...तर मधुभाऊंचा श्वास गुद्मरेल.! आईपासून लेकरु वेगळे राहू शकत नाही.! अभिनवचा मोठेपणा देखवेना.!



सार्वभौम (अकोले) :-
           अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या वादाचे प्रतिबिंब आता नकळत अभिनव शिक्षण संस्थेवर पडू लागले आहे. कालच्या एका रोपट्याचा आज वटवृक्ष उभा करताना तेथे अनेकांनी रात्रंदिवस प्रयत्नाची पराकाष्टा करुन हिरवागार परिसर फुलविला आहे. तर, गुणवत्तापुर्ण आणि प्रॅक्टीकल ऐज्युकेशनसाठी स्वत: मधुभाऊ नवले यांनी आठरा-आठरा तास काम करुन हा अभिनव उपक्रम राबविला आहे. अर्थात स्वराज्य उभे करताना देखील ते एक दिवसात उभे राहिले नाही. त्यासाठी अनेकांनी आपले प्राण न्योछावर केले आहेत तेव्हा रयतेचे राज्य उभे राहिले. त्यामुळे, दे रे हरी पलंगावरी अशी काही अभिनव शिक्षण संस्था उभी राहिली नाही. म्हणून, मधुभाऊ यांनी संस्थेला पोटच्या लेकरापेक्षा जास्त जपले आहे. त्यात शिकणार्‍या चिल्यापिल्यांना देवाची फुले म्हणून जपले आहे. तेव्हा कोठे हा स्वर्ग डोळ्यासमोर उभा राहिला आहे. त्यामुळे, त्यांच्यावर अविश्वास दाखविणे, त्यांना पायऊतार करू पाहणे, त्यांच्या कष्टावर पाणी फिरविणे, त्यांनी ज्या संस्थेला ज्ञानमंदीर मानले तेथे जाऊन त्यांच्याशी हुज्जत घालुन त्या मंदिराचा अवमान करणे हे काही तालुक्याच्या संस्कृतीला पटण्यासारखे नाही. जो काही कायदेशीर मार्ग आहे, त्यात दाद मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, एखाद्याच्या प्रतिष्ठेचा मुलाहिजा न ठेवता हेतुपुरस्कर वादाचा भुजंग उभा करणे हे चुकीचे आहे असे मत आता तालुक्यातील सुज्ञ लोक व्यक्त करू लागले आहेत.
खरंतर अकोले तालुक्यात आजकाल एखाद्याच्या कर्तुत्वाला कस्पटाप्रमाणे तोलण्याची परंपरा रुजू होऊ लागली आहे. कारण, मा.मंत्री मधुकर पिचड साहेब यांनी गेल्या 40 वर्षात काही केलेच नाही असे काही लोक वल्गना करतात तेव्हा यांनी पाणीदार तालुका दिसत नाही, दुसरीकडे अगस्ति कॉलेजचे अध्यक्ष जे.डी.आंबरे पाटील यांनी पत्नीचे मंगळसुत्र मोडून तालुक्यात उच्च शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. मात्र, त्यांना आज साधं नवनियुक्त बॉडीत सदस्य देखील केले नाही, तर अभिनव शिक्षण संस्थेची ओळख मधुभाऊ नवले यांनी राज्यात नेली आज त्यांना त्या संस्थेतून बेदखल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे एक उदा नव्हे, अनेक उदा. सांगता येतील. त्यामुळे, आता एक बाकी नक्की की, चांगल्या मानसांना वापरुन घ्यायचे, त्यांचे संपुर्ण उमेदीचे वय खर्ची करुन घ्यायचे, संस्था नावारुपाला आणायच्या आणि त्यांनी अगदी पत्रावळीसारखे फेकुण द्यायचे. हे काही पुरोगामी तालुक्याला न शोभणारे आहे. त्यामुळे, कोणत्याही संस्थांवर भुजंग होण्याचा प्रयत्न संधीसाधु लोकांनी करणे चुकीचे आहे.
     खरंतर, स्व.प्रा.रमेश्चंद्र खंडगे सर यांच्या स्वप्नातून अगस्ति कॉलेजच्या गरुडाने नव्याने गुणवत्तेची आणि शिस्तीची भरारी घेतली. दुर्दैवाने त्यांना अंतीम क्षणापर्यंत आपल्या हक्कासाठी झटावे लागले. त्याचा जीव गेला पण, त्यांना न्याय मिळाला नाही. त्यांनी 1992 मध्ये अभिनव शिक्षण संस्थेच्या रोपट्याला खतपाणी घालण्यासाठी मधुभाऊ नवले यांना साद दिली. अर्थात एखाद्या संस्थेला जन्म देणे वाटते तितके सोपे नव्हते. त्यामुळे, कोणाची ना कोणाची मदत घेणे फार निकडीचे होते. त्यात काहींनी मदत केली खरी. मात्र, आता त्यांनी संस्थेंवर हक्क गाजवायला सुरूवात केली. तर, सुभाष देशमुख यांच्यासारख्या खर्‍या दानशुरांनी एका हाताने दिलेली मदत दुसर्‍या हाताला माहिती होऊ दिली नाही. म्हणून तर ही शिक्षण संस्था ताठ मानेने उभी राहीली. तेव्हा अवघ्या 14 विद्यार्थ्यांवर सुरू झालेला प्रवास आज हजारो विद्यार्थ्यांवर स्थिरावला असून प्रगतीचा आलेख अद्याप वाढताच आहे. म्हणजे, 1992 चे इंग्लिश मीडियम आणि आज डि.एड, बी.एड, बी.पी.एड, एम.बी.ए, पत्रकारीता कार्स, सिनिअर, जुनिअर कॉलेज, सिनिअर, जुनिअर इंग्रजी माध्यमांच्या शाळा, वाय.सी.एम.ओ.युचे काही कोर्स, राजूर, कोतुळ येथे शाळा आणि दिडशे लोकांचा स्टाफ इतका मोठा गोतावळा उभा राहिला आहे. हा काही ज्वालामुखीसारखा अचानक आणि आपोआप प्रकट नाही झाला. त्यासाठी 25 ते 30 वर्षांची मेहनत मधुभाऊ नवले आणि त्यांच्या टिमने घेतली आहे.
                खरंतर आपण सहज म्हणत असतो, आयुष्य उभं करण्यासाठी फार खस्ता खाव्या लागतात, नको-नको त्या प्रश्नांना तोंड द्यावे लागते. तेव्हा कोठे माणूस उभा राहतो. मात्र, संपुर्ण आयुष्यात साधी एक चुक घडूद्या, त्याला लोक नावं ठेवण्यासाठी तयार असतात. त्यानंतर मात्र, त्या व्यक्तीला उभे राहण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. तसेच संस्थेचे आहे. आज अभिनव शिक्षण संस्था शुन्यातून उभी राहिली आहे. नावारुपाला आली आहे. त्यामुळे, ती बदनाम न होण्यासाठी तिच्या लेकरांनी प्रामुख्याने काळजी घेतली पाहिजे.  आपापले वाद चव्हाट्यावर आल्याने पालकांच्या मनात काय प्रश्न येतील, विद्यार्थ्यींनी हा असला उर्मटपणा पाहिला तर त्यांनी संस्थेच्या जबाबदार व्यक्तींकडून काय धडे घ्यावेत? संस्था कोणाची, अध्यक्ष कोण? यात मतभेद होऊन बॅनरबाजी होत असेल तर अभिनवचा अभिमान खरोखर दुखावला जाईल, कालपर्यंत चार भिंतीत असणारे भांडण आज खटपट नाक्यावर आणि तेथून मीडियात पोहचले आहे. भिती होती हा प्रकार संस्थेत होऊ नये. आज तो देखील झाला. त्यामुळे, जेथे ज्ञानदान आणि शिस्तीचे धडे शिकविले जातात. तेथे संस्थेचे जबाबदार लोक असे वागत असतील तर येणार्‍या काळात येथे दुसरे होणार तरी काय आहे? असा प्रश्न सामान्य मानसांना सहज पडून जातो.
वास्तवत: मधुभाऊ नवले यांची बाजु मांडणे किंवा कोणाला कमी लेखणे हा मुद्दा फार गौण आहे. मात्र, तरी देखील जे आपण आजवर पाहिले आहे की, अभिनव शिक्षण संस्था अगदी दिमाखाने चालते, तेथे कधी कोणाची छेडछाड झाली, कोठे गैरवर्तन झाले, कोणी गोवा, मावा, गुटखा खाऊन थुंकले, कधी तेथे कायदा व सुव्यवस्था निर्माण होईल असा प्रसंग निर्माण झालाय, कोठे भ्रष्टाचार झाल्याची ओरड झाली, मोठ्या कॉलेज प्रमाणे तेथे कोण्या शिक्षकाकडून 42 लाख रुपये घेतलेय, कधी तेथे दारू मटनाच्या पार्ट्या झाल्याय? असा काही एक प्रकार नसताना केवळ आता अभिनवचे मोठेपण देखवत नाही म्हणून आपल्याच लोकांना हे मोठेपण करुप झाल्याचे बोलले जात आहे. काही झालं तरी हे प्रखर सत्य आहे की, मधुभाऊ नवले यांनी अभिनव संस्थेचे पावित्र्य जपले आहे. गुणवत्ता राखली आहे, स्वच्छता ठेवली आहे. पारदर्शी कारभार केला आहे, प्रत्येकाला सामावून आणि समजून घेतले आहे. शिक्षक, पालक, विद्यार्थी यांचे विश्वास संपादन केला आहे. संस्थेसाठी या मानसाने स्वत:चा देह झिजविला आहे. त्यामुळे, एखाद्या मातृत्वाला जन्म देताना जशा वेदना होतात कदाचित तितक्या नाही. मात्र, त्या बरोबरीने ही संस्था उभी करताना त्यांनी कळा सोसल्या आहेत. त्यामुळे, त्यांच्याशी तेथे हुज्जत घालणे, त्यांना तेथून पायउतार करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे त्यांचा श्वास गुद्मरुन धरल्यासारखे आहे. किमाण संस्थेच्या हितासाठी तरी सहकार्‍यांनी सामुपचाराने हा प्रश्न सोडविला पाहिजे असेच तालुक्यातील सुज्ञ जनतेला वाटते आहे.