आजवर 313 अर्ज गेले, गायकर साहेब, संचालक व पिचड पिता-पुत्रांसह 52 अर्ज भरले.! भाजपचे 15 राष्ट्रवादीचे 18 काँग्रेस 2 उद्याकडे लक्ष.!
-Sagar Shinde
सार्वभौम (अकोले) :-
अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला आज खर्या अर्थाने रंगत चढली आहे. कारण, आज (दि.16) कारखान्याचे चेअरमन तथा माजी मंत्री मधुकर पिचड, व्हा.चेअरमन सिताराम पाटील गायकर, मा. आ. वैभव देशमुख (पिचड) यांच्यासह बर्याच संचालकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे, तीन पॅनल होण्याची शक्यता पुढे येऊ लागली असून गेल्या तीन दिवसात 313 इच्छुक उमेदवारांनी अर्ज नेले आहेत. यात 52 जणांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. यांदा बर्यापैकी हवशे नवशे गवशे असून भाजपच्या 15 जणांचे अर्ज आले आहेत तर राष्ट्रवादीच्या 18 जणांचे अर्ज आहेत. त्यात शेतकरी संघटनेचा एक असून काँग्रेसकडून दोन अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे, निवडणुकीला आता चांगलीच रंगत आली असून उद्या देखील तिसर्या आघाडीचे अर्ज दाखल होणार आहे. त्यामुळे, कधी नव्हे इतका ऐतिहासिक उच्चांकी प्रतिसाद मिळणार आहे. त्यामुळे, कालपर्यंत जे लोक म्हणत होते की, कारखाना कडेलोटवर आहे, बंद पडणार आहे. त्यावर कर्ज आहे. म्हणजे जी संस्था बदनाम केली त्या संस्थेवर जाण्यासाठी इतके लोक इच्छुक आहेत. याचा मतितार्थ नक्कीच ही संस्था चांगल्या स्थितीत आहे. अन ज्यांनी बदनाम केले ती देखील अर्ज भरणार आहे. म्हणजे त्यांचा राजकीय हेतू आता सिद्ध होणार आहे...!
खरंतर, आजवर कधी नव्हे इतकी भाऊगर्दी कारखान्याच्या निवडणुकीत दिसून आली आहे. त्यामुळे, पिचड साहेब आणि गायकर साहेब यांची फार मोठी डोकेदुखी झाली आहे. तर, यावेळी आदिवासी समाजाचे 3 हजार 500 मतदान असल्यामुळे, डॉ. किरण लहामटे आणि अशोक भांगरे यांची भुमिका फार महत्वाची असणार आहे. हे असे असले तरी यांदा कारखान्यात नवे चेहरे पहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे अर्ज दाखल असणार्या यादीत पहिलेच नाव उच्चशिक्षित विकास कचरुपाटील शेटे यांचे असून नव्याने काही नावे पुढे येऊ लागली आहेत. यात महत्वाची बाब म्हणजे जे कालपर्यंत गायकर साहेबांच्या टोळीला नावे ठेवत होते. आज त्याच टोळीतील लोक साहेबांच्या शब्दभर पुढे जायला सरसावत नाही. मला संधी नाही मिळाली तरी चालेल. पण हा कारखाना टिकला पाहिजे आणि गायकर साहेबांसारखा माणूस तेथे राहिला पाहिजे. कारण, हे सर्व चालविणे अन्य कोण्या व्यक्तीच्याने शक्य नाही असे ते म्हणतात. त्यामुळे, गायकर साहेब नेमकी काय भुमिका घेतात हे पाहणे महत्वाचे आहे.
आजवर मधुकर पिचड साहेबांनी (अनुसुचित जाती-जमाती) गटातून इंदोरी सर्वसाधारण गटातून असे दोन अर्ज दाखल केले आहेत. वैभव देशमुख (पिचड) (असे नाव यादीत नमुद आहे) यांनी पहिला अर्ज (अनुसुचित जाती-जमाती) गटातून तर दुसरा अर्ज इंदोरी उत्पादक सर्वसाधारण गटातून भरले आहेत. सिताराम पाटील गायकर यांनी देखील बिगर उत्पादक संस्था प्रतिनिधी गटातून दोन अर्ज तर कोतुळ सर्वसाधारण उत्पादक गटातून दोन अर्ज असे चार अर्ज भरले आहेत. राष्ट्रवादीचे रामनाथ बापु वाकचौरे, बाजार समितीचे संचालक सुधिर शेळके व काँग्रेसचे सहाणे एकनाथ भिका यांनी देवठाण सर्वसाधारण गटातून आपला अर्ज भरला आहे. तर दुधसंघाचे मा. चेअरमन प्रतापराव देशमुख यांनी बिगर उत्पादक संस्था प्रतिनिधी म्हणून आपला अर्ज दाखल केला आहे. कुमोदिनी पोखरकर यांनी महिला राखीव गटातून अर्ज भरला आहे. सभाष काकड यांनी भटक्या विमुक्त जमातीतून अर्ज नोंदविला आहे. कारखान्याचे संचालक भिमसेन ताजणे (एनसीपी), मिनानाथ पांडे (काँग्रेस) यांनी इतर मागासवर्गीय मतदार संघातून पुन्हा आपले अर्ज भरले आहेत. तर इंदोरी सर्वसाधारण गटातून मा. व्हा. चेअरमन प्रकाश नवले (भाजप), मा.चेअरमन भाऊपाटील मालुंजकर (एनसीपी), कारखाना संचालक अशोकराव देशमुख (एनसीपी), आंबडचे सरपंच राहिदास जाधव, मा. चेअरमन भाऊमामा खरात (भाजप) यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
अकोले गटातून माणिक देशमुख (भाजप), भिमसेन ताजणे यांचे दोन अर्ज (एनसीपी), जिल्हा. शिक्षक बँकेचे संचालक आण्णासाहेब ढगे (एनसीपी) यांनी अर्ज भरले आहेत. तर, आगार गटातून विकास शेटे, काँग्रेसचे मिनानाथ पांडे, किसन शेटे, सुनिल कोटकर, शेतकरी संघटनेकडून कारखाना संचालक अशोक आरोटे, बाजार समिती सभापती पर्बत नाईकवाडी, मा. संचालक सुधाकर आरोटे, बाळासाहेब घोडके यांच्यासह काही अन्य इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. तर कोतुळ सर्वसाधारण गटातून गायकर साहेबांसह राष्ट्रवादीचे हेमंत देशमुख, गोरक्ष साबळे, मा.झेडपी सदस्य कैलास शेळके, राजेंद्र देशमुख यांनी अर्ज भरले आहेत. त्यामुळे, आज सर्व मात्तबर रिंगणात उतरले आहेत. अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिवासी बांधवांकडून येणार्या उमेदवार्यांकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. अशोकराव भांगरे. दिलीप भांगरे की अमित भांगरे याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. तर आमदार महोदयांचे पिताश्री यमाजी लहामटे यांच्या देखील भुमिकेकडे लक्ष लागले आहे. कारण, 3 हजार 500 चा आकडे हाच कारखान्यात महत्वाची भूमिका पार पाडणार आहे.