गोमातेच्या रक्ताने माखलेल्या पोलिसांच्या हताने बजरंगबलीच्या रथाला झेंडा लावण्यास विरोध.! हिंदुत्ववादी संघटनांचा आक्रमक पवित्रा, तर याद राखा...!



सार्वभौम (संगमनेर) :- 
                   जनावरांच्या कत्तलीत मलिदा घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे हात निष्पाप गोवंशाच्या रक्ताने माखलेले आहेत. अशा व्यक्तीच्या हस्ते गावाचे दैवत बजरंग बली यांची पुजा होणे म्हणजे हिंदुच्या भावना दुखावण्यासारखे आहे. त्यामुळे, अशा पोलिस अधिकारी यांच्या हस्ते रथाची पूजा करण्यात येऊ नये अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अँड. श्रीराम गणपुले यांनी केली आहे. कत्तलखान्याच्या प्रश्नांवरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक असल्याने संगमनेरातील ऐतिहासिक  हनुमान रथोत्सव यावर्षी वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. दि. 2 ऑक्टोबर 2021 रोजी संगमनेर शहरात सर्वात मोठा छापा जमजम कॉलनी येथील कत्तलीवर पोलीस उपअधीक्षक संदिप मिटके यांनी टाकला होता. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर संगमनेरातील हिंदुत्ववादी संघटनांनी प्रश्नचिन्ह उभे केले होते. या कत्तली पोलीस अधिकाऱ्यांच्याच आशीर्वादाने चालतात असा आरोप करत आंदोलन उभे करण्यात आले होते. त्यामुळे, स्थानिक पोलीस अधिकारी व हिंदुत्ववादी संघटनांचा वेळोवेळी संघर्ष पहायला मिळत आहे. इतकेच काय.! शहरातील गोरखधंद्यांचा 27 ते 30 लाख रुपयांचा मलिदा पोहच होता होता असा आरोप देखील यापूर्वी केला आहे. त्यामुळे, पोलीस अधिकाऱ्यांना मानाचा भगवा ध्वज रथाला लावता येईल की नाही यावर प्रश्न निर्माण झाला आहे.

              याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात गणपुले यांनी म्हटले आहे की,
संगमनेर शहराला धार्मिक व सामाजिक परंपरा आहे. या परंपरेचा एक भाग म्हणून हनुमान रथोत्सव  प्रसिद्ध आहे. ब्रिटीश सत्तेचे विरुध्द आंदोलन व धार्मिक कारणामुळे या रथोत्सवास संगमनेरात मानाचे स्थान आहे. सवादय मिरवणुकीचा हक्क मिळवण्यासाठी शहरातील महिलांनी इंग्रज राजवटी विरुद्ध लढा दिला होता. या आंदोलनातून सवादय मिरवणुकीचा हक्क हिंदू समाजाने मिळविला. रथोत्सवाचा सन्मान म्हणून पोलीस खात्याने मिरवणुकीने भगवा ध्वज आणुन मूर्तीची पुजा केल्याशिवाय रथोत्सव सुरु होत नाही.
         यावर्षी करोनाची बंधने उठल्याने दोन वर्षानंतर थाटामाटात रथोत्सव होणार आहे. शहर पोलीस स्टेशन अथवा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील अधिकारी सदर सन्मानाची पुजा व ध्वज घेऊन येण्याचे काम करतात अशी प्रथा आहे. मात्र, २ ऑक्टोबर २०२१ रोजी संगमनेर शहरात पोलिस पथकांनी बेकादशीर कत्तलखान्यावर छापा टाकला होता. ३२ टन अवैध गोमांस जप्त केले होते, हा बेकायदेशीर व्यवसाय स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांचे संरक्षणाखाली सुरू आहे असा वारंवार आरोप होत आहे.  पोलिसांच्या छाप्यात मुद्देमालात जप्त केलेल्या रजिस्टर वह्यांमध्ये पोलीस स्टेशनच्या व्यक्ती, अन्य अधिकारी संरक्षणाचे मोबदल्यात महिन्याला किती रकमा घेत होते याचे उल्लेख आहेत असे बोलले जाते. त्याबाबत शहरातील हिंदु नागरीकांनी तिव्र आंदोलने केली, सदर अधिकाऱ्यांचे चौकशीची व निलंबनाची मागणी केली.        
राजकीय हस्तक्षेपाचे कारणाने सदर अधिकाऱ्यांविरुद्ध अतिरिक्त पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर यांनी लेखी आश्वासन देऊनही कोणतीही कारवाई झाली नाही. अशा परिस्थितीत जनावरांच्या कत्तलीत पैसा घेऊन संरक्षण देऊन गुंतलेल्या अधिकाऱ्यांचे हात निष्पाप गोवंशाच्या रक्ताने माखलेले आहेत. अशा व्यक्तीच्या हस्ते गावाचे दैवत श्री. बजरंग बली यांची पुजा होणे म्हणजे हिंदुच्या भावना दुखावण्यासारखे आहे. त्याबाबत हिंदु समाजाच्या भावना अत्यंत तीव्र आणि तिरस्काराच्या आहेत. त्यामुळे, यंदाच्या रथोत्सवाच्या पुजेसाठी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने येऊ नये, त्यांच्या ऐवजी तालुक्यातील अन्य पोलीस स्टेशनचे अधिकारी किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी स्वतः येऊन पुजा करावी अशी मागणी गणपुले यांनी केली आहे. ज्यांच्या तक्रारी लाचलुचपत कडे असून त्यावर चौकशी सुरु आहे. ज्यांचे हात रक्तरंजीत आहे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांचे हस्ते पुजा करण्याचा प्रयत्न झालेस शहरातील हिंदुत्ववादी संघटना व हिंदु बांधव त्यास विरोध करतील असा इशारा त्यांनी दिला आहे.