलेने विरोध केला व रडुन म्हणाली की, तुझ्या विरुद्ध पोलिसात तक्रार करते. असे म्हटल्यावर आरोपी योगेश म्हणाला की, आपल्याला बाळ हवे आहे ना. आपण कोर्ट मॅरेज करणार आहोत व बरोबर राहणार आहोत. तु फक्त थोडे दिवस थांब माझी तक्रार पोलिसात करू नको. आरोपी योगेशने बलात्कार केल्यानंतर थोड्या दिवसात गरोदर असल्याचे पिडीत महिला शिक्षिकेला जाणू लागले. तेव्हा पिडीत शिक्षक महिला म्हणाली की, आपण सोबत राहणे गरजेचे आहे. दि. 28 जुलै 2022 रोजी आरोपी योगेश व पिडीत महिला शिक्षिका कोल्हार ते बाभळेश्वर रोडवर जात असताना आरोपी योगेश पिडीत शिक्षिकेला म्हणाला मी तुला नारळ पाणी पाजतो, असे म्हणुन त्याने गाडी बाजुला घेऊन गाडीच्या डिक्कीतुन दोन पाण्याच्या नारळा मधुन पाणी काढुन ते दोन प्लास्टिकचे ग्लास मध्ये घेऊन आला. पिडीत शिक्षक महिलेला ते पाणी जास्त गढूळ वाटले. त्यामुळे नारळ पाणी पिण्यास नकार दिला. आरोपी योगेश पिडीत शिक्षक महिलेला म्हणाला की, तुला आपल्या बाळाची काळजी नाही. नारळ पाणी शरीरासाठी चांगले असते. असे म्हणुन पिडीत शिक्षक महिलेला बळजबरीने दोन ग्लास नारळ पाणी पाजले.त्यामध्ये गर्भपाताचे औषध ओतले आहे याची कल्पना देखील पिडीत शिक्षक महिलेला येऊन दिली नाही.
दरम्यान, पिडीत शिक्षक महिलेला घरी गेल्यावर त्रास होऊ लागला. पोटात दुखत असल्याने फोनवर आरोपी योगेश याला बोलावुन घेतले. आरोपी योगेश पिडीत शिक्षक महिलेला घेऊन अहमदनगरच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये रात्री 1:30 वाजता घेऊन गेला. तेथे डॉक्टरने पिडीत शिक्षक महिलेची सोनोग्राफी करून पुढील उपचारासाठी ऍडमिट केले. त्यानंतर 1 ऑगस्ट 2022 रोजी डॉक्टरांनी सांगितले की बाळ मयत झालेले असुन तुमची क्रिएटिंग करावी लागेल. त्यानंतर, पिडीत शिक्षक महिला बाळ का मेले असे कारण डॉक्टरांना विचारले असता त्यांनी पिडीत शिक्षक महिलेचे रिपोर्ट हैद्राबादला पाठवले. दि.18 ऑगस्टला हैद्राबाद वरून रिपोर्ट आल्यावर पिडीत शिक्षक महिला व आरोपी योगेश डॉक्टरांकडे गेले. तेव्हा डॉक्टरांनी पिडीत शिक्षिकेला सांगितले की, तुम्हाला गर्भधारणा राहू शकते. तुम्ही त्याबाबत फीट आहे. तेव्हा पिडीत शिक्षक महिलेची खात्री झाली की, आरोपी योगेश याने पिडीत शिक्षक महिलेला पिण्यासाठी दिलेले नारळ पाणी व दही यामध्ये काही तरी मिक्स करून मला खाण्यास दिल्याने गर्भपात झालेला आहे.
दरम्यान, पिडीत शिक्षक महिला संगमनेरला आली असता समजले की, आरोपी योगेश याने एका महिलेकडून गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या होत्या. पिडीत शिक्षक महिला संगमनेरला खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत असताना त्यांची रस्तामध्ये भेट आरोपी योगेश सोबत होती. आरोपी योगेश सोबत त्याचा मित्र आरोपी गणेश शेंगाळ व एक बाई सोबत होती. आरोपी योगेश व गणेश याने पिडीत शिक्षिकेला बळजबरीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पिडीत शिक्षक महिला आरोपी योगेशला म्हणाली की,मी तुझ्या सोबत येईल. तेव्हा आरोपी गणेश शेंगाळ पिडीत महिला शिक्षिकेला म्हणाला की, तु शिस्तीत गाडीत बस नाहीतर तुला येथेच जिवंत मारून टाकेल. तेव्हा आरोपी योगेश म्हणाला की, पिडीत शिक्षक महिलेला अगोदरच मारून टाकायला हवे होते. त्यानंतर, पिडीत शिक्षक महिलेला समजले की, आरोपी योगेश याने माझ्या प्रमाणे संगमनेर मधील सात ते आठ महिलांना आपल्या प्रेमात फसवले असुन त्यांच्याकडून पैसे उकळले आहे. त्यामुळे, पिडीत शिक्षक महिलेचे डोळे उघडले व थेट पोलीस ठाण्यात जाऊन हा सर्व प्रकार कथन केला. त्यानंतर, मुख्य आरोपी योगेश अण्णासाहेब थोरात (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) याच्यासह त्याचा मित्र गणेश शेंगाळ (रा. संगमनेर)यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले करत आहेत.