ड्रेस बदलताना टेलरच्या मुलाने तिचे अश्लिल फोटो काढले.! ती प्रेम करेना म्हणून त्याने तिच्या घरासमोर विष घेतले.! तिघांवर गुन्हा दाखल.!

                                             

सार्वभौम (संगमनेर) :-

           31 जुलै 2015 मध्ये अजय देवगण यांचा दृश्यम हा चित्रपट आला होता. त्यात एक विद्यार्थीनी कपडे बदलत असताना एक मुलगा तिचे अश्लिल फोटा काढतो आणि त्याहून आख्खा पिक्चर उभा राहतो. येथे देखील तसेच झाले आहे. आपल्या फाटक्या आयुष्याची थिगळं शिवण्यासाठी एक विद्यार्थीनी एका महिला टेलरकडे जाते आणि तेथे ड्रेस बदलत असताना टेलरचा मुलगा तिचे अश्लिल फोटो काढतो. तु माझ्यावर प्रेम कर अन्यथा मी हे फोटो तुझ्या मैत्रीणिंना दाखवेल. तुझी बदनामी करेल. मात्र, तरी देखील मुलगी त्यास धजत नाही. परिणामी तो तिच्या शाळेत जातो आणि तेथे देखील तिची छेडछाड करतो. मात्र, त्याच्या प्रेमाला काही थारा मिळत नाही. शेवटी हा तरुण तिच्या घरासमोर जातो आणि विष प्राषण करतो. अर्थात ही काही चित्रपटाची स्टोअरी नाही. तर, दि. 19 एप्रिल 2022 रोजी संगमनेर तालुक्यातील शेडगावमध्ये घडलेली घटना आहे. याप्रकरणी आरोपी विशाल राजेंद्र आंधळे, राजेंद्र आंधळे यांच्यासह एका महिलेवर आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याचे झाले असे की, संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथे इयत्ता दहावीत शिकणारी एक मुलगी मार्च 2022 मध्ये गावात एका महिलेकडे फाटलेले कपडे शिवण्यासाठी गेली होती. त्याच घरात कपडे बदलत असताना विशाल आंधळे हा तेथे होता. मात्र, तो कोठे दडून बसलेला होता, माहित नव्हते. त्यानंतर तीन दिवसांनी तो जेव्हा विद्यार्थीनीला भेटला तेव्हा तो म्हणला की, त्या दिवशी तु घरी आली होती. तेव्हा कपडे बदलताना मी तुझे काही फोटो काढले आहेत. तेव्हा ही बालिका घाबरुन गेली. तीने फोटोंची मागणी केली. हवं तर मला दाखवू नको पण डिलीट तरी कर अशी विनंती देखील केली. मात्र, तिच्या असहायतेचा फायदा घेऊन विशाल म्हणाला की, तुला माझ्यासोबत बोलावं लागेल, माझ्यावर प्रेम करावे लागेल, माझ्याशी लग्न करावे लागेल. तेव्हा हिने साफ नकार दिला. त्यावेळी, विशाल म्हणाला की, तुला हे मान्य नसेल तर मी हे फोटा गावातील गृपवर टाकून तुझ्या मैत्रीनिंना दाखविणार आहे. 
दरम्यान, मुलीने हा सर्व प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. तेव्हा पीडितेच्या आई वडिलांनी थेट विशालचे घर गाठले. तेव्हा त्यास सर्वांनी समजून सांगितले. मात्र, तेव्हा विशाल म्हणाला की माझ्याकडे कोणतेही फोटो नाही. आता मी तुमच्या मुलीला त्रास देणार नाही. त्यानंतर हे सर्व प्रकरण शांत झाले होते. मुलगी देखील निच्छिंत झाली होती. मात्र, दि. 28 मार्च 2022 रोजी विद्यार्थीनीस दहावीचा विज्ञान दोनचा पेपर होता. सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास ती आणि तिची मैत्रीण पेपरला जात असताना विशाल हा शाळेच्या गेटवरच उभा होता. तो तेथे आला आणि त्याने काही एक न बोलता त्याच्या हातातील मोबाईल जोराने जमीनिवर आपटला. आता मी पेपर सुटल्यावर तुझ्याकडे पाहून घेता. तुझी लोकांमध्ये बदनामी करतो असे म्हणून तो तेथून निघुन गेला. मुलीस पेपर असल्यामुळे, ती निघुन गेली. मात्र, आता पुढे नवे काय प्रश्न निर्माण होणार याचे उत्तरे शोधता शोधता तिला पेपरची उत्तरे बुजकाळ्यात टाकून गेली.

तिने दिलेल्या फिर्यादीत पुढे म्हटले आहे की, त्या दिवशी दुपारी 1 वाजता पेपर सुटला तेव्हा विद्यालयाच्या बाहेर गोळ्या बिस्कुटांच्या टपरीवर विशाल उभा होता. त्याने तिला आवाज दिला. मात्र, ती जवळ आली नाही म्हणून त्याने तिला शिविगाळ दमदाटी केली. त्यामुळे, घाबरलेल्या मुलीने तेथील एका दुकानदाराच्या मोबाईलहून तिच्या वडिलांना फोन केला. तेव्हा काही मिनिटात भाऊ आणि वडिल तेथे गाडीवर आले. तोवर विशाल तेथून निघुन गेला होता. जेव्हा ही मुलगी घरी गेली तेव्हा पाहिले तर विशाल हा तिच्या घरासमोर उभा होता. त्याच्या हातात एक बाटली होती. तेव्हा मुलीचे वडिल त्यास म्हणाले की, तु आमच्या घरी येऊ नको. यायचे असेल तर तुझ्या आई वडिलांना घेऊन ये.! तेव्हा, विशालने त्याच्या खिशातील विषाची बाटली काढली आणि ती प्राषण केली. त्यावेळी एका दुचाकीहून आलेल्या दोघांनी त्यास तत्काळ रुग्णालयात दाखल केले.

   दरम्यान, हा सर्व वाद स्थिर करण्यासाठी मुलाचे आणि मुलीचे असे काही नातेवाईक एकत्र आले. त्यांनी यावर उपाय म्हणून असा प्रस्ताव ठेवला की, सध्या मुलाला स्टेबल होऊ देणे गरजेचे आहे. तर, मुलाकडच्यांनी असा प्रस्ताव ठेवला की, मुलाचे मुलीवर प्रेम आहे. मुलगी सध्या अल्पवयीन आहे. त्यामुळे, लग्न करणे शक्य नाही. मात्र, यावर एक पर्याय म्हणून सध्या कुंकुटिळा करुन घेऊ आणि नंतर यांचे लग्न लावून देऊ.! मात्र, हे सर्व प्रस्ताव मुलीने धुडवावून लावत तिने स्पष्ट सांगितले की, याने माझे अश्लिल फोटो गुपचूप काढून मैत्रीणी आणि लोकांना दाखवत होता. याने माझी बदनामी केली आहे. त्यामुळे, कोणत्याही परिस्थितीत लग्न वैगरे आणि प्रेम असल्या भानगडीत न पडता यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यामुळे, ठरल्याप्रमाणे यांनी विशाल आंधळे, राजेंद्र आंधळे यांच्यासह एका महिलेवर आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास सक्षम अधिकारी सुभाष भोये साहेब करीत आहेत.