आ.डॉ.लहामटेंनी पिचड पिता-पुत्रांचा दुसराही बालेकिल्ला जिंकला.! गड आला पण सिंह गेला.! आता मिशन कारखाना.! 45 पैकी 35 ग्रा.पंचायती मविआकडे.!

 

- सागर शिंदे

सार्वभौम (राजूर) :-

       असे म्हणतात एकदा का यशाला पडती कळा लागली. की, ती थांबता थांबत नाही. अगदी याच म्हणीचा प्रत्येय पिचड-पिता पुत्रांच्या बाबत पहायला मिळत आहे. जशी 2019 ची निवडणुक झाली. तेव्हापासून जेव्हा-जेव्हा एकीचे बळ पहायला मिळाले आहे. तेव्हापासून पिचड साहेबांना यशासाठी फार मोठा संघर्ष करावा लागला आहे. आज राजूर ग्रामपंचायत म्हणजे गेल्या 40 वर्षापासून एकहाती सत्ता होती. मात्र, डॉ. किरण लहामटे यांनी पुन्हा त्यांच्या बालेकिल्ल्यात घुसून पिचड पिता-पुत्रांचा पराभव केला आहे. आता ही निवडणुक फक्त ग्रामपंचायतीची नव्हती. तर, ती आजी-माजी आमदारांच्या राजकीय अस्तित्वाची होती. तालुक्यातील राजकीय घडमोडींसाठी महत्वाची होती. विशेष म्हणजे सरपंच उमेदवार यांची निवड भाजपाच्या आदेशानुसार जनतेतून होती. तरी देखील पिचड साहेबांच्या उमेदवारास पराभवाचा सामना करावा लागला आहे. म्हणजे, सर्व राजुरमधून राष्ट्रवादीच्या उमेदवारास कौल मिळाला तर भाजपाला जनतेने नाकारले हे देखील विसरुन चालणार नाही. आता या निवडणुकीचा परिणाम येणार्‍या कारखान्यावर देखील होण्याची शक्यता आहे. पिचड साहेबांचे उमेदावार येतील. मात्र, त्यांना सत्ता स्थापन करता येणार नाही. अशा प्रकारचे स्पष्ट चित्र असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, कारखाना निवडणुक पुढे ढकलली हे पिचड साहेबांसाठी सुखदायी असले. तरी, जनतेतून सरपंच निवड हे दु:खदायी ठरले आहे. एकंदर, राजूर ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले होते. त्यात पिचडांसाठी गड आला पण सिंह गेली आणि डॉ. लहामटेंसाठी सिंह आला पण गड गेला अशा प्रकारची स्थिती झाल्याचे पहायला मिळाले आहे.

एकीचे बळ कामी आले.!

सन 2019 साली जो फंडा विधानसभेला शरदचंद्र पवार साहेबांनी वापरला होता. तोच फंडा आ.डॉ.किरण लहामटे यांनी राजूर ग्रामपंचायतीत वापरला. सगळ्यांनी एकत्र येऊन पिचडांच्या विरोधात दंड थोपटले आणि काही क्षणात राज्यात पिचड पुन्हा चर्चेत आले. 2019 साली एकास एक झाली म्हणून डॉ. किरण लहामटे आमदार झाले. तर याऊलट अकोले नगरपंचायतीला काँग्रेस महाविकास आघाडीतून बाजुला झाली. तर, पिचड साहेबांना सहज विजय खेचून आणता आला. मात्र, त्याची पुनरावृत्ती राजूर ग्रामपंचायत आणि अन्य ठिकाणी झाली नाही. म्हणून महाविकास आघाडीला बर्‍यापैकी यश मिळाल्याचे पहायला मिळाले आहे. विशेषत: राजूर ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी एकत्र लढली. त्याचा सर्वात मोठा फायदा झाल्याचे दिसते आहे. तेथे विनय सावंत, पुष्पाताई लहामटे, भगवान पवार, सुनिल भोत, रामा मुतडक, बाळासाहेब कवडे, ललीत मुतडक, सचिन पवार यांच्यासह अनेकांनी आमदारांच्या बाजुने लिड केले होते. म्हणजे यात एकही व्यक्ती फार मातब्बर नाही. मात्र, सामान्य कार्यकर्ता आणि साम्यवादी विचारांचे चेहरे आहेत. त्यामुळे, सर्व एकीने लढले आणि जनतेतून त्यांनी सरपंच निवडून आणला.

सरपंचांच्या टुन्नुक उड्या.! 

खरंतर आजकाल पक्ष आणि निष्ठा ही राजकारणी लोक वेशिवर टांगून ठेवतात. सकाळी एका तर दुपारी दुसर्‍या अन रात्री तिसर्‍या पक्षात अशी बड्या नेत्यांची राजकीय संस्कृती आपण पाहिली आहे. मात्र, तोच गुण अगदी ग्रामपंचायत पातळीवर देखील अंगिकारला जाऊ लागला आहे. कारण, 45 ग्रामपंचायतीत अशी अनेक गावे आहेत. जेथे सरपंच पदाचे उमेदवार पाहिल्यांदा भाजपा कार्यालयात जाऊन सत्कार करुन येतात आणि नंतर राष्ट्रवादी कार्यालयात येऊन डॉ. लहामटे यांच्या हस्ते सत्कार करुन घेतात. त्यामुळे, हा गडी नेमका कोणाचा आहे? कोणत्या पक्षाचा आहे? कोणी निवडून आणला हे शोधनं निवडून आल्यानंतर फार कठीण जाऊ लागले आहे. त्यामुळे, या फुटीर व्यक्तींमुळे सोशल मीडियावर प्रचंड वाद होताना दिसला आहे. विशेषत: भाजपाने जी यादी तयार केली. त्याची जेव्हा शहनिशा करण्यात आली तेव्हा बहुतांशी जागेबाबत संदिग्धता दिसून आली. तर, राजुर ग्रामपंचायतीबाबत भाजपाने आम्ही आमचा पराभव मोठ्या मनाने स्विकारतो अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियावर फारताना दिसले. मात्र, निवडणून आलेला सरपंच कोणाचा? याबाबत फार मोठा संभ्रम नेहमीप्रमाणे पहायला मिळाला.

अकार्यक्षम तहसिलदार बदला.?

अकोले तालुक्यात जसे सतिश थिटे हे तहसिलदार आले आहेत. तेव्हापासून ना संजय गांधी निराधार योजना रखडली आहे, ना रेशनकार्डची काम झाली आहेत. असंख्य कामे प्रलंबित असल्याचे आरोप होत आहे. जनता देखील या तहसिलदार महोदयांना वैतागली असून ते त्यांच्याच पद्धतीने मनमौजी कारभार करतात असे आरोप होत आहे. लोकांशी लोकशाही प्रमाणे धड वागणं नाही, कोणाशी निट बोलणे नाही, खुद्द कर्मचारी त्यांना निट म्हणत नाही असे आरोप होत आहे. जनतेच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर नाही. मात्र, ते लोकशाही राज्यात तहसिलदार असून ते जनतेचा पगार घेतात. याची त्यांना जाणीव करुन दिली पाहिजे असे समाजसेवकांचे मत आहे. त्यासाठी राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे एक शिष्टमंडळ जाणार आहे. खरंतर आमदार महोदयांचा त्यांच्यावर वचक नसल्याने अकोल्यात सगळा भोंगळा कारभार चालु आहे. प्रशासकीय कामात कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही. त्यांच्या असल्या स्वभावामुळे कोणतेही कर्मचारी स्वत:हून हिरारीने कामे करण्यास धजत नाही. त्यामुळे, असले मिजासात वावरणारे तहसिलदार अकोल्यात नको. अशी मागणी विखे गटाचे कार्यकर्ते करणार आहेत. अकोले तालुक्याला तत्कालिन मुकेश कांबळे साहेब यांच्यासारखा सक्षम अधिकारी द्यावा अशी मागणी महसुल मंत्र्यांकडे करण्यात येणार आहे अशी माहिती विखे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे..

१) म्हाळुंगी - सरपंच -- मदन निवृत्ती मेंगाळ  

         सदस्य  - डामसे रामचंद्र विठ्ठल, नाडेकर आशा सुभाष,सदगीर मंजुळाबाई मधुकर उघडे उमाजी बाळु, सदगीर रावसाहेब भाऊराव, सोंगाळ आशा योगेश ( सर्व सदस्य बिनविरोध) 

२) सांगवी- सरपंच -मनिषा शांताराम मेंगाळ  (अपक्ष)

   सदस्य. तळपाडे नामदेव संतु,तळपाडे भाऊसाहेब नंदु,तळपाडे सुनिता एकनाथ, डगळे मदन रामदास,तळपाडे शितल पंढरीनाथ,खोकले सिताबाई भारत,तळपाडे अर्जुन भागाजी,( बिनविरोध) .तळपाडे रोहीणी भागवत (बिनविरोध) १ जागा रिक्त 

३) धामणवन - सरपंच --मनिषा पोपट चाैधरी  

    सदस्य --धिंदळे सुनिल धर्मा(बिनविरोध ),रेंगडे प्रमिला शांताराम,(बिनविरोध )चाैधरी रत्ना शिवराम,(बिनविरोध) बारामते रंगनाथ किसन,बारामते ढवळाबाई दशरथ,(बिनविरोध )धराडे मारूती दशरथ,धिंदळे सिता जयराम (बिनविरोध)

४) मवेशी -- सरपंच -यमाजी भिवा भांगरे 

   सदस्य -- कोंडार रवींद्र बाळु,कोंडार सविता राजु,कवटे महादु बहिरु, बांबळे आशा गोरक्षनाथ, बांबळे गंगुबाई काळु,जाधव लक्ष्मण भागवत,भांगरे वंदना नटराज,भांगरे गंगुबाई यादव

५)) केळी रुम्हणवाडी  --- सरपंच- मुरलीधर चिमा मेंगाळ - ७८३ (अपक्ष) 

सदस्य ---तळपाडे विजय बबन,मेंगाळ शीला शांताराम, भोईर निर्मला बाळु,जगताप भाऊसाहेब चंदू,बिन्नर ज्ञानेश्वर संतु,सदगीर लीलाबाई नामदेव, मेंगाळ मावजी हरी,मेंगाळ ममता भास्कर,मेंगाळ हिराबाई अशोक.

६) पाडोशी  -- सरपंच --दत्तु विष्णु कुलाळ ३४९ ( अपक्ष)  

  सदस्य--साबळे किसन धोंडु,साबळे रेणुका ढवळा,साबळे लक्ष्मी चंद्रकांत, नाडेकर बहिरु पाडूंरंग,साबळे वेणुबाई नामदेव,साबळे अरुण दिलीप,साबळे वनिता प्रकाश

७) तळे ----सरपंच-- हाैशिराम धोडिबा वेडे 

   सदस्य- नाडेकर बबन गुणाजी  नाडेकर  शंकर काळु ,घोडे सखाराम गोविदा,कोरडे लक्ष्मण नामजी,नाडेकर भोराबाई वामन(बिनविरोध) ,भालेराव मनिषा गणपत(बिनविरोध) ,मुठे ताईबाई बूधा,( बिनविरोध)  वरे सविता लक्ष्मण(बिनविरोध) ,व एक जागा रिक्त

८) तेरुंगण --- सरपंच मच्छिंद्र देवराम कोकतरे ( अपक्ष)

सदस्य -- कातडे गंगाराम लक्ष्मण (बिनविरोध) व ६ जागा रिक्त

९) खिरविरे --- सरपंच-गणपत नामदेव डगळे 

    सदस्य - डगळे दगडु निवृत्ती, डगळे अनुसया हिरामन,( बिनविरोध)  कदम मिराबाई नामदेव(बिनविरोध)  ,डगळे भाऊराव महादु ,बेनके सुभाष विठ्ठल, डगळे पार्वताबाई भिमाजी(बिनविरोध)  शेगाळ राजु विठ्ठल, दिंडे रंजना नितिन, डगळे नामदेव दुंदा,पराड गाैतमी अजित,धोंगडे रूपाली रामदास 

१०)मुथाळणे -- सरपंच - सुनंदा अविनाश गांवडे 

सदस्य -- कातोरे संजय तुकाराम, कातोरे कविता सुरेश,सदगीर अलका संतोष,सदगीर चक्रधर भिमाजी,बांगारे सविता चंद्रभान,सदगीर सुनिता बाळु, फोडसे अरुण तान्हाजी,होलगीर किसन तुकाराम, मधे संगिता लक्ष्मण 

११)कातळापुर ---- सरपंच बाळु महादु ढगे 

सदस्य -शिंदे लक्ष्मण विश्वनाथ, ढगे सुमन गंगाधर,खाडगीर लक्ष्मी गोरक्षनाथ, खाडे सक्रु बारकु,तातळे आशा भास्कर,ढगे धोंडीराम बाळु,काठे योगिता दत्तु.

१२) माळेगाव ---- सरपंच.  चंद्रकांत तान्हाजी सुकटे (अपक्ष) 

सदस्य -- सुकटे अनिल मारुती व ६;जागा रिक्त 

१३) कोदणी ----सरपंच चित्रा सुनिल बाबेरे 

सदस्य -- बांबेरे सागर भिमा,बांबेरे शिवानी बबन,कोकाटे सुशीला कुंडलिक,पवार गोरक्षनाथ यादव (बिनविरोध) बांबेरे संगिता वसंत (बिनविरोध) बांबेरे लक्ष्मण मनोहर,करवंदे सुमन दिनेश( बिनविरोध)

१४) रणद बु ---सरपंच सुंदरलाल हरी भोईर 

सदस्य --पोटकुले रामचंद्र बुधा (बिनविरोध) भोईर रोहीणी भास्कर (बिनविरोध) कोरडे मच्छिंद्र काळु (बिनविरोध) मराडे चंद्रभागा भरत,पटेकर लक्ष्मण नानाजी (बिनविरोध), दोन जागा रिक्त

१५) करंडी --सरपंच ज्योती सुनिल गोंदके (अपक्ष)

सदस्य -- गोंदके आशोक रामचंद्र, लहांगे कल्पना शिवाजी, गायकर संगिता बाळासाहेब, गोंदके विठ्ठल नाथ,गोंदके ज्योती सुनिल,गोंदके चंद्रकांत सीताराम,गोंदके संगिता बाळासाहेब 

१६) शिरपुंजे बु --- सरपंच. कांताबाई भाऊ धिंदळे 

सदस्य --- साबळे गणपत धोंडु, धिंदळे उषा गोरक्षनाथ, धिंदळे कांताबाई भाऊ,धिंदळे साईनाथ विठ्ठल, धिंदळे तुळसाबाई लालु,धिंदळे अश्विनी विठ्ठल, धिंदळे गुलाब बहिरु, धिंदळे यशवंत कोंडाजी,धिंदळे स्वाती शिवराम 

१७) कोहंडी - सरपंच हिराबाई पांडुरंग तातळे 

सदस्य -- वाघ मथुरा बस्तिराम (बिनविरोध) ,परते विनायक साळु ( बिनविरोध)  किरवे गिताबाई राजु ( बिनविरोध) ,तातळे जगन श्रावणा ( बिनविरोध) ,गवारी सविता शिवाजी ( बिनविरोध)

१८) लव्हाळी ओतुर -- सरपंच. प्रकाश यमाजी लहामटे 

सदस्य -- धोंडबरे दशरथ इदु,भांडकोळी कुंडलिक धोंडिबा,लहामटे रंजना नंदकुमार,पोटकुले रोहिदास विठ्ठल, नाडेकर राहुल बारकु,लहामटे जयश्री जालिंदर. ०३ जागा रिक्त

१९) केळुंगण -- सरपंच युवराज मुलीधर देशमुख 

सदस्य -- देशमुख एकनाथ रेवन्नाथ, देशमुख  लता पांडुरंग (बिनविरोध) ,धिंदळे नवनाथ लक्ष्मण,देशमुख हाैसाबाई गोरक्षनाथ ( बिनविरोध) ,देशमुख भास्कर लक्ष्मण, देशमुख वनिता भास्कर (बिनविरोध) , १ जागा रिक्त

२०)चिंचावणे --- सरपंच. अलका खेमा डगळे 

सदस्य -- डगळे मनिषा गणेश,साबळे यशवंत रामभाऊ, चावडे सविता गजानन,डगळे अलका खेमा, मुठे संदिप गणपत,डगळे मंदा युवराज,घिगे प्रकाश चिंधु, 

२१)पाडाळणे -- सरपंच --रोहणी सुनिल बगाड 

सदस्य -- उगले शिवाजी कृष्णा,बगाड मनिषा रामनाथ, सावंत रूपाली संदिप,अरबले बुधा धोंडिबा,तळेकर शिला संजय,सुपे शोभा रामहारी,तळेकर विकास रामदास,मधे अनिता रखमा, मधे भाऊसाहेब कारभारी,

२२)मान्हेरे --- सरपंच सुनिता अजय गभाले (अपक्ष)

सदस्य -- गभाले गोरख मारूती, कांबळे सुकेशनी सुरेश,गभाले दशरथ भाऊ,गभाले लहु मारूती, गभाले रूपाली बाळु,घोरपडे देविदास चंदर,घोरपडे जयश्री दिपक,धिंदळे प्रभावती अंकुश,झांबाडे सरोजनी प्रकाश (बिनविरोध) 

२३)वारंघुशी ---सरपंच फसाबाई निवृत्ती बांडे (अपक्ष) 

सदस्य-- लावरे भगवान विष्णु,घाणे कमल राजेंद्र, कडाळी विलास भरत,भागडे दिपक चंदर,कडाळी शारदा संदिप,कोरडे प्रकाश अर्जुन,( बिनविरोध)घाणे मथुराबाई दशरथ,(बिनविरोध) मुठे समिर तुकाराम,कडाळी कविता मोहन (बिनविरोध) ,घाणे मयूरी नंदु

२४ आबितखिंड -- सरपंच घनकुटे यमुना दत्ताञय

सदस्य-भारमल ओंकार काशिनाथ, भोजणे कल्पना अजय,गंभिरे भाऊराव देवराम,गोडे सिमा दिनेश, भोजणे रामनाथ किसन,भोजणे नंदा शरद

२५)पळसुंदे -- सरपंच. सुरेश महादु वळे 

सदस्य -- घोडे संजय कोंडिबा ( बिनविरोध) ,भगत दगडु कुशाबा ( बिनविरोध) ,मुठे मोहनाबाई गोविंद( बिनविरोध) ,कचरे ज्ञानदेव मनोहर(बिनविरोध) कचरे जिजाबा लुमा, दुटे सखूबाई रामदास,उंबरे पार्वता गुरुदत्त

२६)विठे --- सरपंच--. कलाबाई हिरामण मेंगाळ 

सदस्य --- इदे विनोद बाळु ,म्हशाळ सारीका उल्हास,मोहटे छाया सुधीर,पथवे रामनाथ उमाजी, आवारी अनिकेत दत्ताञय,मेंगाळ मिराबाई गिरजा,उघडे अनिता अशोक,पथवे राजाराम राघु, वाकचाैरे कमल नवनाथ 

२७)सातेवाडी --सरपंच केशव गोविंद बुळे 

सदस्य-- दाभाडे भरत एकनाथ(बिनविरोध) , रोहणी पांडुरंग गभाले(बिनविरोध) ,आशा अरुण धराडे,(बिनविरोध) ,काशिनाथ रखमा मुठे,संगिता सुरेश दिघे,बुधाबाई लक्ष्मण मुठे,लक्ष्मण विठ्ठल मुठे,वंदना किसन मुठे,(बिनविरोध) 

२८)पांजरे --- सरपंच उघडे रामचंद्र म्हाताजी 

सदस्य -- उघडे ज्ञानदेव पांडुरंग, उघडे मिना पांडुरंग,(बिनविरोध)  गांगड मथुरा तुळशीराम(बिनविरोध),मधे उल्हाजी पिलाजी,उघडे मिनानाथ मदु, उघडे मिना यशवंत, उघडे मोहन शांताराम, उघडे अनिता शिवराम(बिनविरोध) ,उघडे दुर्गा लक्ष्मण (बिनविरोध) 

२९)उडदावणे ---सरपंच किर्ती देविदास गि-हे (अपक्ष) 

सदस्य -- गि-हे भिमराज देवराम (बिनविरोध) लोटे रखमाबाई सोमनाथ, (बिनविरोध) सोनवणे सुरेखा अर्जुन ( बिनविरोध)  गि-हे संजय भाऊ,लोटे रंगनाथ रामजी,गि-हे राणी काशिनाथ, गि-हे भास्कर सुरेश,  गि-हे मिराबाई मोहन,गांगड मंगलाबाई शांताराम

३०)शेणित बु --सरपंच गोविद कोडाजी करवंदे (अपक्ष)

सदस्य -- सर्व बिनविरोध 

३१)पिंपरकणे -  सरपंच थिगळे अनुसया अरुण 

सदस्य -- थिगळे निवृत्ती ठका, आढळ सुनिता तुकाराम, थिगळे अनुसया अरुण,पिचड ज्ञानेश्वर निवृत्ती, पिचड कैलास निवृत्ती, पिचड कुंडलिक घेवजी,पिचड उषा प्रसाद, व दोन जागा रिक्त आहे.

३२)सावरगाव पाट --- सरपंच रामनाथ वाळिबा गावंडे 

सदस्य-- जगताप बाळकृष्ण गाैतम,पथवे सुनिता नानासाहेब, नेहे निशा रावसाहेब ,गावंडे राजाराम भाऊराव, सहाणे बाळासाहेब यशवंत,गावंडे लक्ष्मी तुळशीराम, पथवे पांडुरंग शिवा ,पथवे अनिता गेणू, पवार अलका सखाहारी,

३३)टाहाकारी --- सरपंच चांगुणा भाऊसाहेब मेंगाळ

सदस्य - मेंगाळ मच्छिंद्र सखाराम, एखंडे बाळासाहेब नरहरी, अस्वले अनिता भास्कर,एखंडे शिवाजी चंद्रभान,मेंगाळ चांगुणा भाऊसाहेब, एखंडे कमल दगडु, मेंगाळ उमा राधु,अस्वले अनिता भास्कर,सुमन एकनाथ एखंडे 

३४)चिंचोडी -- सरपंच. कविता सुनिल मधे 

सदस्य-- सचिन तुकाराम मधे ( बिनविरोध) ,हिराबाई राजेद्र मधे ( बिनविरोध) अंकुश तुकाराम मधे ( बिनविरोध)  श्रद्धा विनोद सोनवणे, सोमा नावजी मधे,आनंदा रामजी सगभोर,सविता शरद गभाले ( बिनविरोध)  दोन जागा रिक्त

३५)बाभुळवंडी ---सरपंच मंदा पंढरीनाथ लेंडे

सदस्य-- वाळीबा किसन भोईर( बिनविरोध) ,संगिता भागवत मशाळ (बिनविरोध) ,सोमनाथ हरि भवारी,इंदुबाई मधुकर लेंडे ( बिनविरोध)  पांडुरंग चिंधी लेंडे (बिनविरोध) मंदा पढरीनाथ लेंडे, सर्वसाधारण स्त्री  जागा रिक्त 

३६)टिटवी ---सरपंच तुकाराम गोविद वायाळ (अपक्ष)

सदस्य -- भांगरे रंगनाथ भावका, भांगरे कविता रविराज,मुंढे अनुसया सोमनाथ, मेमाणे देवराम लहानु,बोबडे प्रवीण विलास,मुंढे वैशाली रोहिदास,(सर्व सदस्य बिनविरोध)  एक जागा रिक्त

३७)गोदुंशी --सरपंच रत्नाबाई भाऊ हिले 

सदस्य ---थिगळे योगेश मारुती, शिंदे अलका विवेक,थिगळे अनिता लक्ष्मण, बोटे संतोष दिनकर,पेढेकर चारुशिला नागेश, बोटे सत्यभामा देवराम, हिले दाैलत शिवराम,हिले सुरेखा काळु (एक जागा रिक्त)

३८)केळी कोतुळ --सरपंच भवारी चंद्रकांत नामदेव व 

 धराडे संजय लक्ष्मण, यांना सारखी मते मिळाल्याने चिठ्ठी काढुण चंद्रकांत नामदेव भवारी हे विजयी झाले. सदस्य -- तळपे शंकर गोपिनाथ, भवारी दारकु मेसु,गोडे रामनाथ येदु, गोडे मनोहर हरिबा, वाळेकर सुनंदा सखाराम

३९)केळी ओतुर --- सरपंच मिना दत्ताञय वायाळ 

सदस्य -- वायाळ भाऊ लक्ष्मण,वायाळ रंजना पांडुरंग(बिनविरोध) , वायाळ पार्वता देवजी(बिनविरोध) , वायाळ दत्ताञय गोविंद, वायाळ संगिता बाळु,(बिनविरोध)बो-हाडे राणी तुषार, (बिनविरोध) कांबळे सुरेश विठ्ठल, बांगर अजय चंद्रकांत,कांबळे स्वाती जालिंदर (बिनविरोध)

४०)समशेरपुर ---सरपंच. एकनाथ हरी मेंगाळ 

सदस्य -- उघडे मरुती बारकु,मेंगाळ इंदिरा उमाजी,बेनके जिजाबाई निवृत्ती, मेंगाळ निवृत्ती हरी( बिनविरोध) ,मेंगाळ शालिनी गंगाराम(बिनविरोध) ,दराडे कचरु जबाजी,चाैधरी दत्ताञय सोनु, साळवे जनाबाई माधव,फोडसे अनिता राजु,फोडसे सुभाष रामभाऊ(बिनविरोध) , भरीतकर माया योगेश,माळी दत्तु तुकाराम,बेनके नितिन किसन,बेनके संगिता शंकर, व एक जागा रिक्त राहिली. 

४१)राजुर -   सरपंच. पुष्पा दत्ताञय  निगळे 

सदस्य पवार अतुल सुरेश,देशमुख प्रमोद बाळासाहेब, मैड संगिता राजेंद्र, नवाळी ओंकार बाळासाहेब, मोहंडुळे संगिता धनंजय,जाधव संगिता लक्ष्मण,मुतडक हर्षल नंदकुमार,देशमुख रोहीणी दत्ता,कानकाटे गोकुळ हरिभाऊ,डगळे सुप्रिया धोंडीबा,वालझाडे सारीका शेखर,बांगर राम विठ्ठल, भांगरे विमल विजय,माळवे रोहिणी नंदकुमार,देशमुख गणपत एकनाथ,बनसोडे संतोष लक्ष्मण, सोनवणे लता चंद्रकांत

सौजन्य :- आल्ताफा शेख