हौसाने नवरा केला अन तो दारुड्या-गांजाड्या निघाला.! असा मारहाण करणारा वॅन्टेड नवरा नको.! मुलगी महिनाभरात माहेरी.!

                                         


सार्वभौम (अकोले) :-

असे म्हणतात की, लग्न म्हणजे साता जन्माच्या गाठी असतात. त्यामुळे, ते ठरविताना प्रत्येक पाल्याने सदसद विवेक बुद्धीने विचार केला पाहिजे. जर घाई करून असे निर्णय झाले तर त्याचे काय परिणाम होतात याची अनुभूती आपल्याला कित्तेकदा आली आहे. असाच एक प्रकार अकोले तालुक्यातील कोहंडी येथे घडला आहे. दर्शन नावाच्या तरुणाने एका तरुणीशी गोडगोड बोलुन विवाह केला. मात्र, महिना देखील उलटला नाही. तोच याने त्याचे रंग दाखविण्यास सुरूवात केला. हा तरुण सुटल्या बाशिंगाचा दारु पीतो तर गांजा आणि नको-नको तसे नाद करतो. इतकेच काय.! त्याच्या बहिनी देखील नव्या नवरीस प्रचंड हरॉशमेंट करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे, संबंधित तरुणीने घडला प्रकार आपल्या पाल्यास कथन केला असता त्यांनी थेट राजूर पोलीस ठाणे गाठले आणि दर्शन परशुराम देठे (रा. कोहंडी, ता. अकोले) याच्यासह त्याच्या बहिनींवर गुन्हा दाखल केला आहे. तर, याप्रकरणी, महिला आयोग आणि अन्य ठिकाणी आपली कैफीयत मांडून झालेल्या फसवणुकीबाबत दादा मागणार असल्याची माहिती पालकांनी दिली आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी दर्शन देठे याचा विवाह दि. 20 फेब्रुवारी 2022 रोजी मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आला. त्याने नवरीच्या बापाकडे सोन्याच्या अंगठीची मागणी केली, बापाची आर्थिक परिस्थिती नसताना देखील कोठे रोजाने कामाला जाऊन तर कोठे शेतात राबून, कधी तमाशात काम करुन तर कधी वाजवणी करुन बिचार्‍याने आपल्या जावयाला सोन्यात मढविले. याची मुजोरी लग्नात देखील पहायला मिळाली. कधी नवरीला धासधुस तर कधी नको तशी हरकत. मात्र, तरी देखील गुतली गाय अन फटके खाय. आज ना उद्या सर्व ठिक होईल. वर्‍हाड्यांच्या अपेक्षेप्रमाणे सुंदर जेवणाच्या पंगती उठल्या आणि सनई ताफ्याच्या आवाजात यांचा विवाह सोहळा पार पडला. काही प्रतिष्ठीत राजकीय व्यक्तींनी देखील लग्नाला हजेरी लावली होती.

दरम्यान, नवरी सासरी गेली तेव्हा तिला काही कमी पडायला नको म्हणून बापानं मोठा गाडीभर संसार दिला होता. मात्र, पहायला आलेला गुणी मुलगा लग्न झाल्यानंतर थेट बाबुराव झाला. घरात दारु पिणे, गांजा ओढणे, कोवडी मोलाचं काम नाही, नको तो मित्रपरिवार आणि त्याला पाठीशी घालणारे कुटुंब. त्यामुळे, त्याने पत्नी करून आणली की घरात मोलकरीण हे नवरीला कळेनासे झाले होते. घरात जोवर अन्य लोक जेवण करतात तोवर नवरीने खाली बसायचे नाही, तेथेच उभे रहायचे. सर्वांचे जेवण झाल्यानंतर जे काही शिल्लक राहील तेच खायचे. घरातील प्रत्येक कामे ही एकटीने करायचे, दिवस-रात्र साडी घालुन घरात काम करीत रहायचे. जोवर घरातील सर्व लोक झोपत नाही तोवर हिने झोपायचे नाही. घरात महिला आणि पुरुष असेपर्यंत वर मान करुन पहायचे नाही. अन्य कोणाशी शब्दभर बोलायचे नाही. डोक्यावरचा पदर चोवीस तास खाली पाडता कामा नये. भाऊजया जवळच रहायला असल्याने त्यांची कामे देखील हिनेच कराची. तर, दोन दिवस नव्या नवरीला यांनी उपासपोटी ठेवले. यापलिकडे नको तसा शारिरीक व मानसिक छळ देठे कुटुंबाने केला. अशा प्रकारची तक्रार पोलीस निरीक्षक यांच्याकडे मुलीच्या पालकांनी केली आहे.

दरम्यान, जग कोठून कोठे चालले आहे. डोक्यावरचा पदर अन्यायाविरुद्ध आता कंबरेला खोवला जात आहे. विशेष म्हणजे, शहरासारखा ठिकाणी हाफ कपडे घालुन स्वत:ला सुटेबल वाटण्यासाठी महिला अधुनिक पद्धतींचा अवलंब करतात. अशात 24 तास डोक्यावर पदर आणि साडी परिधान करण्यास सांगणारी माणसे किती संकुचित बुद्धीची असू शकतात. असे म्हणतात, एक तिळ सात जणांनी खाल्ला होता. येथे नव्या नवरीला सोबत जेवण सोडा, दोन दिवस उपाशी ठेवले गेले. विशेष म्हणजे, आजकाल क्वचित तरुण मद्यापान करत नाहीत. मात्र, वय 22 असताना घरात बसून नको ते व्यसन करायचे आणि बेरोजगार असताना असले उद्योग, ते ही दुसर्‍याच्या जीवावर हे कितपत योग्य आहे? यात दुर्दैवाची बाब अशी की, मुलीच्या बापाने मुलास जी काही सोन्याची अंगठी घेऊन दिली होती. ती अवघ्या पंधरा दिवसात या बहादराने मोडली आणि त्यापासून मिळणार्‍या पैशावर याने मौजमजा केला. म्हणजे, किती भयानक परिस्थिती सामाजाच्या मानसिकतेत झाली आहे. त्यामुळे, हे सर्व महिनाभर मुलीने सोसले आणि अनावर झाल्यानंतर सगळी खदखद बापाच्या गळ्यात पडून कथन केली. त्यानंतर पालकांनी पुढे कायदेशीर कारवाई केली आहे.

 वेगळा निर्णय नको..! 

कोणत्याही परिस्थितीत मुला-मुलींच्या लग्नाची घाई करणे चुकीचे आहे. पालकांनी एकमेकांच्या कुटुंबाशी चर्चा करून, मुलांना देखील चर्चा करण्यास, त्यांची मने जाणुन घेण्यास वेळ दिला पाहिजे. अधुनिक काळात जर मुलींना सासरवास होत असेल तर दोन्ही कुटुंबाने एकत्र बसून त्यावर चर्चा केली पाहिजे. मात्र, फारच कठीण परिस्थिती असेल तर पोलीस, महिला आयोग, दिलासा सेल किंवा समुपदेशन केंद्रांचा आधार घेतला पाहिजे. मात्र, मुलगा असो वा मुलगी यांनी कोणत्याही परिस्थितीत चुकीचा निर्णय घेऊ नये. आयुष्य लढण्यासाठी आहे. ते लढले पाहिजे. असे समजून प्रत्येन कठीण परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे.

- प्राची सोनवणे (समुपदेशक)