२१-० म्हणजे प्रचंड लाजिरवाना पराभव.! भांगरे व पिचड यांच्यात पुन्हा इतिहास.! फार हावेत गेलेली भाजपा भुईसपाट.! आता तरी धडा शिका.!
सार्वभौम (अकोले) :-
अगस्ति सहकारी साखर कारखान्याचा निकाल आज हाती आला. ना भुतो ना भविष्यती असे सर्वच्या सर्व उमेदवार शेतकरी समृद्धी विकास मंडळाचे निवडून आले. तर, काहींनी दिड ते दोन हजारांचे लिड घेऊन विजयावर शिक्कामुर्तब केले. विशेष म्हणजे २०१९ च्या लोकसभेप्रमाणे भाजपा ही प्रचंड हावेत असल्याचे पहायला मिळाले. सत्य स्विकारण्यापेक्षा विरोधक आणि सार्वभौमवर टिका सोडून त्यांनी कोणताही अजेंडा मांडला नाही. त्यामुळे, अकोले तालुक्यातील सहकाराच्या निवडणुकीत कधी नव्हे असा ऐतिहासिक विजय शेतकर्यांनी महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकला. यात विशेष करुन आदरणीय पिचड साहेबांचा अशोकराव भांगरे यांनी पराभव करून आणखी एक इतिहास घडविला. तर, मा.आ. वैभवभाऊ पिचड यांना फार कमी मते मिळाली. खरंतर एक सुद्ध उमेदवार निवडून आणता आला नाही म्हणजे पराभवाची दाहकता लक्षात येते. तर, ज्यांनी परिवर्तनाच्या नावाखाली तालुक्यात आफवेचे वारे उठविले होते. त्यांनी थेट परराज्यात पलायन केल्याचे पहायला मिळाले. तसेच साहेबांच्या सोबत कोणी नसते तेव्हा जनता त्यांच्या पाठीशी उभी राहते. हा भ्रम देखील कारखान्याच्या निवडणुकीत निघुन गेला. निवडणुक काहीही असो.! पण, पिचड कुटूंबाला माननारा वर्ग फार मोठा आहे. त्यांच्या २०१९ च्या निर्णयाने तालुक्यात विपक्ष वातावरण निर्माण झाले असेल. परंतु, त्यांनी आता तरी आत्मपरिक्षण करावे. अशी प्रांजळ भुमिका तालुक्यातील जुन्या जाणत्या नेत्यांची आहे.
अगस्ति कारखान्यात समृद्धी विकास मंडळ आणि शेतकरी विकास पॅनल यांना जनतेने कसा कौल दिला आहे. याची सविस्तर आकडेवारी खालील प्रमाणे सांगता येईल.
अकोले गट :- सार्वभौम१)देशमुख माणिक रामराव (विकास) २६६०, २) धुमाळ मच्छिंद्र पांडुरंग (समृद्धी) ४१५३, ३) नवले विक्रम मधुकरराव (समृद्धी) ४२१९, ४)वाकचौरे रामनाथ हौशिराम २३११ (विकास)५) वाकचौरे कैलास भास्कर (समृद्धी) ४२८२, ६)शिंदे रामनाथ भिमाजी (अपक्ष) ११४, ७) शेटे संदिप किसन. (विकास) २६०३
इंदोरी गट :- सार्वभौम१) खरात भाऊसाहेब निवृत्ती (विकास) २८३०, २)देशमुख अशोक भाऊसाहेब (समृद्धी) ४११०, ३) पिचड वैभव मधुकरराव (विकास) २६७७, ४) नवले प्रकाश किसन (विकास) २५४१, ५) सावंत पाटिलबा किसन (समृद्धी) ३९९१, ६)हासे प्रकाश रामभाऊ (अपक्ष) १९५, ७) हासे प्रदिप दत्ताञय (समृद्धी) ३९६८
आगर गट :- सार्वभौम १) आरोटे अशोक झुंबरराव (समृद्धी)४४१४, २) आरोटे सुधाकर काशिनाथ (विकास)२७११, ३) कोटकर सुनिल सुकदेव (विकास)२३९२, ४) नाईकवाडी परबत नामदेव (समृद्धी)४४१४, ५) फोडसे संपत कारभारी (अपक्ष)१७३, ६) शेटे किसन रावजी (विकास)२५२८, ७) शेटे विकास कचरु (समृद्धी)४१३८
कोतुळ गट :- सार्वभौम१) घुले सुभाष बाबुराव (अपक्ष) ८५, २) देशमुख मनोज शिवनाथ (समृद्धी)४३०६, ३) देशमुख राजेंद्र नानासाहेब (विकास)२६४५, ४) लहामटे यमाजी सखाराम (समृद्धी)४४६५५)शेळके कैलास सीताराम (समृद्धी) ४३५३, ६) शेळके रावसाहेब तुकाराम (विकास)२४६३, ७) सावंत बाळासाहेब गणपत (विकास)२४२३
देवठाण गट :- सार्वभौम१) आंबरे गोरख लक्ष्मण (अपक्ष)५७, २) उगले चंद्रभान फकिरबुवा (अपक्ष) १६०, ३) उगले नामदेव बाळासाहेब (विकास) २६४२, ४) बोंबले बादशहा दत्तु (समृद्धी) .४१४४ विजयी५) वाकचौरे भाऊसाहेब नामदेव (विकास) २५७६, ६) वाकचौरे जालिंदर वामन (विकास)२५३९, ७) वाकचौरे रामनाथ बापूराव (समृद्धी) ४१९७ विजयी ८) शेळके सुधीर कारभारी (समृद्धी) ४००७ विजयी
महिला राखीव :- सार्वभौम१) नवले सुलोचना अशोक (समृद्धी) ४५४६ विजयी २) नाईकवाडी रंजना भाऊसाहेब (विकास) २६२४, ३) मारुती आरती नानासाहेब (विकास) २६२३, ४) वाकचौरे शांताबाई दगडु (समृद्धी)४२२२ विजयी .
अनुसूचीत जा.जमाती : सार्वभौम १) पिचड मधुकरराव काशिनाथ (विकास) २८०, ५) भांगरे अशोकराव यशवंतराव ( समृद्धी) विजयी ४२१४
इतर मागास प्रवर्ग :- सार्वभौम१)देशमुख संजय गोपिनाथ (अपक्ष)१८८, २) पांडे मिनानाथ सखाराम (समृद्धी) ४२८३ विजयी ३) वडजे बाळासाहेब काशिनाथ (विकास) २५५४
१) काकड सुभाष (विकास एनटी) २५८२, - २) सचिन दराडे (समृद्धी एनटी) ४४७३
परिवर्तन गेलं राज्याबाहेर.!!
अकोले तालुक्यात २०१९ साली खरोखर परिवर्तनाची लाट आली होती. मात्र, २०२१ मध्ये अफवांचे परिवर्तन आले आणि त्यांनी कारखाना कडेलोटावर असल्याचा प्याव फोडले. पहिले म्हणे निवडणुक लढविणार नाही, नंतर म्हणे जनतेचा आग्रह आहे म्हणून लढवितो. तेव्हापासून जे गायकर साहेबांना बदनाम करण्याचे काम सुरू केले. तर, चौकशी, आरोप, व्यक्तीगत टिका, कारखान्याबाबत अपप्रचार, विरोधकांना जाऊन मिळणे. नको नको ते उद्योग केले. अखेर झाले काय? स्वत: मात्र मतदान देखील करु शकले नाही. थेट परराज्यात निघुन गेले. आज त्यांना जेव्हा गायकरांचे यश माहित झाले असेल तेव्हा कदाचित जीव नकोसा झाला असेल. काही झाले तरी जनतेला माहित होते. काय खरे आणि काय खोटे.! कारखाना कोण चालु शकतो हाच फॅक्टर शेतकर्यांनी लक्षात घेतला आणि कारखान्यात नव्याने इतिहास राचला.
सार्वभौमचे आमदार व गायकरांकडून कौतूक
खरंतर रोखठोक सार्वभौमने नेहमी सत्य आणि पुरोगामी चळवळीची कास धरली आहे. त्यामुळे, सत्याला प्रचंड प्रकषार्र्ने मांडण्याची वृत्ती म्हणजे सावभौम आहे. कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांनी सार्वभौमला बदनाम करू पाहिले. मात्र, तरी देखील सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही. या गोष्टी लक्षात ठेऊन सत्याची बाजु मांडली. हेच डॉ. किरण लहामटे साहेब तसेच गायकर साहेब यांनी भर सभेत सांगितले. सार्वभौम पोर्टल हे कोणाच्या जेवणाचे आणि पैशाचे सोडा.! चहाचे देखील मिंधे नाही. बाकी सोशल मीडियाचे पत्रकार काय करतात हे कोणाला सांगण्याची गरज नाही. परंतु, सार्वभौम हे फक्त सत्याचे आणि कौतुकाचे भुकेले आहे. प्रचंड निर्पेक्ष भावनेने सत्याची बाजु मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, विरोधाकांनी हातभर लेख लिहून चुक काय ते सुधारणे आणि बाकी दुर्लक्ष करणे यापेक्षा नावे ठेवण्यात वेळ घालविला. तर, भाजपा आणि भाऊंच्या गृपमधून लेफ्ट केले. अशाने संघटन होत नाही ना विजय जवळ करता येतो. त्यामुळे, या पराभवातून तरी मानसे जवळ करण्याचा धडा भाऊप्रेमी घेतील आशी आशा करु.!! तसेच रोखठोक सार्वभौमने आज दिवसभरात जी सर्वात फास्ट आपडेट आपल्यापर्यंत पोहचविली. त्याबाबत वाचकांनी जे आभार मानले त्याबद्दल आम्ही ऋण व्यक्त करतो.