कोरोनाच्या संकटकाळात शहरातील डॉक्टरचे मनोधैर्य खचवून नाहक त्रास देण्याचा प्रतिष्ठितांचा प्रताप...
संगमनेर/प्रतिनिधी-
जागतिक महामारी म्हणून घोषित झालेल्या कोरोनाच्या संकटकाळात स्वतःच्या जीवाची बाजी लावून अहोरात्र कोरोना या संसर्गजन्य साथरोगात डॉक्टर आपले कर्तव्य बजावत आहे. कोरोनाच्या या संकटकाळात डॉक्टर देव दूताप्रमाणे रुग्णांवर उपचार करत आहे. या संकटकाळात सगळीकडे लॉक डाऊनच्या कठीण दिवसात सगळे उद्योगधंदे व्यापार ठप्प झाल्याने अनेक गोरगरिबांवर मजुरांवर उपासमारीची वेळ आली असताना माणसातील माणुसकीचे दर्शन घडवत समाजातील अनेक दानशूर दाते मदत करताना दिसून आले. तर याचेच विरोधाभासी अमाणुसकीचे दर्शन घडवत कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्स, वैद्यकीय स्टाफला अस्पृश्यतेने वागत काहींनी आपल्याकडे भाड्याने दिलेल्या घरातून डॉक्टर्स, नर्स, वैद्यकीय स्टाफला बेघर होण्यास भाग पाडले.