अट्टल बलात्कारी, प्रेमाचे नाटक करुन काढतो अश्लिल व्हिडिओ.! संगमनेरात सहा गुन्हे,



सार्वभौम (संगमनेर) :-

           एक नव्हे, दोन नव्हे तब्बल तीन बलात्काराचे गुन्हे दाखल आणि चोर्‍या हाणामार्‍या असे सहा गुन्हे दाखल असलेल्या आरोपीवर पुन्हा एक नवा बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. कोठून कसा फोन नंबर उपलब्ध करायचा आणि हाय हॅलो म्हणत मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. मी लग्न करेल, तुझा धर्म स्विकारेल वैगरे शब्दप्रयोगाने घायाळ करून बळजबरी शरिर संबंध प्रस्तापित करायचे आणि नंतर अश्लिल चित्रफित काढून महिलांना ब्लॅकमेल करायचे. अशा प्रकारचा हा प्रोफेशनल धंदा आरोपी उबेद मन्सुर पटेल (रा. साकुर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) याचा सुरू होता. या फकड्यावर घारगाव एक आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोन असे तीन गुन्हे अत्याचाराचे आणि दोन चोर्‍या व एक मारामारी असे सहा गुन्हे दाखल आहेत. पटेल हा एका बलात्काराच्या गुन्ह्यात अटक असताना पुन्हा त्याच्यावर तिसरा तोच गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे, हा व्यक्ती बलात्कार  करण्यासाठी सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी नमुद केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सन 2018 मध्ये साकुर येथील एका 22 वर्षीय तरुणीचा मोबाईल नंबर आरोपी उबेद पटेल याने घेतला होता. त्यांचे व्हॉटसअ‍ॅपवर हाय बाय झाले आणि त्यानंतर त्याने तिला संगमनेर शहरातील एका हॉटेलात बोलावून चहापान केला. त्याच वेळी पटेल याने पीडित तरुणीला आय, लाव यू म्हणून प्रपोज केला आणि तेव्हापासून सुरू झाली ही लव स्टोरी. कालांतराने यांच्यात संभाषण झाले, फोनवर गप्पा टप्पा होऊ लागल्या. मात्र, आड आली ती जात आणि धर्म. तेव्हा या पठ्ठ्याने तिला वचन दिले. तु माझ्यावर प्रेम कर. मी माझ्या धर्माचा त्याग करुन तुझा धर्म स्विकारेल. त्यामुळे, लग्न करताना आपल्याला जाती धर्माच्या भिंती आड येणार नाही. तेव्हा, पीडित तरुणीस विश्वास बसला आणि 1 जानेवारी 2019 रोजी आरोपी पटेल याने त्याला पटेल असे काम सुुरू केले. याने पीडित तरुणीस अकोले नाका येथील एका पॅलेस हॉटेलवर बोलवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर हाच प्रकार वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी झाला. पीडित तरुणीच्या लक्षात आले नाही. की, आपण या व्यक्तीच्या जाळ्यात अडकलो आहोत. त्यामुळे, ते लक्षात येण्यासाठी वेळ निघुन गेली होती.

दरम्यान, सिन्नर येथील शाहु हॉटेलवर ही दोघे गेली असता त्याने पीडितेला नको ती अश्वासने दिली. त्यामुळे, ती भाळली आणि पुन्हा याने तिच्यावर तेथील लॉजवर अत्याचार केला. मात्र, तिला त्याने ब्लॅकमेल करण्यासाठी त्या दिवशी तिचे अश्लिल व्हिडिओ आणि काही फोटो काढले होते. पुढे तिची इच्छा नसताना देखील त्याने जेव्हा जेव्हा बोलविले तेव्हा तेव्हा हिला यावे लागत होते. जर तिने नकार दिला तर हेच फोटो सोशल मीडिया आणि नेटवर टाकण्याचा धमक्या येत होत्या. त्यामुळे, याने पुण्यातील बालेवाडी, नगर शहर, सिन्नर आणि संगमनेर अशा वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार करुन असहायतेचा फायदा घेतला. एकदा नव्हे अनेक वेळा अत्याचार झाले आणि काही लोकांनी या बाबी देखील माहित झाल्या होत्या. त्यामुळे, आता लग्न करणे गरजेचे होते. त्यामुळे, पीडित तरूणी त्याला वारंवार विनंती करीत होती. मात्र, त्याने तिला कायम उडवा-उडविची उत्तरे दिली.

दरम्यान, एकदा पीडित तरुणी नगर येथे गेली असता तो त्याच्या ओमनी कारने तेथे गेले. तेथील रुमवर यांचे वाद देखील झाले. हीने त्याच्याकडे लग्नाची मागणी केली. मात्र, याने तिला सांगितले की, माझ्या आयुष्यात तू एकटी नाहीस. तुझ्यासारखा अनेक मुलींना मी लग्नाचे अमिष दाखविले आहे. त्यामुळे, तुझ्याशी लग्न करणे मला शक्य नाही. आता तु हा प्रकार जर कोणाला सांगितला तर मी तुला ठार करील. असे म्हणून त्याने तिला शिविगाळ, दमदाटी व मारहाण केली. त्यानंतर याच्याशी लग्न करण्यापेक्षा झाले गेले विसरून जाऊ अशी भूमिका या तरुणीने घेतली होती. मात्र, याने तिला त्रास देणे सुरू केले. तिच्या मैत्रीनी आणि काही व्यक्तीना याने फोन करुन सांगितले की, हि खालच्या जातीची आहे. हिचे नातेवाईक फार नालायक आहे अशा प्रकारची बदनामी सुरू केली. तर, दरम्यानच्या काळात याच आरोपी उबेद पटेल याच्यावर संगमनेरात बलात्काराचा आणखी एक गुन्हा दाखल झाल्याचे समजले. त्यामुळे, याच्या बनावट प्रेमाला कोणी बळी पडू नये म्हणून पीडित तरुणीने स्वत: पुढे येऊन घारगाव पोलीस ठाणे गाठले. असा प्रकार फक्त एकाच महिलेवर नव्हे तर अनेक महिलांवर झाला आहे. फक्त कोणी पुढे येत नाही. मात्र, अन्य महिला पुन्हा अशा अमिषाला बळी पडू नये म्हणून या 22 वर्षीय तरुणीने पटेलवर गुन्हा दाखल केला आहे. तर ज्यांच्यावर असा अन्याय झाला आहे. त्यांनी पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.