राष्ट्रवादीच्या गटनेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार.! एका गटाचा विरोध एक समर्थक, भाजपने त्यांचा एकदा वापर केला, पुन्हा नको.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
सन 2019 च्या विधानसभेला पिचड साहेबांचा भाजपत प्रवेश झाला आणि त्यांच्यामुळे त्यांचे कट्टर समर्थक यांची प्रचंड गोची झाली. त्यात सिताराम पाटील गायकर, मधुभाऊ नवले आणि कैलास वाकचौरे यांच्यासह अनेकांची नावे घेता येतील. मात्र, ही लोकं खरोखर भाजप विचार सारणीची आहेत का? तर मुळीच नाही. खुद्द पिचड साहेब देखील पुरोगामी विचार सारणीचे आहेत. मात्र, त्यांच्या एका निर्णयाने अनेकांची गोची झाली आणि कालांतराने ज्याने त्याने परिस्थितीनुसार आपापल्या स्वगृही प्रवेश केला. गायकर साहेब राष्ट्रवादीत आले तर मधुभाऊ काँग्रेसमध्ये गेले. कैलास वाकचौरे यांनी मात्र, जोवर निवडणुका तोंडावर येत नाही तोवर स्थिर भूमिका घेतली. म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणात तथा झेडपीत ते राष्ट्रवादीचे गटनेते राहिले आणि अकोल्यात नगरपंचायतीत त्यांनी भाजपला सत्ता मिळवून देण्याइतपत कसोशिने काम केले. इतकेच काय? तर त्यांच्या कळस गावात त्यांनी भाजपची शाखा देखील उघडली त्या बॅनरवर त्यांचे फोटो झळकले. आता मात्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे, भाजपत एकतर त्यांना विश्वासात घेतले जात नाही, ही पहिली बाब तर त्यांना झेडपीत जाण्याची इच्छा आहे. जरी ते निवडून गेले तरी त्यांना भाजपमधून स्कोप राहणार नाही ही महत्वाची बाब. त्यामुळे, एकीकडे मान सन्मान नाही आणि दुसरीकडे राजकीय स्थिरता नाही. त्यामुळे, त्यांनी पुन्हा पक्षात सक्रिय होणे हीच योग्य परिस्थिती आहे. मात्र, त्यांना यायचे असेल तर त्यांनी कारखान्याच्या निवडणुकांपुर्वीच आले पाहिजे. अन्यथा त्यांचा पक्षाला काही एक उपयोग होणार नाही. अशा प्रकारची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
खंरतर, आदरणीय माजी मंत्री मधुकर पिचड साहेब म्हटलं की अनेकांचा आवाज खाली होतो. मुळात त्यांची दहशत नव्हे.! तर त्यांच्याप्रति तालुक्याला आदर आहे. म्हणून तर गायकर साहेब आणि कैलास वाकचौरे यांनी त्यांची साथ सोडताना योग्य वेळेची वाट पाहिली. मुळात प्रत्येकाने साहेबांची मर्यादा आजही पाळली आहे, त्यात उताविळ कार्यकर्ते अपवाद मानू. परंतु प्रत्येकाला एक वैचारिक स्वातंत्र्य आहे, पक्षाची निष्ठा आहे त्यासाठी काही प्रमाण देण्याची गरज नाही. कारण, हे राजकारणी कधीच कोणाचे कट्टर वैरी नसतात, असतात ते कार्यकर्ते. त्यामुळे, गायकर साहेब गेले काय आणि वाकचौरे गेले काय. त्यांची निष्ठा आणि आदर हा एक संस्कार आणि संस्कृतीचा भाग आहे. राहिला प्रश्न राजकारणाचा. तर, प्रत्येकाला आपापले राजकीय भविष्य दिसत असते. आज पवार साहेबांनी 104 आमदार घरी बसवून अशक्य अशी आघाडी केली आणि राज्यात पुन्हा सत्ता स्थापन केली. उद्याच्या काळात देखील केंद्रातील निवडणुका आणि सत्ता समिकरणे हे अपवाद वगळले तर पवार साहेब महाराष्ट्रात भाजपला वर डोकं काढू देतील असे वाटत नाही. त्यामुळे, उद्याच्या काळात जेव्हा विधानसभा निवडणुका होतील तेव्हा भाजप प्रबळ आणि लोकमान्य जानाधाराचा पक्ष असला तरी तो सत्तेबाहेर राहू शकतो. हे चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे, उद्या भाजपला राज्यात अच्छे दिन येतील असे म्हणणे फार धाडसाचे ठरेल. हेच पाहून तर प्रत्येक नेता राजकीय स्थित्यांतरे करीत असतो. त्यामुळे, कोण कोणाला सोडून जातोय मुळात यावर टिका टिपण्णी करणे चुकीचे आहे. कारण, पवार साहेबांना सोडून गेलेल्या पिचड साहेबांबाबत त्यांनीच गौरोद्गार काढल्याचे आपण मागिल माहिन्यात पाहिले आहे. याला राजकीय प्रगल्भता म्हणतात...!!
आता पिचड साहेबांना कैलास वाकचौरे हे रामराम ठोकणार हे गेल्या कित्तेक दिवसांपासून सुरू असलेला राजकीय कलह आहे. कैलास वाकचौरे यांची तब्बेत बरी नसताना त्यांनी नगरपंचायतीत धावपळ केली. सत्ता आली पण त्यांना दवाखान्यात अॅडमिट व्हावे लागले. या दरम्यान, जेव्हा पदांच्या निवडी करण्याची वेळ आली तेव्हा वाकचौरे यांना विश्वासात घेतले नाही, एव्हाना त्यांना हवे तशी मानसे भाजपकडून दिली गेली नाही. हा सिलसिला येथेच थांबला नाही. तर, कैलासभाऊ यांनी रिपाईला स्विकृत नगरसेवक पदाचा शब्द दिला होता. तो देखील भाजपने पाळला नाही. यापलिकडे अकोले तालुका ऐज्युकेशन सोसायटीत देखील कैलास वाकचौरे यांचा हिरमोड करण्यात आला. अशी एकच नव्हे, अनेक कारणे आहेत ज्यामुळे, ते वारंवार नाराज होत गेले. तर, छोट्या साहेबांचे आणि त्यांचे फारसे कधी एकमत झाले नाही. त्यामुळे, ही नाराजी अधिक वाढत गेली. त्यामुळे, आता येथे थांबायचे नाही. असा त्यांनी निर्णय घेतला आणि काही नगरसेवकांसह ते पुन्हा राष्ट्रवादीत येणार अशी चर्चा रंगू लागली. तारीख देखील फिक्स झाली मात्र, त्यांच्या प्रकृतीने त्यांना साथ दिली नाही. त्यामुळे, त्यांना मनविण्यासाठी भाजपला वेळ मिळाला आणि प्रवेश देखील लांबनिवर पडला. आता कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर हा प्रवेश कधीही होऊ शकतो. अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे. मात्र, त्यांच्यासोबत काही नगरसेवक येणार होते त्यांनी नाहीची री ओढली आणि बर्याच चर्चांना पुर्णविराम मिळाला. तरी देखील ऐनवेळी खलबते होण्याची शक्यता आहे.
आता वाकचौरे यांना प्रवेश करायचा असेल तर त्यांनी तो कारखान्याच्या निवडणुकीतच करणे अपेक्षित आहे. कारण, त्यांनी नगरपंचायतीत जीव काढला; हाती काय आले? त्यामुळे, किमान आपण ज्या पक्षाचे गटनेते आहोत त्या पक्षासाठी आपल्या कळस गावीतील 252 मतदान, अकोले गटातील 10 गावांपैकी 1 हजार 201 पैकी काही मतदान, शहरातील 405 पैकी काही मतदान, परखतपूर येथील 69 पैकी काही मतदान, वाशेरे येथील 32 पैकी काही मतदान, मनोहरपूर येथील 38 पैकी काही मतदान तसेच रुंभोडीतील 220 पैकी व इंदोरीतील 259 पैकी पाहुण्यांचे काही मतदान त्यांनी पक्षासाठी जमा केले तर राष्ट्रवादीचे मंळड विजयी होण्यास सहाय्यभूत ठरु शकते. अन्यथा जर निवडणुकीनंतर जर त्यांनी विचार केला तर त्यांना घेऊन तरी काय उपयोग? म्हणजे त्यांना झेडपीत जायचे म्हणून त्यांनी पक्षाचा हवा तसा वापर करायचा. कारण, जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता येत नाही. ते निवडून आले तरी त्यांना फारसा काही लाभ होणार नाही. त्यामुळे, देर सही दुरुस्त जरुरी हैं.! हे त्यांच्या लक्षात आले म्हणजे झालं.! तसेही त्यांच्या प्रवेशाच्या चर्चा जिल्ह्यात रंगल्या आहेत. त्यामुळे, नगरपंचायतीत भाजपने त्यांना वापरून घेतले. त्याचे फळ काय? याचे उत्तर आपल्यापेक्षा ते चांगले जाणून आहेत. त्यामुळे, आता पुन्हा त्यांचा वापर होणार नाही. म्हणून त्यांनी कोणताही विचार न करता तत्काळ निर्णय घ्यावा असे राष्ट्रवादी पक्षातील काही नेत्यानी सार्वभौमकडे मत व्यक्त केले आहे. .