अकोल्यात बाबासाहेबांच्या जयंतीत मुस्लिम बांधवांची संस्कृती आणि संगमनेरात विकृती.! पुन्हा जातीय दंगल, 150 जणांवर गुन्हे.! दोघांना अटक.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर म्हणजे फक्त नावापुरते संस्कृतीचे शहर म्हणून राहिले आहे की काय? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. कारण, नाम बडे और दर्शन खोटे अशी टिका या शहराबाबत होऊ लागली आहे. कारण, यापुर्वी येथे हिंदु-मुस्लिम अशा दंगली होत होत्या. त्यानंतर भर दिवसा आणि भर चौकातून पोलिसांना डांबरी-डांबरीने पळण्याची वेळ आली. तर अगदी चारदोन दिवसांपुर्वी दिल्लीनाका परिसरात एकाला बेशुद्द होईपर्यंत मारहाण झाली. हे प्रकरण मिटते नाही. तेच आज 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीत काही मुस्लिम तरुणांनी कट रचून शिरकाव केला आणि त्यांच्या समाजाच्या घोषणा देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रथापुढे नको तसे वर्तन केले. इतकेच काय.! तर, मिरवणुकीत नाचणार्या काही महिलांना नको तसा स्पर्श करून उत्सवाचा पावित्र्य मलिन केले. म्हणजे, संगमनेरात नेमकी कोणती धर्मांध आणि जातीय शक्ती जन्म घेत आहे. याची प्रचिती आता येऊ लागली आहे. येथे हे लोक धर्मवेडे नव्हे तर याला विकृती म्हणावी लागेल. कारण, अकोले शहरात शंभर पेक्षा जास्त मुस्लिम बांधवांनी उपवास सोडल्यानंतर स्वत: महात्मा फुले चौकात भिम जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. तेथे त्यांनी रयतेचे राजे छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला देखील उजाळा दिला. त्यामुळे, धर्म एकच आहे. मात्र, संस्कृती कोठे कशी रुजू पाहते हे आता नव्याने सांगायला नको.!
याबाबत किशोर चव्हाण यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सायंकाळी 7 वाजता जयंती सुरू झाली होती. त्यानंतर ती 8:30 वाजता श्रीकृष्ण मंदिरासमोर आली होती. तेव्हा अचानक या मिरवणुकीत शंभर ते दिडशे मुस्लिम तरुण घुसले. त्यांनी हातात हिरवा झेंडा धरुन तो गर्दीत फडकविण्यास सुरूवात केली. तेथे त्यांनी काही प्रक्षोभीत घोषणा देखील दिल्या. त्यामुळे, कालांतराने निळा आणि हिरवा अशा प्रकारचा वाद निर्माण होण्याची चिन्हे तयार झाली. यावेळी खरंतर पोलिसांनी कठोर भुमिका घेणे अपेक्षित होतेे. मात्र, त्याच ठिकाणी वर्दीवर देखील हात पडल्यामुळे, त्यांनी देखील सावध भूमिका घेऊन बराच वेळ बघ्याची भूमिका पार पाडली. एकीकडे त्या परिसरात कायम दहशतीचे वातावरण असते. त्यामुळे, दिल्लीनाका/तिनबत्ती चौक येथे पोलिस राज आणि वर्दी यांना कोणताही थारा नसतो असे बोलले जाते. एकतर वर्दीवर हात पडला म्हणजे कोणताही अधिकारी साथ देत नाही. त्यामुळे, होऊद्या राडा.! रिस्क नको, अशी बचावात्मक भूमिका वर्दीची असते. असे त्यांचेच कर्मचारी सांगतात. त्यामुळे, पोलिसांच्या डोळ्यादेखत कट रचला गेला, महिलांच्या छेडछाड झाल्या, रथाचा नव्हे.! राष्ट्रपुरूष, विश्वरत्न बाबासाहेबांचा अवमान झाला, दंगल झाली, धर्मांध तणाव निर्माण झाला. संबंध आंबेडकरवाद्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. मात्र, तरी पोलिसांनी कोणतीही कठोर भूमिका घेतली नाही. एव्हाना, या तरुणांची इतकी दहशत होती की, त्यांनी पोलिसांना देखील जुमानले नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, मिरवणुक शांततेच्या मार्गाने सुरु असताना अशा पद्धतीने इतका मोठा मॉब आला, त्यांनी अचानक झेंडे आणले, डॉ. बाबासाहेब सोडून त्यांनी त्यांच्या धर्माच्या व्यक्तींचा जयघोष केला. नको तसे नाचणे आणि वर्तन करणे. यामुळे, या तरुणांना भिमसैनिकांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते एकण्याच्या मनस्थितीत नव्हते. म्हणजे, मोहरमच्या मिरवणुकीत निळे झेंडे घेऊन नाचले तर अर्थात ते कोणाला खपणार नाही. खरंतर डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीत हिरवे झेंडे नाचले तर त्यात गैर काही नाही. मात्र, त्याला एक संस्कृती आणि वर्तन हवे. विचार आणि नियम हवा. कारण, बाबासाहेब हे कोण्या एकाची मक्तेदारी नव्हे. त्यांनी हिंदू आणि बौध्दच काय, मुस्लिम समाजासह प्रत्येक धर्माला संविधानातून न्याय दिला आहे. त्यामुळे, त्यांच्यावर प्रत्येकाचा अधिकार आहे. परंतु, त्यांच्या रथाचा अवमान, त्यांच्या विचारांचा अवमान, त्यांच्या नितीमुल्यांचा अवमान करण्याचा अधिकार यांना कोणी दिला? त्यामुळे, अगदी कट रचून ही जयंती उधळून लावायची अशा प्रकारचा प्लॅन या तरुणांनी आखला होता असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार घडल्यानंतर फिर्यादीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला. त्यात फिरोज गुलाब बागवान (मोमीनपुरा, ता. संगमनेर), अहमद कामर चौधरी, अमन समिन बागवान, हुजेब इकबाल बागवान, सोहेल इकबाल शेख, अल्ला अजीज खान, हमजा शेख, साबीर शेख, आरबाज शेख, अब्दुल समद कुरेशी, डनियल शेख, आफन शेख, उमेद काझी, महरुफ अस्लम बागवान यांच्यासह 120 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आता यापलिकडे विचार केला तर, अकोले शहरात जे काही मुस्लिम बांधव आहेत. त्यांनी रिपाईचे राज्यसचिव विजय वाकचौरे यांच्याशी संपर्क केला आणि दिडशेपेक्षा जास्त मुस्लिम बांधवांनी महात्मा फुले चौकात भिमजयंती साजारी केली. इतकेच काय.! हा कार्यक्रम भर चौकात इतका सुसंस्कृत पद्धतीने पार पडला की, संपुर्ण तालुक्यात या जयंतीची चर्चा झाली. त्यातील काही वक्त्यांनी छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला उजाळा दिला. त्यामुळे खरोखर येथील सर्वधर्म समभाव या वाक्याचे दर्शन घडले. अर्थात संगमनेर आणि अकोले येेथे एकाच धर्माची लोक होते. मात्र, त्यांचे विचार, वागणे, जगणे, सामोपचार, एकोपा, समाजहित आणि दृष्टीकोण यात किती जमीन आसमानचा फरक जाणून आला. त्यामुळे, कधी नव्हे.! अशी पहिल्यांदा एक ऐतिहासिक जयंती अकोल्यात पहायला मिळाली. तर सुसंस्काराचा आणि संस्कृतीचा बुरखा घातलेल्या सगमनेरात विकृती पहायला मिळली अशी टिका विचारवंतांनी केली. तर सोशल मीडियावर या घटनेचा सर्वत्र निषेध नोंदविण्यात आला.
खरंतर, संगमनेरात पोलीस कसे अपयशी आहेत. हे वारंवार सिद्ध होत आहे. यापुर्वी संगमनेरला जातीय आणि धर्मांध रंग इतका कधी नव्हता. मात्र, पोलिसांनी मार खाणे, खुलेआम कत्तलखाने चालणे, शहरासारख्या ठिकाणी पोलीस ठाण्याच्या जवळ चोर्या, घरफोड्या आणि दरोडे होणे, विशेष म्हणजे भर मिरवणुकांमध्ये पोलिसांच्या उपस्थितीत आणि महापुरुषांच्या समोर महिलांच्या छेडखाणी होणे, पोलिसांच्या विरोधात प्रांत कार्यालयासामोर रात्र-रात्र आंदोलने होणे, पोलिसांना पारंपारीक रथ ओढण्यास विरोध करणे म्हणजे, संगमनेर शहरात नेमकी काय चांगले चालते? याचे एखादे उदाहरण तरी दिले पाहिजे. अर्थात हा सगळा भाग येऊन ठेपतो तो म्हणजे, मतांच्या राजकारणावर.! कारण, अधिकार्यांना हेच राजकारणी पाठीशी घालतात. जनतेचे काही होवो.! आम्ही म्हणून तसेच चालले पाहिजे, आमचे नातेवाईक किंवा आडनाव एक असले तर त्यांनी कितीही वाईट केले तर त्यांनाच बरोबर म्हटले पाहिजे. कितीही वादग्रस्त ठरले तरी त्यांच्या पाठीशी उभे राहणे आणि आपण म्हणू तसे करुन घेणे.! त्यामुळे, संगमनेर शहराला तरी आता कळा राहिली नाही. येथे काय चालत नाही? जे बिहारमध्ये नाही. त्यामुळे, हे प्रकार आता टोकाला जाण्यापुर्वीच हाताळले पाहिजे असे मत संगमनेरच्या सुज्ञ जनतेने व्यक्त केले आहे.