हॉटेल मालकीनीवर वेटरचा अत्याचार.! काका तुम्ही बापासारखे आहात, पण नराधमाने एकले नाही.! गुन्हा दाखल.!

 सार्वभौम (संगमनेर) :-

       संगमनेर तालुक्यातील वडगाव पान शिवारात असणार्‍या एका हॉटेलच्या मालकीनीवर वेटरने बळजबरी अत्याचार करुन तो पसार झाला. ही घटना दि. 15 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. घरी जाण्यासाठी उशिर झाला म्हणून मालकीन हॉटेलमध्येच झोपल्यामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. यात आरोपी हरिश्चंद्र कचरु शेवरे (रा. वडगाव पान, मुळ वाळुंज ता. दिडोरी, जि. नाशिक) याच्यावर संगमनेर ग्रामीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा 50 वर्षाचा असून महिला ही 28 वर्षीय आहे. तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात असे म्हणून देखील या वेटरने बळजबरीने अत्याचार करुन पळ काढला. यात पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाडित महिला ही संगमनेर खुर्द परिसरात असणार्‍या एका नामांकीत हॉस्पिटलच्या जवळ राहते. गेल्या चार वर्षापुर्वी तिचा एका तरुणाशी विवाह झाला होता. त्यांना दोन मुले झाली. त्यांचे सर्व काही सुरळीत चालु होते. आपल्या कुटूंबाला हातभार लागावा म्हणून त्यांनी वडगाव पान परिसरात एक हॉटेल देखील सुरू केले होते. पतीने मोठी गाडी घेतली होती. त्यामुळे, बाहेर कोठे ट्रीप मारण्यासाठी ते जात  असे. त्यामुळे, बहुदा पीडित महिला संपुर्ण हॉटेल संभाळत होत्या. दोन बाजुंनी घरात पैसा येत असल्यामुळे जवळजवळ त्यांच्या संसारात काही अचडण येत नव्हती.

दरम्यान, हॉटेलवर काम करण्यासाठी पीडित महिलेने तिच्या वडिलांच्या ओळखीचा व्यक्ती हरिश्चंद्र शेवरे याला ठेवले होते. आपल्या घरातील व्यक्ती आहे. आहे. ओळखीचा आहे त्यामुळे, बिनधास्त त्यांनी शेवरेवर विश्वास टाकला होता. जेव्हा हॉटेलवर जास्त वेळ होई तेव्हा त्या कोणताही मनात विचार न करता हॉटेलवर राहत होत्या. मात्र, हीच संधी पाहून शेवरे याच्यातील विकृत भावना जाग्या झाल्या आणि जेव्हा जेव्हा पीडित महिला हॉटलेवर रहात असे. तेव्हा तेव्हा याची वाईट नजर तिच्यावर पडत होती. मात्र, तो वडिलांच्या वयाचा असल्यामुळे पीडित महिला मनाची समजूत काढत होती. पुढे काही प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पीडित महिला त्यास काका म्हणून संबोधत होती. मात्र, तरी देखील त्याचे चलींत्र काही ठिक वाटत नव्हते. कारण, तो अचानक भांडण काढत असे तर कधी शिविगाळ दमदाटी करुन निघुण जाण्याची धमकी देत असे. मात्र, कामाला माणूस नाही म्हणून त्याचे बोलणे देखील पीडित महिला ऐकुण घेत होती. 

दरम्यान, दि. 14 सप्टेंबर 2022 रोजी रात्री घरी जाण्यास उशिर झाला होता. तर बाहेर पाऊस देखील सुरू होता. त्यामुळे, पीडित महिलेने हॉटेलवर थाबणे पसंत केले. दुसर्‍या दिसशी 15 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हरिश्चंद्र शेवरे हा पीडित महिलेच्या खोलीत गेला. त्याने दार बंद केले आणि तिला म्हणाला. की, तु मला खुप आवडतेस, तु तुझ्या नवर्‍याला सोडून दे, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. तेव्हा पीडित महिला म्हणाली की, तुम्ही असे का बावचळल्यासारखे करीत आहात? तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात, मला दोन मुले आहेत. मात्र, हरिश्चंद्र शेवरे याने काही ऐकले नाही. एकतर माझी इच्छा पुरी कर हवंतर मी तुझ्याशी लग्न करेल. तेव्हा पीडित महिलेने त्यास विरोध केला असता दोघांमध्ये चांगलीच धरपकड झाली. मात्र, आरोपी शेवरे याने तिच्यावर अत्याचार केला आणि तिला धमकी दिली. जर घडला प्रकार कोणला सांगशिल तर तुला पुन्हा येथे येऊन ठार मारुन टाकेल. मात्र, तरी देखील महिलेने थेट पोलीस ठाणे गाठले आणि वेटवर गुन्हा दाखल केला.

ओळखीपासून सावधान.!!

खरंतर, व्यक्ती कितीही जवळचा असला तरी महिलाच काय.! पण, त्याच्या ताब्यात मुले-मुली देताना फार गांभिर्याने विचार केला पाहिजे. आजकाल आपली जन्मदाती आई देखील आपल्या पोटच्या मुलीला दुसर्‍याच्या स्वाधिन करते. ही घटना कोठे परराज्यात नव्हे.! तर अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात मनेगाव येथे घडली आहे. आपल्या समाजात वयात आल्यानंतर परपुरुषासोबत राहवे लागते. मी तेच केले होते. असे म्हणून आईने कोपरगाव तालुक्यातील येस येथील 50 वर्षीय नराधम आण्णासाहेब भडांगे याच्या ताब्यात दिले आहे. त्याने नको तसे लोचके तोडले. अवघ्या 13 वर्षीय मुलीबाबत हा प्रकार आपल्या जन्मदात्या आईने केला. आता दोघांना अटक केली आहे. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने पालकांनी स्वत: जबाबदारीने वागले पाहिजे. तर, मुलांना देखील स्वसंरक्षणाचे धडे आणि आपले कायदेशिर अधिकार समजून सांगितले पाहिजे. अन्यथा अशा प्रकारच्या विश्वासू लोकांपासून नेहमी घात होईल आणि अन्यायाला सामोरे जावे लागेल..!!