उद्धव ठाकरे हेच एकनाथ शिंदे.! होय की नाही याचे अचुक विश्लेषण.! शिवसेनेच्या बंडखोरीचा इतिहास आणि नंतर हाल.!

- सागर शिंदे

सार्वभौम (मुंबई) :- 

                           शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे 42 आमदार फोडले आणि ते भाजप प्रणित राज्याच्या आश्रयाला निघून गेले. आता आजवरचे शिवसेना आणि अन्य बंड पाहता हे सर्वात मोठे आणि अगदी बोलक्या बाहुल्यांसारखे बंड सुरु आहे. पहिली गोष्ट म्हणजे अडिच वर्षे संपली, दुसरी गोष्ट शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा पुर्ण झाली,  तिसरी गोष्ट म्हणजे इडीची चौकशी सुरु झाली आणि पाचवी गोष्ट म्हणजे शिवसेेनेचे निष्ठावंत आमदार सकाळी मातोश्रीवर येतात आणि संध्याकाळी गुवाहटीमध्ये पोहचल्याची बातमी हाती येते. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी ज्यांना येथील आमदारांना राखण बसविले होते. त्यातील देखील आमदार आसामला पोहचले. याहून चकंबित बाब अशी की, ज्यांना शिंदे यांच्याबरोबर चर्चेला पाठविले, तडजोडीला पाठविला तेच नंतर शिंदे गटात जाऊन दाखल झाले. म्हणजे घरचा भेदी लंका दहन.! आता हे चार-दोन, विस-पंचविस विधायक गेले तर सहाजिक वाटेल. पण, तब्बल 40 ते 45 आमदार जातात म्हणजे याचा अन्वयार्थ लावायचा तरी काय? एकतर एकनाथ शिंदे तुमच्यापेक्षा मोठे झाले असे म्हणावे लागेल. किंवा तुम्ही एकनाथरावांना हेतू ठेऊन मोठे केेले असे तरी म्हणावे लागेल. आता काय खरं आणि काय खोटं, हे देवाला ठाऊक. पण, आता लोकं शंका घेऊ लागले आहेत. जग म्हणतय हा मुख्यमंत्र्यांच्या वरदहस्ताचा डाव आहे. तर, शिवसैनिक म्हणतात. नाही, आमचे साहेब असे कधीच करणार नाही.  त्यामुळे, जग गेले टिपरीत. पण, 2019 मध्ये जसे काही अतिशहान्यांनी अजित दादांचे बंड हे शरद पवार साहेबांच्या पत्थ्यावर मारले होते. त्याला सिद्ध करताना पवारांनी आजवर अडिच वर्षे सरकार तसूभर हलु दिले नाही. म्हणून तर ते शहाने तोंडघाशी पडले. आता ठाकरे साहेबांना देखील ही आग्निपरिक्षा द्यावी लागणार आहे. एकनाथ शिंदे यांचे बंड यात त्यांचा तिळमात्र सहभाग नाही. हे सिद्ध करुन द्यावे लागेत. त्यासाठी बंडखोरांच्या हो ला हो न म्हणता भलेही मध्यावधी निवडणुका होऊद्या. पण, त्यांना जाऊन मिळू नका. कारण, अडिच वर्षे सत्ता मिळेलही. पण, या महाराष्ट्राच्या मातीत तुमची जी ओळख आहे, तुमचा निर्भिड बाणा आहे, स्वाभिमान आणि विश्वास आहे. त्याला तडा जाऊ देऊ नका. सत्ता आणि आमदार पुन्हा कमविता येतील; पण एकदा गमविले मान-सन्मान कधीच मिळविता येणार नाही.उद्या निवडणुका होऊद्या, संबंध महाराष्ट्र आणि शिवसैनिक तुमच्या पाठीशी उभे दिसतील. तर, कोणाच्या बळावर नव्हे, सहानुभूतीच्या लाटेवर मुंबई महानगरपालिकेवर भगवा ध्वज फकडताना दिसेल. पण, हे सर्व कधी? जेव्हा मुख्यमंत्रीच बंडखोर नसेल, तेव्हा...!!!!

शिवसेना बंड आणि हाल!

सन 19 जून 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली. तेव्हापासून ते आज 56 वर्षाच्या प्रदिर्ग काळात शिवसेनेने अनेक बंड पाहिले आहेत. त्यात पाच बंड त्यांच्या फार जिव्हारी लागले आहेत. त्यात 6 नोंव्हेंबर 1966 साली छगन भुजबळ यांनी अंतर्गत कलहातून शिवसेनेला रामराम ठोकला. तेव्हा त्यांच्यासोबत 25 आमदार होते असे बोलले जात होते. मात्र, प्रत्यक्षात सहा आमदार घेऊन ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यानंतर राज्यात शिवसैनिकांनी प्रचंड राडा केला होता. ते आजही भुजबळांना विसरु शकले नाहीत. ते पक्षातून गेल्यानंतर शिवसेनेचे 73 आमदार झाले. त्यानंतर 3 जुलै 2005 मध्ये नारायण राणे यांनी शिवसेना सोडली. त्याच्याकडे 62 पैकी 22 आमदार आणि पाच खासदार होते असे बोलले जात होत. मात्र, प्रत्यक्षात फक्त 10 आमदार त्यांच्यासोबत गेले. त्यानंतर कोकणातून शिवसेनेला धक्का बसला आणि 2009 च्या निवडणुकीत शिवसेनेला केवळ 44 आमदार निवडून आणता आले. त्या पाठोपाठ त्यांच्या घरातच बंडखोरी झाली आणि 27 नोव्हेंबर 2005 मध्ये राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यांनी आमदार एकच नेला पण कार्यकर्ते मात्र आफाट केले. त्यावरच त्यांनी स्वत:चा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष उभा केला. त्यानंतर कोणी शिवसेनेतून बाहेर पडेल असे वाटत नव्हते. कारण, गुलाबराव पाटलांसारख्या निव्वळ भगव्या डरकाळ्या उभा महाराष्ट्र ऐकत होता. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मविरांचे वारसदार म्हणून अनेकांनी रंगमंच गाजविली. मात्र, ज्या झाडाने फांद्या मोठ्या केल्या, त्याच फांदीच्या दांड्याने झाडावर घाव घातले. असे म्हणून ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडावर निशाणा साधला. आता शिंदे यांनी 21 जून रोजी 42 ते 45 आमदार घेऊन शिवसेनेच्या विरोधात नव्हे.! शिवसेनाच आमची आहे असा दावा करुन बंड केला आहे. त्यामुळे, जर ठाकरे साहेब त्यांना सामिल नसतील तर हे ना भुतो ना भविष्यती अशा प्रकारचे बंड मानले जात आहे. 

म्हणून ठाकरेही बंडखोर वाटतात.!

खरंतर, सकाळी मातोश्रीवर असणारा आमदार हा रात्री थेट गुवाहटीमध्ये दिसतो आहे. ज्या आमदारांचे राखण करण्यासाठी आदित्य ठाकरे यांना एका हॉटेलमध्ये ठेवले होते. तेथील आमदार देखील काही तासात आसाममध्ये दिसले. म्हणजे इतक्या मोठ्या पक्षाचे 55 पैकी 42 आमदार फुटतात आणि पक्षातील एक गटनेता 50 आमदार घेऊन बाहेर पडतो. याची जरा देखील चुनूक पक्षाध्यक्ष, मुख्यमंत्री, स्वीय सहायक, गृहमंत्री, किंवा गुप्तहेर खात्यास लागत नाही. ही किती मोठी बाब आहे? हे त्यांच्या सरकारचे अपयश म्हणायचे किंवा मग बंडखोरांशी संगनमत. खरंतर, विधानपरिषद आणि राज्यसभा या निवडणुकीत महाविकास आघाडीत बंडखोरी झाली. हे स्पष्ट असताना देखील त्याची चौकशी झाली नाही. ना कोणावर कारवाई झाली. केवळ जे-जे होईल ते-ते पाहत रहावे अशी मुकभुमिका त्यांनी बजावल्याचे आरोप होऊ लागले आहेत. आता एकनाथ शिंदे खरोखर इतके बडे नेते आहेत का? ज्यांना भंडारा, गडचिरोली विदर्भ-मराठवाडा येथील आमदार साथ देतील आणि त्यांच्यामागे चालते होतील? तर मुळीच नाही. शिंदे यांचे प्रस्त मुंबई मर्यादीत आहे. त्यामुळे, त्यांच्यामागे हिंदुत्वाच्या नावाखाली सुद्धा इतके आमदार जाऊ शकणार नाही. तर सत्तार, कडू आणि अन्य महिला आमदार यांना केव्हापासून हिंदुत्वाचा पुळका आला? ते त्या मुद्द्याखाली बंडखोरी करीत आहेत? तर, ज्यांनी उभी हयात शिवसेनेला अर्पन केली, ज्यांनी बाळासाहेबांना दैवत मानले, जे सातव्या मजल्याहून ठाकरे यांच्यासाठी उडी मारायला तयार होते. ते ठाकरेंच्या विरोधात महाराष्ट्रातून आसामध्ये उड्या मारत आहेत. त्यामुळे, नेमके काय समजायचे?

खरंतर, बोलले जाते की, ठाकरे साहेब महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांना वैतागले आहेत. त्यांच्याकडून जर काही उपद्रव झाला तर हकनाक इडी आणि चौकशी त्यानंतर नको त्या आरोपाखाली जेलची हवा खायची वेळ यायला नको.! म्हणून त्यांनाच बाहेर पडायची घाई झाली तर नाही ना? म्हणूनच पक्ष बदनाम व्हायला नको, पक्षप्रमुखांवर चिखलफेक व्हायला नको, जनतेचा रोष वाढायला नको, हिंदुत्ववाद ही संकल्पना भर्कटायला नको. अन झालाच रोष निर्माण, झालेच कोणी बदनाम तर एकनाथ शिंदे होतील. ते पक्षासाठी आजही इतके तरी करुच शकतात. त्यामुळे, हा खेळ ठाकरे साहेबांच्या सहमतीने तर सुरू नाही ना? अशी शंका उपस्थित होत आहे. आता पक्ष चालवायचा म्हणजे प्रमुखाने सर्वांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. त्यामुळे, सध्या ठाकरे यांच्यासह संजय राऊत, अनिल परब अशा अनेकांना इडीची नोटीस आली आहे. त्यामुळे, लालुप्रसाद, भुजबळ, देशमुख आणि मलिक यांच्यासारखे आत बसण्याची वेळ स्वत:वर किंवा आपल्या आमदारांवर येऊ नये म्हणजे झालं.! त्यामुळे, भाजपशी पंगा घेण्यापेक्षा अडिच वर्षे मुख्यमंत्रीपद भोगलं आहे. आता तिकडे जाऊन केंद्रात आणि राज्यात आगाऊ मंत्रीपदे घेऊन इडिचा ससेमिरा बंद केला तर ते कधीही चांगले राहील. वरुन हिंदुत्वाचे राजकारण देखील कंटिन्यु करता येईल. असे अनेक मुद्दे आहेत. त्यामुळे, शिंदे "तुम्ही मारल्यासारखे करा मी रडल्यासारखे करतो". अशी भुमिका यांच्यात नाही ना? असा प्रश्न आता नेटकरी उपस्थित करु लागले आहेत. मात्र, या संगळ्यात नंतर "गंगाधर हाच शक्तीमान" आहे. असे सिद्ध झाले तर नवल वाटण्याचे काहीच कारण नाही.!

म्हणून ठाकरे बंडखोर वाटत नाही.!

खरंतर, आजही लोक म्हणतात. शिवसेनेचे सोडा, पहिले पवार साहेब आणि दादा नॉटरिचेबल तर नाही ना? ते पाहुण घ्या.! म्हणजे, सोशल मीडियावरील हे वाक्य मिश्कील जरी वाटत असले तरी त्यास 1978 आणि 2019 ची पार्श्वभूमी आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या स्वभावात एकदाम स्पष्टोक्ती आणि वागण्यात स्वाभिमानी ताठरपणा आहे. त्यांना 2019 मध्ये भाजपने मुख्यमंत्रीपदाचा शब्द फिरविला म्हणून त्यांनी रिस धरुन मविआ स्थापनेस होकार दिला. अगदी कोरोनाच्या काळात त्यांच्या भावना राज्याने नव्हे.! देशाने पाहिल्या. अगदी काल परवा त्यांचे फेसबुक लाईव्ह पाहिल्यानंतर सर्व महाराष्ट्र गहिवरून गेला. त्यामुळे, त्यांच्या विश्वासहार्यतेवर अशा प्रकारे शंका घेणे हे चुकच वाटते. खरंतर त्यांना सरकारमधून बाहेर पडायचे असते तर त्यांनी यापुर्वीच अनेकदा हिंदुत्व आणि अन्य गोष्टींवर मतभेद झाले. तेव्हाच ते बाहेर पडले असते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. सरकार टिकले पाहिजे यासाठी त्यांनी त्यांच्या 55 आमदारांना सांगितले. निधी आणि बदल्यांसाठी तुम्ही माझ्याकडे न येता संबधित खात्याकडून ते करुन घ्या असे स्वत: आमदार क्षिरसागर सांगत होते. म्हणजे, त्यांनी कधी टोकाची आणि वादाची भुमिका घेतली नाही. अर्थात ही त्यांची चुक असेलही. मात्र, मविआ मध्ये वाद होऊ नये हीच त्यांची प्रंजळ भावना होती. जर मविआ मधून बाहेर पडायचे होते. तर, राज्यसभेच्या निवडणुकीत बंडखोरी उघड झाली होती. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर खापर फोडून काढता पाय घेतला असता. मात्र, त्यांनी तसे केले नाही. उलट कोविड काळात सरकार टॉप कसे होते. हे त्यांनी गुणवत्तेतून सिद्ध केले आहे.

आता राहिला प्रश्न पक्षाचा. तर, ठाकरे यांच्यावर शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी विश्वास टाकला आहे. त्यांना अडिच वर्षे साथ दिली आहे. त्यामुळे, आज सरकार जाईल मात्र, जो विश्वास आहे. तो ठाकरे कधीच मिळवू शकणार नाही, हे त्यांना ज्ञात आहे. त्यामुळे, ते बंडखोरी करणार नाही. तसेच संबंध महाराष्ट्र पहातो आहे. एकतर त्यांनी भाजप सोबतच युती करायला हवी होती. पण आता लोकशाहीनुसार त्यांनी बहुमत सिद्ध केलेच आहे. तर, त्याचा अनादर झाल्यास जनता त्यांच्यावर आणि त्यांच्या पक्षावर कधी विश्वास ठेवणार नाही. एव्हाना पवार साहेबांचे काम टॉप मोस्ट भारी आहे. पण, आजही त्यांनी "वसंतदादांच्या पाठीत खंजिर खुपसला" हे वाक्य त्यांच्या "पांढर्‍याशुभ्र कापडावर काळा डाग" असल्याचे बोलले जाते. त्यामुळे, ठाकरे घराण्याचा इतिहास असा लिहिला जाऊ नये. याची ते नक्कीच काळजी घेत असतील. आज आमदार सोबत नाही. मात्र, जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे. हे वर्षा ते मातोश्रीवर जाताना आपण पाहिले. ज्यांनी-ज्यांनी शिवसेना सोडली त्यांचे काय हाल झाले हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे, ठाकरे साहेबांनी अद्याप संघर्ष सोडला नाही. त्यामुळे, ते बंडखोर असेल असे अनेक तज्ञांना वाटत नाही. विशेष म्हणजे त्यांचे राजकारण पाहता फार "अंडेपील्ले आणि द्वेषाचे" नाही. जे असेल ते सरळ-सरळ आहे. त्यामुळे, त्यांनी फेसबुकहून सांगितले. की, मी मुख्यमंत्री वर्षा बंगला सोडतो आहे. त्यांनी तो तितक्याच जड अंत:करणाने सोडला. ते मुख्यमंत्रीपद देखील सोडण्यास तयार आहेत. यापलिकडे आजही ते बंडखोर आमदरांना बोलावत आहेत. त्यांच्यावर कारवाईची कुर्‍हाड उगारत आहेत. कधी त्यांना भावनिक साद घालत आहेत. त्यात विशेष म्हणजे ते अजुन देखील पवार आणि गांधी यांच्या विश्वासास पात्र असून ते मविआ टिकविण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. तर, एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊ त्यांनी त्यांना राक्षसी प्रवृत्ती म्हणून संबोधले, आमदारांना कैद केले, त्यांची आग्रा येथून सुटका करावी लागेल,  अशा अनेक खडतर शब्दांनी बंडखोर शिंदे यांचा खरपूस समाचार घेत आहेत. बंडखोरांची कायदेशिर व तांत्रिक कोडी करीत आहेत. वेळ आली तर मी विरोधी राहिल, मध्यावधी निवडणुकांना सामोरे जाईल. असे ते अंत:करणातून बोलताना दिसत आहे. तर हे ठाकरे यांच्या वाराला प्रतिवार करण्याचे सामर्थ्य आजवर कोणात नव्हते. तरी आज शिंदे त्यांच्या शब्दाला प्रतिशब्द उत्तर देत आहे. कायदेशिर बाबींना विरोध करत आहे. म्हणजे, ऐकीकडे शिवसेनेकडून १७ जणांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली. तर, शिंदे यांनी दोन अपक्षांच्या नावे पत्र लिहून विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणल्याचे पत्र पाठविले आहे. हा पहिल्यांदा पक्षिय वाद नंतर राजकीय झाला आणि तो कायदेशिर प्रक्रियेवर येऊन ठेपला आहे. त्या शिवसेना प्रमुखांवर कोठेही शंका उपस्थित होत नाही. त्यामुळे, उद्धव ठाकरे हेच प्रती एकनाथ शिंदे आहेत. असे म्हणणे चुकीचे ठरेल असे विश्लेषकांना वाटते आहे.