मतदान करताना फक्त एकदा हा विचार करा आणि स्वत:च्या मनाला हे प्रश्‍न विचारा.! अन बिन्धास्त मतदान करा.! कारखान्याचे भविष्य तुमच्या हाती.!!



सार्वभौम (अकोले) :- 

अगस्ति सहकारी साखर कारखान्याची निवडणुक लागली असून उद्या (दि.२५) सकाळी मतदान आहे. ही निवडणुक राजकीय नसून ती अकोले तालुक्यातील शेतकरी, मजूर, व्यापारी आणि कामगार वर्गाच्या अस्तित्वाची, दोन वेळच्या अन्नाची आणि बळीराजाच्या जिवण मरणाची आहे. कारण, एकदा का कारखाना बंद पडला. की, तो पुन्हा चालु होणे नाही. त्यामुळे, मतदान करताना ८ हजार ३४२ मतदारांनी विचार करुन आपला हक्क बजवायचा आहे. कारखाना कोण वाचु शकतो. कोण चालवू शकतो. कोण कर्ज उपलब्ध करुन फेडू शकतो. कोण शेतकर्‍यांचे हित चिंतू शकतो, आजवर तालुक्यासाठी कोणी मदत केली आहे, वेळीच राज्यातील कोणता पक्ष आणि कोणता नेता धावून येऊ शकतो. अशा प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर शोधून उद्या मतदान करायचे आहे. तुमचे एक मत चुकले तर कारखाना बंद होऊ शकतो आणि योग्य निर्णय घेतला तर अगस्ति पावन होऊ शकतो. त्यासाठी खाली दिलेल्या काही गोष्टींची उत्तरे ही तुम्हालाच शोधायची आहेत. अन त्याची उत्तरे अन्य कोणाला नव्हे.! तर स्वत:ला द्यायची आहेत. मग मतदान करताना फक्त एकदा हा विचार करा आणि लोकशाही बळकट करण्यासाठी व कारखाना टिकण्यासाठी योग्य व्यक्तीला मतदान करा.!!

कारखान्यावर पवारांचा अपमान.! 

दि. १४ आक्टोंबर २०१९, भर दुपारची वेळ होती. आमदारकीची निवडणुक सुरू असल्याने शरद पवार साहेब हे अकोल्यात प्रचारासाठी येणार होते. जो अगस्ति कारखाना उभा करताना त्याच्या पायात स्वत: साहेबांच्या कर्तुत्वाचा घाम पडला होता. त्या पवार साहेबांना साधा एक गुच्छ सुद्धा या भाजपवासीयांनी दिला नाही. जर तेव्हा पवार साहेबांनी कारखाना दिला नसता. तर, अकोल्यात हजारो कुटुंबांना आधार मिळाला नसता. तरुणांना काम आणि शेतकर्‍यांच्या घामाला दाम मिळाले नसते. तेव्हा, ज्यांनी कारखाना दिला. त्यांचे ऋण फेडायचे की नाही? मतदान करताना फक्त एकदा विचार करा..!!

काय कमी केलं होतं?

आज गायकर साहेब हे पिचड साहेबांना सोडून पुन्हा पुरोगामी विचारांच्या राष्ट्रवादीत सामिल झाले. तेव्हा ते सोबत होते तेव्हा चांगले. आणि स्वगृही परतले तर ते गद्दर झाले. मग, साहेबांना तरी पवार साहेबांनी काय कमी केले होते? आमदार केलं, मंत्री केलं, कॅबिनेट दिली, अध्यक्ष केलं, प्रदेशाध्यक्ष केलं, विरोधीपक्षनेते केलं, राज्यात नव्हे देशात नेता केलं. तेव्हा गद्दारीची भाषा कोणाच्या तोंडातून येत नाही. त्यामुळे, राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने अकोल्याला मोठं केलं. तेव्हा गद्दार कोण? मतदान करताना फक्त एकदा विचार करा..!!

वैचारिक नेते व पुरोगामी तालुका.! 

सन १९५२ पासून राज्यात सार्वत्रिक निवडणुका सुरू झाल्या. तेव्हापासून अकोल्याने पुरोगामी विचारांना बळ दिले आहे. त्यात कॉंग्रेस, संयुक्त महाराष्ट्र, कम्युनिस्ट आणि नंतर राष्ट्रवादी. त्यामुळे, जातीयवाद आणि धर्मवाद हा तालुक्याच्या भाळी कधी पहायला मिळाला नाही. एव्हाना येथे भाजपाचा आमदार कधी झाला नाही अन होणार नाही असे जुने जाणते अभ्यासक म्हणतात. त्यामुळे, एनआरसी, सीसीए, एनपीआर, सीसीए आणि हिजाब यांच्यासारख्या गोष्टी हा देश अजून विसरला नाही. इतकेच काय.! ५३ पेक्षा जास्त शेतकर्‍यांचे जीव गेले. तरी शेतकरी काळ्या कायद्यावर हे सरकार ठाम राहिले. म्हणून तर पंजाबने त्यांना धडा शिकविला. आता वैचारिक दृष्टीने जात आणि धर्मांध शक्तीच्या वळचणीला गेलेल्या लोकांना बळ द्यांचे का? मतदान करताना फक्त एकदा विचार करा..!!

भाजपाने अकोल्यास काय दिले..!!

 अकोल्यात एकूण १३ धरणे आणि ११ बंधारे आहेत. तर, त्यात एकुण २३ टीएमसी पाणी साचते. यातून भंडारदरा वगळले तर सर्व धरणे कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या काळातील आहे. तर, ९९ टक्के धरणे ही शरद पवार आणि अजित पवार यांच्या सहकार्यातून उभी राहिली आहे. त्यात निळवंडे धरण आणि खास करुन पिंपळगाव खांड धरण यांच्याकडून पाहुन तरी कोण तालुक्याच्या कामी आले याचे आत्मचिंतन केले पाहिजे. ज्या कारखान्याची निवडणुक सुरू आहे. तो देखील पवार साहेबांची देण आहे. आज पाणीदार तालुका म्हणून पिचड साहेब हे एक माध्यम असले तरी अकोल्यातील जनतेने राष्ट्रवादीला डोळे झाकून मतदान केले आहे. म्हणून तालुका हिरवाईने नटला आहे. अवघी पाच वर्षे सत्ता मिळाली नाही म्हणून पक्ष सोडणे हे कितपत योग्य आहे? राष्ट्रवादीने तालुक्यात भरभरुन दिले. पण भाजपाने काय दिले? काल गडकरी साहेब आणि विखे साहेब यांनी येऊन काय शब्द दिला? पण, पवारांनी निधीचा शब्द दिला आणि अडिच वर्षात पाचशे कोटी निधी तालुक्याला दिला. त्यामुळे, मतदान करताना फक्त एकदा विचार करा..!!

गायकर का संपवायचे आहेत?

असा एकमेव व्यक्ती आहे. ज्यांनी तालुक्यात बहुजन समाजाची मोट बांधली आहे. ते या तालुक्याचे संपुर्ण राजकारण बदलवू शकतात. त्यांनी येथील तरुणांना नोकर्‍या दिल्या, अनेकांचे कुटूंब उभे केले म्हणून लोक त्यांना मानतात. त्यांचा शब्द प्रमाण असतो. त्यांचे राजकारण संपविले तर राजकीय पोळ्या भाजून घेता येतील. त्यामुळे, जिल्हा बँकेतली भरती काढायची, कधी संचालक पद रद्द करण्याची चौकशी लावायची. कारखान्यात भ्रष्टाचार झाला म्हणून मानसे सोडायची, त्यांच्या पतसंस्थांच्या चौकशा लावायच्या. त्यांच्यावर व्यक्तीगत पातळीवर टिका करायची, त्यांचे विरोधात जवळ करुन त्यांना बळ द्यायचे. हे असले प्रकार करुन गायकर हे नाव पुर्ण बाजुला केले म्हणजे राजकारण मोकळे होते. मात्र, ते पवार साहेबांच्या तालमीत तयार झाले आहेत. लावा ताकद आम्ही नाही वाकत म्हणून त्यांनी धिरारीने सर्व गोष्टींना सामोरे जाण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे, साम, दाम, दंड, भेद निती वापरुन एखाद्याला पुर्ण ताकतीने संपविण्याचा प्रयत्न करणार्‍यांना तुम्ही अभय देणार का? मतदान करताना फक्त एकदा हा विचार करा..!!

जे हवं ते आम्हालाच हवं..!!

अकोले तालुका हा आमदारकीला आदिवासी बांधवांसाठी राखीव आहे तर खासदारकीला एसी समाजास राखीव आहे. त्यामुळे, येथील बहुजन समाज हा राज्यात नेतृत्व करुन शकत नाही. म्हणून त्यांना कारखाना, दुधसंघ, मोठ्या ग्रामपंचायती, राज्याच्या काही संस्था यात प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. ही प्रांजळ व नैतिकतेला धरुन असणारी भावना आहे. मात्र, दुधसंघात चेअरमन हेच, कारखान्यात चेअरमन हेच, राजूर ग्रामपंचायत यांच्याकडेच, आहो.! महानंदला विठ्ठल चासकर यांचा ठराव झाला. तो देखील बदलुन यांनी स्वत:चा ठराव मंजुर करु पाहिला. तर, मोठे साहेब मंत्री झाले तेव्हा कारखान्याचे चेअरमनपद दिड वर्षे रिक्त ठेवले होते. मात्र, येथील बहुजन सामाजाला दिले नाही. अगदी आज देखील अशोकराव भांगरे, डॉ. किरण लहामटे, मारुती मेंगाळ हे नेते म्हणतात आम्हाला बहुजनांचा चेअरमन करायचा आहे. तर, दुसरीकडे जे पाहिजे मोक्याचे आम्हालाच.! हे योग्य आहे का? याचा विचार करा आणि मग मतदान करा..!!

कारखाना कोण चालु शकतो..!!

गेल्या १२ वर्षापासून गायकर साहेब कारखान्याचे सर्व काम पाहत आहेत. सह्यांची अधिकार देखील त्यांना दिले आहे. असे असताना केवळ कर्ज आणि आरोपाचा प्रश्‍न आला की तो त्यांच्यावर लोटायचा. मी केवल नामधारी होते. हे शब्द आपण ऐकले होते. मग आता नामदारीची गरज आहे का? उलट एक सही आणण्यासाठी थेट मुंबईला जावे लागते. गाडी, गडी आणि वेळ काशसाठी वाया घालवायचा? विशेष म्हणजे १५ आक्टोबरचा गळीत हंगाम सुरळीत व्हावा म्हणून जेव्हा तालुका निद्रीस्त होता. तेव्हा अंधारी रात्र काटत हायकोर्टाच्या पायरीवर कोण जाऊन बसले होते? कोणी ८७ कोटी कर्ज आणले? कोणी मजुर पाहिले, कोणी करार केले? कोणी टोळ्या शोधल्या? तर कर्जासाठी कोणी हमीपत्र दिले नाही? कोणी स्वत:वर वैयक्तीक लोन काढले नाही? कोणी वैयक्तीक जबाबदारी स्विकारली नाही? ही माहिती घ्या अन खुशाला कारखाना वाचविण्यासाठी निर्भिडपणे मतदान करा..!!