अगस्ति कारखान्याच्या निवडणुकीचे आज काय झाले.! कधी होणार निर्णय.? पिचडांना मिळाल्याने सावंत साहेबांच्या 50 वर्षे एकनिष्ट असणारे शिष्य त्यांच्या विरोधात.!
या रणधुमाळीत माझे सदर बंद होते. कारण काय विश्लेषण करावयाचे ? सुचेना. या निवडणुकीत दोन पँनल. त्यांच्या प्रचाराचे मुद्दे तरी काय ? समजेना एकीकडे शेतकऱ्यांची काळजी वाढत होती त्यात परिवर्तनवाल्यांनी ऐनवळी हाराकिरी केली. माघार घेतली आणि निवडणुकीतील मुद्द्येबाजी संपली. निवडणूक केवळ व्यक्तिगत पातळीवर आली . कारखान्याच्या अर्थशास्त्राचा मुद्दा बाजूला गेला. परिवर्तनवाले गेली दोन वर्ष जे मुद्दे मांडत होते त्यांना त्यांनीच मूठमाती दिली तेच मुद्दे उगळण्यासाठी त्यांनी थेट निवडलेले व्यासपीठ पूर्णार्थाने विसंगत होते.त्यामुळे त्या व्यासपीठावरून ते उगळत असलेले कर्जबाजारीपणाच्या मुद्द्यांकडे सभासद दुर्लक्ष करते झाले. एखाद्या संस्थेचा प्रदीर्घ काळ राहिलेले अध्यक्ष निर्दोष पण उपाध्यक्ष दोषी हे तर्कशास्र लोकांना पटेना. मात्र या बाबत पत्रकार परिषदा मागून परिषदा घेणारे परिवर्तन वाले जास्त अप्रिय व विसंगत होत गेले. शेवटी अजित पवार यांच्या सभेने अंतिम ठोका मारून समृधीवाल्याचे पारडे जड केले असे दिसून आले.
श्री अजित पवार यांची सभा काहीतरी सांगून गेली आहे. सत्तावीस वर्ष अगस्ति सह तालुक्याची सत्ता होती. मात्र आज ज्या पायरीवर हा कारखाना नेऊन ठेवला आहे त्या बद्दल अगस्तीचे उस उत्पादक दु:खी आहेत. ते शेजारच्या संगमनेर शी तुलना करतात. व आणखी निराश होतात. त्यामुळे कारखाना कोण चालू करील, चालू ठेवील, कोण कर्ज उभारील अशाच मुद्द्याभोवती निवडणूक प्रचार फिरत राहिला अगस्तीला कोण उंचीवर नेऊन ठेवील ? निदान संगमनेर इतका तरी भाव देईल ! संगमनेर, माळेगाव, पंचगंगा सारख्या सुसंपन्न करू अशा गुणवत्ता प्रधान प्रचाराचा मागमूसही ऐकू आला नाही. म्हणजे परीक्षेला बसून जेमतेम एटी केटी ने पास व्हायचे. प्रथम वर्गामध्ये पास व्हायचे स्वप्नच नसावे काय ? असो अगस्ति समृद्धीमय व्हावा ही उत्पादकांची अपेक्षा आहे ते बरेच कोर्टाच्या निणर्यावर अवलंबून आहे.
उद्या चित्र स्पष्ट होईल.!
दरम्यान, समृद्धी मंडळाने औरंगाबाद खंडपिठात एक याचिका दाखल केली होती. त्यावर आज दि. 25 जुलै 2022 रोजी सुनावणी होणार होती. स्पेशल बेन्च हा निर्णय देणार होते. मात्र, ते रेग्युलर कार्टाकडे वर्ग झाले. आज, वकीलांनी याबाबत आपले म्हणणे सागर केले असता न्यायालयाने यावर अद्याप काही निर्णय दिला नाही. ही निवडणुक होणे हे अत्यंत गरजेचे आहे. अवघा एक दिवसाचा प्रश्न आहे. तयारी देखील झाली आहे. त्यामुळे अगस्ति कारखान्याबाबत आपण विचार करावा अशी विनंती समृद्धी मंडळाच्या वकीलांनी कोर्टाकडे केली आहे. त्यानंतर, कोर्टाने अद्याप कोणताही निर्णय दिला नाही. परंतु, यावर उद्या दि. 26 जुलै रोजी न्यायालय निकाल देण्याची शक्यता वकीलांनी दर्शविली आहे. उद्या आणखी काही कायदेशिर बाबी करण्यात येणार आहेत. त्यामुळे उद्या न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या सुनावणीसाठी सिताराम पाटील गायकर हे औंरंगाबाद येथे असून तत्काळ हा प्रश्न मार्गी कसा लागेल यासाठी ते प्रयत्न करीत आहे.