खरच भाऊ अकोल्याचे भाग्यविधाते आहे का? तुम्हीच ठरवा.! प्रेम असावं पण आंधळं नको.! चापलुशांना कळेनाच कशाला म्हणावं भाग्यविधाते.!

        


सार्वभौम (अकोले) :-

        अगदी काल परवा एका तरुणाने भावनेच्या भरात भलामोठा लेख लिहीला होता. त्यात बोल्ड अक्षरात म्हटले होते, वैभव पिचड म्हणजे अकोल्याचे भाग्यविधाते. त्यात पत्रकारांवर देखील टिका टिप्पण्णी केली होती. त्यामुळे, सोशल मीडियावर तो एक चर्चेचा विषय ठरला होता. तेव्हा खर्‍या अर्थाने प्रश्न पडला. की, जे दुसर्‍याला वाईट म्हणतात. ज्यांचा नको तसा उदोउदो करतात. त्यांना तालुक्याचे भाग्यविधाते वैगरे म्हणतात. यात खरोखर तत्थ्य आहे का? म्हणून काही बाबी प्रकर्षाने अनेकांनी बोलुन दाखविल्या. त्या सार्वभौमच्या माध्यमातून अनेकांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पहिला प्रश्न असा की, भाऊंनी असे काय काम केले? ज्यातून तालुक्याचे भाग्य उजळले आहे? येथे पहिला मुद्द स्पष्ट करावा लागेल. की, आदरणीय मधुकर पिचड साहेबांच्या कार्यकाळात जे काही झाले. ते म्हणजे भाऊंनी केलं.! असला शोध कोणी लावला नाही म्हणजे बरं.! कारण, या तालुक्यात माजी मंत्री पिचड साहेबांच्या कार्याची तुलना तालुक्यातील कोणत्याही नेत्याशी होऊच शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मात्र, त्यांच्या सावलीत उभे राहुन स्वत:चे मुल्यांकन कोणी करीत असेल. तर तो निव्वळ मुर्खपणा ठरेल.



समाज दुर्भाग्य

भाऊंना एकदा सामाजकल्यान सभापती केले होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काय समाजाची कामे केली? ते किती वेळी झेडपीत गेले? किती निधी तालुक्याला आणला? ही सर्व आकडेवारी काढली तर लक्षात येते की, केवळ पक्षाची सत्ता आणि पितृछाया यामुळे त्यांनी कधी कामाला महत्व दिले नाही. तुलनेत कैलास वाकचौरे हे बांधकाम सभापती झाले. तर, त्यांनी तालुक्यासाठी कोट्यावधी रूपयांचा निधी आणल्याचे पहायला मिळते. आहो.! झेडपी काय आणि आमदारकी काय यांना दोन्ही सारख्याच वाटल्या. ते विधानसभेत गेले तेथून निधी तर आणलाच नाही. उलट निधी मिळत नाही म्हणून भाजपाच्या गोटात जाऊन सामिल झाले. का? हे सर्वांना माहित आहे. बरं भाजपात जाऊ आज केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे. मग किती निधी आणला? आख्ख अकोले शहर पाण्याखाली गेलं.! त्यामुळे, कळेनाच की यांना भाग्यविधाते म्हणावं तरी कसं?

दुधसंघ- अभाग्य

तुम्हाला माहित नसेल. अकोल्याचा आमृतसागर दुधसंघ चांगला चालु असताना याच महोदयांनी स्वत:चा खाजगी दुधसंघ टाकला होता. म्हणजे, सरकारी दुधसंघांची आवक बंद करुन खाजगीकरण करण्याचे महतभाग्य यांच्या भाळी होती. मात्र, झालं काय? नंतर तो दुधसंघ तोट्यात गेला आणि तोच दुधसंघ, त्याच्या इमारती, मशिनरी ह्या आमृतसागर दुधसंघाच्या माथी मारल्या. आजही अकोले शहराच्या लगत दुधसंघाची दोन एकर जागा पडीक असताना वाशेर्‍याला संकलन करण्याची वेळ आली. इतकेच काय.! वरुन त्याच दुधसंघात पुन्हा चेअरमन होण्याची बहुमान यांनी मिळविला. यात आधीक महत्वाचे म्हणजे हे चेअरमन असताना संगमनेरात 3 लाख लिटर संकलन आणि अकोल्यातून संगमनेरात दुध जाते. आपले किती? तर, 84 वर येऊन ठेपले आहे. मग हे लाखो लिटर दुध बाहेर का जाते? त्यामुळे, कळेनाच की यांना भाग्यविधाते म्हणावं तरी कसं?

कॉलेज-अभाग्य

दि.28 एप्रिल 2022 रोजी अगस्ति कॉलेजच्या निवडणुका लागल्या होत्या. त्यात सामाजिक संघटनांनी मागणी केली. की, येथील राजकारण आणि घराणेशाही हाटवा, ज्ञानी लोकांना संधी द्या. तेव्हा, विद्याविहारात अनेकांनी राजकारण केले. मात्र, तेथे विजय वाकचौरे यांचा अपमान करुन विनय सावंत यांना एक आव्हान देण्यात आले होते. की, घराणेशाही हटविण्याची सुरूवात तुम्ही तुमच्यापासून करा. मग आम्ही त्याची अंमलबजावणी करु. अर्थात बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले.! म्हणून विनंय सावंत यांच्या पिताश्रींनी राजिनामा दिला आणि पुन्हा पिचड परिवारास आव्हान दिले. पण, झालं काय? तावंतावं बोलणारे भाऊ यांनी अक्षरश: वर हात केले. रात्रंदिवस अकोल्याचे लोकप्रतिनिधी आणि सामाजिक नेते कॉलेजच्या गेटवर आंदोलन करीत होते. त्यांना एवढंस सुद्धा यांना जुमानलं नाही. मात्र, ज्यांनी पिचड विरोधी खोटारडे बुरखे घातले होते. त्यांनी गायकर साहेबांसह अनेकांचे राजिनामे घेऊन ते अलगद बाजुला झाले आणि नंतर त्यांच्याच गोटात जाऊन मिळाले. म्हणजे, नियोजनबद्ध लोकशाही मार्गाचे डाव उधळुन लावायचे आणि स्वत: एकही शिक्षण संस्था उभी न करता लोकांच्या घामातून उभ्या राहिलेल्या संस्थांवर वर्चस्व दाखवायचे. त्यामुळे, कळेनाच की यांना भाग्यविधाते म्हणावं तरी कसं?

भाग्यविधाता म्हणजे काय?

ज्या तालुक्यात प्रत्येक व्यक्तीच्या पोटाला अन्न आणि हाताला काम आहे. प्रत्येकाला निवारा आणि मायेची उब आहे. गावागावात रस्ता आणि आरोग्याच्या सुविधा आहेत. असे घर नाही जेथे मुलास शिक्षण मिळाले नाही. त्या तालुक्यात प्रत्येक शेतकरी किमान समाधानी आहे, गाव-गावच्या शाळा आणि आरोग्यकेंद्र, घराघरात लाईट आणि अंगभर कपडा पाहिजे. विशेष म्हणजे, जी काही तरुणाई आहे. त्यांच्या हाताला काही का होईना काम मिळेल अशी उपायोजना पाहिजे. शहरांचे शुभोभीकरण आणि थोरांचे विचार अंगिकारणारे पुतळे पाहिजे. प्रशासन असे हवे की कोतवालापासून ते तहसिलदारापर्यंत आपण जनतेचे सेवक आहोत अशी भावना पाहिजे. आपत्ती व्यवस्थापनात मदतीला धावतील अशी माणसे पाहिजे. मतदारांना पैसा नको तर त्यांना विश्वास आधार आणि योजनांचा लाभ दिला पाहिजे. स्थानिक स्वराज्यसंस्था ह्या कोणाच्या बापाच्या नसून त्या सामाजहिताच्या आहेत. त्यासाठी वेळ पडली तर स्वत:ला गहाण ठेवणारी मानसे पाहिजे. तालुक्यात उच्चशिक्षण तथा डॉक्टर, वकील, इंजिनिअर्स, अ‍ॅग्री अशी कॉलेज पाहिजे. खुल्या बाजारपेठा आणि काटकसरीची कारखानदारी पाहिजे. आता हे सगळं करण्याची मानसिकता गेल्या 40 वर्षापुर्वी असती तर आज अकोल्याची बारामती होऊ शकली असती. पण, दुर्दैवाने भाग्यविधाता म्हणजे काय? हेच चापलुसी करणार्‍या तरुणांना समजले नाही. 

कारखाना अभाग्य-विघाता.!!

अकोले तालुक्यातील जनतेला माहित नसेल. म्हणून सांगावे लागेल. की, कारखाना निवडणुक लांबणीवर गेले. ती का? व कोणी हा नंतरचा प्रश्न आहे. मात्र, जेव्हा जिल्हा बँकेने 67 कोटी रुपये देण्याचे कबुल केले. तेव्हा जे जुने संचालक होते. त्यांना शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर हामीपत्र लिहुन देणे गरजेचे होते. तेव्हा याच भाऊंकडे जेव्हा कारखान्याचे लोक गेले. तेव्हा त्यांना सांगितले. की, मी अशी काही हमी घेणार नाही. अक्षरश: ज्यांचा कार्यकाळ तेथे संपलेला आहे. अशा व्यक्तींनी सह्या केल्या. मात्र, तुम्ही ज्यांना भाग्यविधाते म्हणता, ते म्हणाले होते. वेळ आली तर आम्ही स्वत:च्या नावे कर्ज काढू आणि कारखाना चालवु, त्यांनी पहिले 67 कोटी आणि नंतरचे 20 कोणी अशा 87 कोटी रुपयांच्या हामीसाठी स्वत: हमीस्टॅम्प दिला नाही. तर, केंद्रसरकार आता अगस्ति कारखाना दत्तक घेणार म्हणाले होते. मात्र, गळीत हंगाम आला, केंद्रीय मंत्री गडकरी साहेब येऊन गेले. कर्जाची गरज होती तरी केंद्रकडून एक रुपया देखील आणला नाही. मग हमीपत्र नसताना, केंद्राची मदत नसताना, राज्याची मदत नसताना अगस्ति कारखाना पुन्हा उभा कसा राहिला? हे सर्व माहित असताना देखील आम्हाला कळतच नाही. की यांना भाग्यविधाते म्हणावं तरी कसं?

चौकशीचे राजकारण.!

खरंतर, ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. की, अकोले तालुक्यात जे-जे लोक आमदार झाले. त्यांनी ना स्वत:च्या शिक्षण संस्था  काढल्या ना स्वत: पतसंस्था काढल्या. त्यामुळे येथील शेतकरी, बहुजन समाजातील व्यक्ती आणि व्यावसायीक यांनी तालुक्यातील व्यापारी, शेतकरी, मजुर यांच्यासाठी पतसंस्थांची उभारणी केली. येथे कोट्यावधी रुपयांच्या ठेवी लोकांनी विश्वासाने ठेवल्या आहेत. मात्र, त्या पतसंस्थांच्या चौकशा लावून त्यांना कसे का होईना टाळे कसे ठोकता येतील, शेतकरी, व्यापारी गेल्या खड्ड्यात पण आपली राजकीय दुष्मणी कशी काढता येईल. या द्वेषापोटी काही पतसंस्थांच्या चौकशा लावल्या गेल्या. म्हणजे, जे स्वत:ला करता आले नाही. ते इतरांनी केले. पण, ते राजकारणाच्या आड आले म्हणून तालुक्यातील नेत्यांना, शेतकर्‍यांना, व्यापार्‍यांना, मजुरांना पळाता भुई थोडी करायची. राज्यातील सत्तेचा गैरवापर करुन लोकशाहीच्या आडून गळ्या घोटण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे, कळेनाच की यांना भाग्यविधाते म्हणावं तरी कसं?