MSEB कर्मचाऱ्यांच्या पगारावर अधिकाऱ्यांचा डल्ला.! दोघांवर लाचलुचपतचा छापा, महिलेसह दोघे अटक, संगमनेर लाचखोरीत अव्वल.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                   विज वितरण कंपनीत आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांचा पगार काढण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ३ हजार रुपयांची मागणी प्रथमेश ईलेक्ट्रीकल्स (ठिकाण, भाऊसाहेब थोरात, व्यापारी संकूल) येथील कार्यालयात कार्यरत आसणारे अधिकारी सुनिल पोपट पर्बत (रा. निंबाळे, ता. संगमनेर) आणि लीपिक सुजाता तेजस कांबळे-पगारे (मालदाड रोड,  संगमनेर) यांनी केली. आम्ही काम करतो, पाणी पाऊस, उन वारा यांची तमा न बाळगता सेवा देण्याचा प्रयत्न करतो आणि शुल्लक पगार असताना देखील त्याला भ्रष्टाचाराची कात्री लावण्याचे काम या भ्रष्ट लोकांनी केले आहे. त्यामुळे, एका कर्मचाऱ्याने याबाबत लाचलुचपत विभाग नगर यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलीस अधिक्षक सुनिल कडासणे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरचे उपाधिक्षक खेडकर आणि पोलीस निरिक्षक डॉ. शरद गोर्डे यांच्या पथकाने संगमनेर येथे सापळा रचला. ठरल्याप्रमाणे आज २० जुलै २०२२ रोजी ३ वाजण्याचा सुमारास दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांवर संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य विज विरतण मंडळ येथे काही कर्मचाऱ्यांना एका कंपनीने लिमिटेड कामासाठी नोकऱ्या दिल्या आहेत. त्यांचे पगार हे प्रथमेश ईलेक्ट्रीकल्स भाऊसाहेब थोरात यांच्या व्यापारी संकुलन येथील एका कार्यालयातून होते. संगमनेर तालुक्यात असे आऊटसोर्सिंग करणारे अनेक कर्मचारी आहेत. त्यांचे जून महिन्यात पगार थकले होते. मात्र, ते जुलै महिन्यात आले तेव्हा हे कर्मचारी प्रथमेश इलेक्ट्रीकल्स कार्यालयात आणण्यासाठी गेले होते. तेव्हा, भ्रष्टाचारी सुपरवायझर सुनिल पर्बत आणि सुजाता कांबळे - पगारे यांनी एका कर्मचाऱ्याकडे ३ हजार रुपयांची मागणी केली. आता, तोडका पगार त्यात ३ हजार रुपये यांच्या घशात घालायचा, ह्या वेदना संबंधित कर्माचाऱ्यास वेदना झाल्या. त्याने या दोन्ही भ्रष्टाचारी व्यक्तींना विनंती केली. साहेब.! आहे त्यावर आमचा संसार उभा रहात नाही. त्यामुळे, तोडक्या पगाराला भ्रष्टाचाराचा हात लावू नका. मात्र, पैशाची लालसा लागलेल्या व्यक्तींनी त्यांच्या भावनांना अभय दिले नाही. ते पैसे मागण्यावर ठाम राहिले.

                 दरम्यान, घामाचे मोल यांना समजत नाही. त्यामुळे, यांना प्रेमाची विनंती कळत नाही म्हणून तक्रारदाराने थेट नगरला तक्रार केली. नगरचे पोलीस उपाधिक्षक खेडकर यांनी त्यांची दखल घेत तत्काळ पुढील योजना सुरु केल्या.  ठरल्या प्रमाणे ३ हजार देण्याचे ठरले तेव्हा खेडकर यांच्या पथकाने प्रथमेश इलेक्ट्रिकल्स येथे सापळा लावला. जेव्हा सुनिल पर्बत आणि सुजाता कांबळे या दोघांनी संबंधित रक्कम स्विकारली तेव्हा लगेच या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतली. रंगेहात पकडल्याने या दोघांना घाम फुटला आणि त्यांनी घडला प्रकार कथन केला. आता दोघांना अटक झाली असून त्यांच्या घराची घडती, बँक अकाऊंन्टची चौकशी, यात आणखी कोणाचा हात आहे का? याची कसून चौकशी सुरु होती. दुपारी उशिरापर्यंत दोघांना विचारपूस केल्यानंतर काही बाबी समोर आल्या आहेत. त्यामुळे, दोघांवर संगनमेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. लाचलुचपतने केलेल्या या कामगिरीमुळे आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांनी प्रचंड आनंद व्यक्त केला आहे. उन वारा पावसात आम्ही कामे करायची आणि महिन्याकाठी पगारातले पैसे यांच्या घशात घालायचे. त्यामुळे, कर्मचारी यांना वैतागले होेते. या कारवाईने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

          दरम्यान, संगमनेर तालुक्यात किती भ्रष्टाचार बोकाळला आहे याची प्रचिती आता येऊ लागली आहे. संगमनेरात असे कुठले शासकीय व निम्नशासकीय कार्यालय राहिले नाही की, जिथे लाचलुचपत विभागाने छापा मारला नाही. त्यामुळे, येथे प्रत्येक शासकीय कार्यलयात भ्रष्टाचार होत असल्याची चर्चा संगमनेरातील सुज्ञ नागरिक करत आहे. अगदी पोलीस खात्यात अधिकाऱ्यांपासुन ते कर्मचाऱ्यांपर्यंत छापे मारल्याचे संगमनेरात पाहायला मिळाले. येथील हप्तेखोरीची अनेकदा अधिकाऱ्यांकडे तक्रारी झाल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच काय.! सर्कलपासून ते तलाठी यांच्यावर कितीवेळा ट्रॅप होताना दिसत आहे. त्यामुळे, या वर्षी लाचखोरीत संगमनेर तालुका जिल्ह्यात अव्वल असल्याचे बोलले जात आहे.

 दरम्यान, अकोले तालुक्याच्या कर्मचाऱ्यांकडून देखील या भ्रष्टाचारी लोकांनी दलाली केली आहे. तर, या व्यतिरिक्त अकोल्यात काही वायरमन देखील त्यांचे काम सोडून दलाली करताना दिसत आहे. पगाराच्या व्यतिरिक्त भलते काम त्यांच्याकडून होत आहे. येथील वायरमन देखील ठेकेदारीचे काम करत असून वर्कआॅर्डर नसताना देखील मनमानी कारभार करताना दिसत आहे. काही व्यक्तींच्या रेकॉर्डींग आणि पुरावे हे सोशल मीडियावर फिरताना दिसत आहे. हे पुरावे देखील लाचलुचपत विभागाकडे देण्यात येणार असून काही दिवसात अकोले शहरात देखील भुकंप होण्याची शक्यता आहे. तालुक्यात देखील मनमानी कारभार सुरु असून त्यावर कोणाचा अंकूश आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. येथील काही वायरमन मोठ्या वसुलीची कामे करीत असून त्याबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रारी येऊन देखील त्यांचा कानाडोळा हे बरेच काही सांगून जात आहे. तर, विज वितरण कंपनिचे पर्मनन्ट कर्मचारी हे आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांवर तावतुगारी करत असून त्यांच्या तक्रारी वारंवार येऊन देखील यावर कधी ठोस निर्णय होत नाही. त्यामुळे, ऐकीकडे पगार कमी, त्यात भ्रष्टाचार, त्यात सन्मान नाही, त्यात जीव धोक्यात घालुन कामे करायची. अशी ही कसरत निमशासकीय कर्मचाऱ्यांची होत आहे.