अकोल्यात सोयाबीन चोरणारी टोळी जेरबंद, 20 लाखांचा मुद्देमाल जप्त, प्रतिष्ठीत घरात चोर तयार होत आहे.!
अकोले तालुक्यात सोयाबिन चोरी करणारी टोळी सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी जेरबंद केली आहे. यांच्याकडून लाख रुपयांची सोयाबिन आणि काही वाहने असा 19 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिसांनी दि. 6 मार्च 2022 रोजी केली असून यात अकोले तालुक्यातील सहा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यात बरेच आरोपी ही प्रतिष्ठीत घरातील असून यांनी शेतकर्यांनी घाम गाळुन घेतलेल्या पिकावर डल्ला माल्यामुळे, शेतकर्यांनी पोलिसांकडे आपली कैफीयत मांडली होती. त्यामुळे, गेल्या कित्तेक दिवसांपासून पोलिसांच्या रात्रगस्त, कोम्बींग ऑपरेशन आणि नाकाबंदी सुरू होत्या. मात्र, जेव्हा या चोरट्यांंची खात्रीशिर माहिती मिळाली. तेव्हा पोलिसांनी पहिल्यांदा चौघांना अटक केली आणि त्यानंतर त्यांचे साथिदार अटक केले आहेत. यात राजूर, खानापूर, तांभोळ आणि गर्दणी अशा ठिकाणचे आरोपी आहेत. यांना आज न्यायालयापुढे हजर केले असता पुढील तपासासाठी कोर्टाने 10 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले तालुक्यात गेल्या काही दिवसांपुर्वीच सोयबीनचे पिक काढून त्याचा साठा करण्यात आला होता. त्यात कोतुळ, ओतुर आणि रेडे येथे काही शेतकर्यांनी मोठ्या कष्टाने हे पिक घेतले आणि त्याचा साठा केला होता. मात्र, या चोरट्यांनी योग्यतो डाव साधला आणि लाखो रुपयांच्या सोयाबिनची चोरी केली. हे सर्व गुन्हे 2022 च्या काळातीलच होते. मात्र, ज्या शेतकर्यांची चोरी झाली होती. त्यांची हळहळ पोलीसांना पहावली नाही. त्यामुळे, हे आरोपी शोधण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले होते. तसेही जिल्ह्यात पसार आरोपींवर नजर ठेवणे, त्यांच्या घरी जाऊन त्यांची चौकशी करणे, त्यांना ताकीद देणे, नाकाबंदी आणि कोम्बींग ऑपरेशन सुरू आहेत. जे जिल्ह्यात दिड हजार पसार आरोपी होते. त्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. त्यामुळे, त्याचा एक भाग म्हणून घुगे साहेब देखील कोठे कमी पडलेले नाही. त्यांनी देखील अनेक गुन्ह्यांची निर्गती करण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, रविवार दि. 6 मार्च 2022 रोजी घुगे यांना गोपनिय पद्धतीने माहिती मिळाली होती की, अकोले तालुक्यातील गर्दणी, खानापूर आणि तांभोळ येथे सोयाबीन चोरीचे आरोपी आहेत. त्यानुसार घुगे यांच्या पथकाने गर्दनी येथे छापा टाकून पहिल्यांदा अजय बाळु मेंगाळ, लहु वाळीबा मेंगाळ (रा. तांभोळ, ता. अकोले), विजय अशोक खोडके (रा. खानापूर, ता. अकोले) व भिमाराज गंगाराम मेंगाळ (रा. खानापूर, ता. अकोले) या चौघांना ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या. त्यांना पोलिसांनी सर्व प्रकार आणि साथीदार यांच्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून पोलिसांनी समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. त्यामुळे, पाहे प्रसादाची वाट आणि आमचा रामराम घ्यावा या पद्धतीचा वापर केला असता चौघे आरोपी अगदी पोपटासारखे बोलले. कशी चोरी केली, कशात घालुन सोयाबीन नेली, कोठे नेऊन ठेवली, आणखी कोठे चोरी केली, सोबत सहआरोपी कोण होते? हे सर्व सांगितल्यानंतर त्यांनी राजूर येथील आणखी दोघांची नावे सांगितली. त्यानंतर पोलिसांनी राजूर गाठले आणि तेथून मयुर लहाणु मुर्तडक आणि नंदु रामा भाले (रा. दिगंबर, ता. अकोले) या दोघांना ताब्यात घेतले. आम्ही नाही त्यातले म्हणताच त्यांना खाकीचा प्रसाद प्रदान केला असता दोघांनी आपला गुन्हा कबुल केला.
दरम्यान, या सहा जणांकडून पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यात असे लक्षात आले की, यांनी रेडे, कोतुळ आणि पुणे ग्रामीण येथील ओतूर मधून सोयाबीनची चोरी केली आहे. तेव्हा अधिक तपास केला असता यांच्याकडून 25 क्विंटल म्हणजे 1 लाख रुपयांचा सोयाबीन साठा, चोरीचा माल वाहण्यासाठी वापरण्यात आलेली 25 हजारांची दुचाकी, एक 5 व 7 लाख रुपयांची दोन चारचाकी वाहने आणि विजय खोडके व भिमराज मेंगाळ या दोघांनी चोरी केलेली एक पीकअप असा 19 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाला पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यामुळे, शेतकर्यांच्या घामाचे दाम स्वत:च्या घशात घालु पाहणार्या या चोरट्यांच्या मुसक्या अकोले पोलिसांनी आवळल्याने त्यांचे कौतुक होत आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, पोलीस उपाधिक्षक राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली मिथुन घुगे, भुषण हांडोरे, मैनुद्दीन शेख, लांडे, संगिता आहेर, अविनाश गोडगे, सुयोग भारती, आनंद मैड, विजय आगलावे, अशोक गाडे, फुरकान शेख यांच्यासह अन्य कर्मचार्यांनी केली.