मतदारांशी गुप्त चर्चा.! संपुर्ण एकहाती पॅनल कोणाचा नाही, कोणाचे किती येणार.! मतदारांची कोणाला पसंती, कोण कमी पडतय.!


- सागर शिंदे 

सार्वभौम (अकोले) :- 

         अगस्ति सहकारी साखर कारखान्याची निवडणुक एकवेळी स्थगित झाली. त्यामुळे, दोन्ही पॅनल आरोपांच्या तलवारी म्यान करतील असे वाटत होते. मात्र, नामनिर्देशन झालेल्या निवडणुका होण्याची चिन्हे आता स्पष्ट जाणु लागली आहेत. त्यामुळे, येत्या आठ दिवसांच्या आत कारखाना गुलालाने माखलेला दिसेल. दोन्ही गट म्हणतात गुलाल आमचाच होता. मात्र, खरी परिस्थिती काय आहे. याबाबत त्रयस्त भुमिका म्हणून गटनिहाय सर्वे केला असता अनेकांनी आपापली मते व्यक्त केली आहे. त्यामुळे, कोणाला पटो अगर ना पटो.! पण, शेतकरी समृद्धी मंडळाकडे जनतेचा बर्‍यापैकी कल दिसतो आहे. तर, मीडिया म्हणून सोडा.! पण, व्यक्तीगत हजार पेक्षा जास्त सभासदांना वाटते आहे. की, जर, गायकर, पळतात, कारभार ते पाहतात, कर्ज ते उपलब्ध करतात, शेतकर्‍यांना ते सामोरे जातात, मग पिचड साहेब नेमकी तेथे काय करतात? एक 40 वर्षाची निष्ठा म्हणून त्यांना माननारा बुजूर्ग वर्ग शंभर टक्के आहे. मात्र, त्या सर्वांचे रुपांतर मतात होईल असे वाटत नाही. त्यामुळे, संपुर्ण पॅनल कोण्या एका व्यक्तीचा तथा नेत्याचा लागेल. असे मुळीच नाही.! पण, सिताराम पाटील गायकर यांच्याकडे मतदार मोठ्या प्रमाणावर झुकलेली दिसते आहे.

इंदोरी गटात काय होईल..!

इंदोरी गट हा पिचड साहेबांच्या अस्तित्वाचा गट समजला जाऊ लागला आहे. कारण, तेथे भाजपचे भावी आमदारकीचे उमेदवार आहेत आणि हा सर्व आटापिटा केवळ त्यांच्या राजकीय स्थैर्यासाठीच चालु आहे. त्यामुळे, येणार्‍या निवडणुकांवर त्यांच्या पराजयाचे पडसाद उमटू नये. त्यासाठी फार मोठी खबरदारी घेण्याचे काम सुरू आहे. आता या गटात 1 हजार 875 मतदान असून तेथे  भाऊमामा खरात यांची उमेदवारी तेथे सर्वात भारी भरणार आहे. एकंदर नातेगोते, सर्वात महत्वाचे म्हणजे स्वभाव आणि त्यांना माननारा वर्ग देखील फार मोठा आहे. खुद्द उंचखडक बु गावात अशोक देशमुख हे देखील उमेदवार असून तेथे बर्‍यापैकी क्रॉस मतदान होताना पहायला मिळणार आहे. खरात यांची उमेदवारी ही कदाचित भाजपचे उमेदवार निवडून येण्यासाठी फार मोलाची ठरु शकते. कोणाचे काय होईल हे काही निव्वळ एकट्या गटावर किंवा उमेदवारावर अवलंबून नाही. परतुं, एकंदर मतदारांचा कौल घेतला असता बर्‍यापैकी चित्र स्पष्ट होताना दिसते. इंदोरी गटात अशोक देशमुख यांना देखील दगाफटका होईल असे वाटत नाही. तसेच प्रदिप हासे हे देखील बर्‍यापैकी जनतेत आहे. त्यामुळे, इंदोरी गटात अनपेक्षित निकाल लागेल अशी शक्यता आहे. तर, भल्याभल्यांचे भविष्य धोक्यात असल्याचे दिसते आहे. तर, इंदोरी गट हा दोन्ही गटांना वाटतो तितका सोपा नसणार आहे.

आगार गटात काय होईल.!

अगार गटात भल्याभल्यांच्या राजकीय भविष्यावर टांगती तलवार आहे. मात्र, समृद्धी मंडळाचे अशोक आरोटे, विकासराव शेटे आणि पर्बतराव नाईकवाडी हे तिघे मातब्बर नेते असून आरोटे आणि नाईकवाडी यांच्या विजयावर फार काही कस लावावा लागेल असे वाटत नाही. मात्र, येथे सुधारक आरोटे यांना देखील कमी लेखून चालणार नाही. तर, विकास शेटे यांचे व्यक्तीगत संबंध, नात्यांचा गोतावळा आणि कचरुपाटील शेटे यांनी स्वत: घातलेले लक्ष यामुळे, हा विजय शक्य वाटतो आहे. तर, किसन शेटे यांची उमेदवारी संमृद्धी मंडळाला डोकेदुखी ठरू शकते. तसेही भाऊमामा खरात आणि शेटे यांचे नातेसंबंध असल्यामुळे, दोन्ही उमेदवार्‍या भाजपला सोईस्कर पडणार आहे. मात्र, जसे इकडे घराणेशाही हा मुद्दा पुढे आला तसा दुसरीकडे त्याच-त्याच घरात संधी हा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे, आगार गटात फार काही अटातटीची लढाई होईल असे मतदारांच्या चर्चेनंतर वाटत नाही. मात्र, प्रत्येक गटात कोणी ना कोणी एक व्यक्ती जड असल्याचे दिसते आहे.

अकोले गटाचे काय.!

अकोले गट तसा फार सुशिक्षित आहे. त्यामुळे, येथून सार्वधिक क्रॉस मतदान होईल असा मतदारांकडून आंदाज येत आहे. या गटात 1 हजार 192 मतदार असून काही व्यक्तींचे भविष्य बर्‍यापैकी पॅनल टू पॅनल मतदान चालले तर जीव भांड्यात पडणार आहे. येथे कळस येथून कैलास वाकचौरे यांना काही भिती नाही. मात्र, त्यांचे मतदार किती पॅनल टू पॅनल चालतील त्याचा फायदा त्यांच्या मंडळाला होणार आहे. कारण, एकट्या कळसमध्ये 253 मतदान आहे. त्यात बरोबर विकास वाकचौरे, विजय वाकचौरे यांची देखील मोठी कसरत लागणार आहे. कारण, सुगाव बु येथे देखील 210 मतदान आहे. तर अकोले शहरात 405 मतदान आहे. त्यामुळे, कैलास वाकचौरे यांच्यावर या गटाची फार मोठी धुरा असणार आहे. त्यात सुगाव येथे तिकीटाहून झालेल्या नाराजी नाट्यामुळे बार्‍यापैकी फुटतूट झाल्याचा फायदा समृद्धी मंडळाला होणार आहे. मात्र, डी गँन्ग थेरीचा अवलंब झाला तर चित्र वेगळे दिसू शकते.

कोतुळ गटाचे काय.!

कोतुळ गटात 1 हजार 990 मतदार असून येथे स्थानिक राजकारणाचा फार मोठा तोटा होणार आहे. त्याचा काही अंशी फायदा हा भाजपाच्या राजेंद्र देशमुख यांना होईल असे वाटते. राजेंद्र यांचा मनमिळावू स्वभाव, डी लाईन आणि नातेसंबंध ही त्यांची जमेची बाजु आहे. मात्र, कोतुळमध्ये 272 मतदान असून स्थानिक मतांवर काही फरक जाणवणार नाही. त्यासाठी पुर्ण मुळा पट्ट्यात लक्ष घालावे लागणार आहे. कारण, धामनगाव पाट ते तळे, लव्हाळी शिसवद या भागात डॉ. किरण लहामटे आणि यमाजी लहामटे यांचे फार मोठे नेटवर्क आहे. विशेष म्हणजे या भागात 1 हजार 200 मतदान असून आमदारांच्या पेक्षा गुरूजींना माननारा वगर्र् फार मोठा आहे. तर, मोग्रास, धामनगाव, पिंपळगाव खांड, ब्राम्हणवाडा या परिसरात गायकर नावाचा फॅक्टर सर्वात जास्त चालतो. त्यामुळे, कोतुळ गटात समृद्धी मंडळ फार जोमात आहे. तर, याहून महत्वाचे म्हणजे मुळा पट्ट्यात ना वैभव पिचड ना मोठे साहेब यांचे थेट संबंध कमी पडला आहे. त्यामुळे, मुळेत संमृद्धी बादशाहची भुमिका पार पाडेल असे मतदारांशी बोलल्यानंतर लक्षात येत आहे.

देवठाण गटाचे काय.!

देवठाण गटात 1 हजार 328 मतदान आहे. या गटात भाजपचा विचार केला तर बाबासाहेब उगले यांची उमेदवारी ही सरशी दिसते आहे. त्यांचे स्थानिक नेतृत्व, तालुक्यातील नातेसंबंध आणि कायम धावणारा स्वभाव यामुळे, गणोरे, डोंगरगाव, हिवरगाव अशा काही गावांतून त्यांना सपोर्ट होईल. मात्र, त्यांच्याबाबत नाराजीचे देखील वातावरण असून तशी चर्चा आहे. यापलिकडे देवठाण गटातून कोणाची उमेदवारी जड वाटत नाही. उलट एक कलमी कार्यक्रम असल्याच्या भावना मतदारांनी व्यक्त केल्या आहेत. देवठाण गटात गणोरे (107), डोंगरगाव (130), पिंपळगाव निपाणी (82), विरगाव (172) ही गावे महत्वाची भूमिका पार पाडणार आहेत. भाजपकडून नवखे उमेदवार असले तरी त्यांना जनता फार काही सपोर्ट करेल असे वाटत नाही. मात्र, तरी देखील सहज विजय कोणाचा होईल असे चित्र तालुक्यातील मतदारांशी बोलल्यानंतर दिसत नाही. मात्र, सर्व पॅनल एकाच व्यक्तीचा येईल असे सुद्धा चित्र नसून समृद्धी विकास मंडळाला बर्‍यापैकी मतदारांचा पाठींबा असल्यामुळे, सत्ता स्थापनेला अडचण निर्माण होईल असे वाटत नाही. तर, आरक्षणाच्या जागा देखील प्लस मायनस होण्याचे चिन्हा दिसत आहे. मात्र, तरी समृद्धी मंडळाला सकारात्मक प्रतिसाद वाटतो आहे.