अगस्ति कारखाना जिल्ह्यात अव्वल.! विरोधकांना लाजवेल असे काम, तोंडाचा बॉलयर नव्हे, कर्तुत्वाची पावती.!
सार्वभौम (अकोले) :-
गेल्या वर्षभरापासून जशी अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकांची चर्चा सुरू झाली. तेव्हापासून "भोकाडीसारखा" एक शब्द आपल्या कानावर पडतो आहे. की, कारखाना कडेलोटावर आहे. तो कधीही बंद पडू शकतो. त्याच्या चौकशा लागल्या, त्याची बदनामी झाली, अपप्रचार झाले.! मात्र, अगस्ति महाराजांच्या कृपेने आणि सजग संचालक मंडळाच्या कर्तुत्वाने कारखाना दोन गोष्टीत अव्वल स्थानी असल्याची आकडेवरी सार्वभौमच्या हाती आली आहे. पहिली गोष्टी म्हणजे तुलनात्मक जिल्ह्यात सर्वात कमी उस (7 हजार 250 मेट्रीक टन) अकोले तालुक्यात राहिला असून यात विशेष म्हणजे अगस्ति कारखाना 3 हजार 500 क्षमतेचा असताना आजवर 6 लाख 13 हजार 706 मे.टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून 7 लाख 11 हजार 860 साखरेच्या पोत्यांचे उत्पादन झाले आहे. ही आकडेवारी अन्य कारखान्यांपेक्षा चांगली आहे. दुसरी विशेष बाब म्हणजे साखरेची रिकव्हरी 11.25 असून ती राहुरी वगळता जिल्ह्यात अन्य कोणत्याही कारखान्याची नाही. तर संपुर्ण नगर जिल्ह्यात अन्य तालुक्यांमध्ये लाखो मे.टन ऊस शिल्लक आहे. त्यात एकट्या श्रीरामपुरमध्ये 1 लाख 45 हजार मे.टन शिल्लक आहे. त्यामुळे, नशिब.! तेथे उपद्रवी विरोधक नाही. अन्यथा रोज एक व्यक्तीने आत्महत्या केली असती. मात्र, उसाची बिकट परिस्थिती ही कोण्या एका तालुक्यात नव्हे तर संपुर्ण राज्यात आहे. हे समजण्याईतपत शेतकरी आता सुज्ञ झाला आहे. याबाबत बळीराजाला सलामच ठोकला पाहिजे...!
खरंतर, गेल्या सहा महिन्यापुर्वी एकीकडे गळीत हंगामाचा बॉयरल पेट घेत होता तर दुसरीकडे त्याच ठिकाणी राजकीय बॉयलरला काडी लावली जात होती. कारखाना बंद पडणार, यांना कर्ज देऊ नका, मजुरांनो येऊ नका, झाला-झाला भ्रष्टाचार झाला, चौकशा करा, गुन्हे दाखल करा, संपत्त्या जप्त करा, टाळे ठोका, कडेलोट झाला.... बा...बा...बा... किती मोठा आगडबंब उभा केला होता. म्हणे महिनाभर सुद्धा कारखाना चालु शकत नाही. तो केव्हाही बंद पडू शकतो. मात्र झाले काय? याच कारखान्याने 6 लाखांचा गळीत हंगाम काढण्याचे ठरविले आणि बोल-बोल करता आरोप प्रत्यारोपांना, पत्रकार परिषदांना उत्तरे देता-देता संचालक मंडळाने आपले उद्दिष्ट सहज पार देखील केले. म्हणजे, तुलनात्मक अन्य तालुक्यांमध्ये अद्याप हजारो आणि लाखो मे.टन ऊस हा तुरे, उंदरे खाऊन वाळलेल्या अवस्थेत अद्याप शेतात उभा आहे. तर, अशा परिस्थितीत अगस्ति कारखान्याने जितका लवकर उस नेता येईल तितक्या लवकर तो नेन्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून तर मशिनची क्षमता कमी असताना देखील योग्य नियोजन व कामगारांच्या जोरावर हे सर्व साध्य झाले आहे. यात शेतकरी मायबाप राजाचा संयम देखील विसरुन चालणार नाही.
खरंतर कामगार, मजुर एम.डी आणि संचालक मंडळ यांचे कौतुक का केले पाहिजे? तर, अकोले तालुका हा डोंगर दर्यांचा प्रदेश आहे. त्यामुळे, कोठेही 20 ते 30 एकर एकसलग शेती नाही. तालुक्यात वाड्या-वस्त्या मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे, घाटरस्ता आणि त्यात 20 गुंठे, 30 गुंठे, एकर, दिडएकर अशा प्रकारे ऊस लागवडी आहेत. जर संगमनेर, राहुरी, कोपरगाव, या तालुक्यांमधून ट्रॅक्टरने ऊस वाहतूक केली तर त्यात 14 ते 16 टन ऊस वाहतूक होते. कारण, रस्ता सपाट आहे. घाट कमी आहे, अंतर कमी आहे. हिच वाहतूक अकोले तालुक्यातील पिंपळगाव नाकविंदा, शेरणखेल, वांजुळशेत, खडकी, पिंपरी, कोहंडी पाडाळणे अशा भागांतून केली तर अवघी चार टन देखील वाहतुक होत नाही. कारण, घट, वळणे आणि कठीण रस्ता यामुळे ते शक्य नाही. अकोले तालुका क्षेत्रफळाच्या बाबतीत (1,505.8 किमी) जिल्ह्यात सर्वात मोठा आहे. अशा बिकट परिस्थितीत या स्पर्धेच्या दुनियेत टिकून रहायचे काम पिचड साहेब आणि गायकर साहेब यांनी केले आहे. त्यांना खरोखर मानावेच लागेल. कारण, अन्य तालुक्यात सर्वच ठिकाणी हेर्वेस्टर (उस तोडणीचे मशिन) आहे. फक्त आपला तालुका त्यास अपवाद आहे. मात्र, येथे छोटे-छोटे उसलागवड क्षेत्र आहे. त्यामुळे, तालुक्यात ते शक्य नाही. अन्यथा प्रतिदीन 150 टन ऊसतोड हेर्वेस्टर तोडत असते. अगस्ति कारखाना मात्र सर्व काही मजुरांच्या जोरावर हे काम करुन घेतो. तरी, जिल्ह्यात सर्वात कमी उस तालुक्यात राहिला आहे. नशिब तालुक्यात धरणे आणि पाणी आडविण्याची मोहिम यापुर्वी झाली. त्यामुळे, ऊस उत्पादन वाढले. अन्यथा आज तरी 2 लाख मे.टन ऊस गेटकेनचा येतो आहे. अन्यथा 40 ते 60 टक्के उस बाहेरुन आणावा लागला असता. ही महत्वपुर्ण कामे खर्या अर्थाने चेअरमन, व्हा.चेअरमन यांनी पवार कुटुंबाच्या मदतीने केली आहेत. तालुक्याने त्यांचे खरोखर आभार मानले पाहिजे. नव्हे की मुठभर लोकांच्या नादी लागूून पुन्हा चालु गाडीची कानखिळ काढण्याचे उपद्रवी भाग्य कपाळी लावले पाहिजे...!!
खरंतर, संपुर्ण तालुक्याला आणि येथील शेतकर्यांना या माध्यमातून सांगू इच्छितो की, अगस्ति कारखाना कडेलोटावर मुळीच नाही, त्याचा कडेलोट करण्याचा डाव काही राजकीय मंडळींनी आखला आहे. आता जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसे राजकारण पेटत जाईल. आरोप प्रत्यारोपाच्या मशाली पेटतील आणि विकास विरोधी झुंडी उठतील. मात्र, ही तालुक्याचे लक्ष्मी आहे. ती टिकली पाहिजे यासाठी प्रत्येकाने डोळे उघडे ठेऊन पाहिले पाहिजे आणि वास्तव तेच श्रवण केले पाहिजे. अन्यथा जाळ आणि धुर करायला तालुक्यात उपद्रवी मानसे कमी नाहीत. आज जिल्ह्यात 16 कारखाने हे चालु स्थितीत आहेत. त्यात आंबालिका, मुळा, ज्ञानेश्वर संगमनेर, गंगामाई, कुकडी, श्रीगोंदा, राहुरी, संजिवणी, कोपरगाव यांच्याशी आपली तुलना होऊच शकत नाही. कारण, यांच्या गाळप क्षमता अगस्ति कारखान्यापेक्षा दुप्पट-तिप्पट आहे. तरी, देखील तुलनात्मक अगस्ति कारखाना भल्याभल्यांना जड असल्याचे लक्षात येते. साखर आयुक्त कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार आकडेवाडी तपासली तर येथे कोणाला कमी लेखायचे नाही. मात्र, ज्यांची क्षमता जास्त आहे. ज्यांचे गाळप जास्त आहे, त्यांची पोती आणि रिकव्हरी यात तुलनात्मक अगस्ति कारखाना चांगल्या नव्हे, दर्जेदार गुणवत्तेत असल्याचे दिसून येते. येथील क्षेत्रफळ, भौगोलिक परिस्थिती, हवामानाचे बदल, उन, वारा, पाऊस, मजुरांना होणारा शारिरीक व मानसिक त्रास, मोठमोठी चढे आणि वळणे यांचा बैलांना होणारा त्रास हे देखील लक्षात घेतले पाहिजे. कारण, आरक्षण लावताना देखील यातील बर्याच गोष्टी विचारात घेतल्या जातात. मग, येथे देखील त्याचा विचार झालाच पाहिजे. कारण, हा विषय देखील एक सामाजिक, आर्थिक आणि सहकारी दृष्ट्या विकासास बाधा आणणारा आहे..! मात्र, केवळ बागुलबुवा उभा करायचा आणि त्याआडून राजकारण करू पहायचे. हे कोठेतरी थांबले पाहिजे. कारण, तालुक्याची कामधेनू टिकवायची आहे...!!!!
त्यांच्याशिवाय शक्य नाही..!
यात खर्या अर्थाने सिताराम पा.गायकर साहेब यांचे जास्त योगदान आहे. ते कारखान्याचा सर्व कारभार पाहतात. मजुर गोळा करण्यापासून ते कारखाना संकटातून बाहेर काढेपर्यंत ते शांत बसत नाहीत. त्यांच्यामुळेच हि कामधेनू टिकूण आहे. सर्व बहुजनांना एकत्र करुन तालुक्यातील संस्था त्यांनी टिकवून ठेवल्या आहेत. खरंतर कारखाना अडचणीत असताना त्यांच्या संचालक मंडळांनी स्वत:च्या नावे कर्ज काढून कारखाना सुरू ठेवला. आता 6 लाख मे.टनापेक्षा जास्त गाळप झाले आहे. हे शक्य झाले केवळ गेटकेनचा उस, योग्य नियोजन, कर्मचाऱ्यांची कसरत आणि गायकर साहेबांची धावपळ. त्यामुळे, येणार्या काळात आम्ही शेतकरी गायकर साहेबांच्या पाठीशी ठाम उभे राहु. राजकारणापलिकडे शेतकरी जगला पाहिजे. संस्था टिकल्या पाहिजे. कोणाच्याही हाती कारभार दिला तर होत्याचे नव्हते होऊन जाईल. त्यामुळे, येत्या पाच सहा दिवसात कारखाना बंद होईल आणि सर्वांचा ऊस कारखान्यात जाईल. कोणी कोणाच्या अफवांना बळी पडू नका. काही लोकांना फक्त राजकारण करायचे आहे. पुर्वी कारखाना, नंतर, शिक्षण संस्था, आता पिंपळगाव धरण, नंतर दुधसंघ.! म्हणजे काही विरोधकांच्या मते तालुक्यात काहीच चांगले नाही. परंतु, कानामागून आली अन तिखट झाली. असे न करता ह्या संस्था कशा उभ्या राहिल्या. याची माहिती घेऊन त्या मोडीत निघणार नाही. याची काळजी घेतली पाहिजे. एकंदर सत्ता, जिल्हा बँक, अजित दादांची मदत, सत्ताधारी आमदार हे सर्व लक्षात घेता कारखाना हा गायकर साहेबांशिवाय कोणीच चालुच शकत नाही. हे देखील प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे.
- सुभाष कदम (हिवरगाव शेतकरी)