अकोल्यात तीन मुलांच्या आईवर बलात्कार, त्याने धोका दिला.! तरुणावर गुन्हा दाखल.!
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यातील मेहेंदुरी येथे एका विवाहीत महिलेवर एका तरुणाने बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. संबंधित महिलेस तीन मुलं असून ते एकाच गावात वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. एकमेकांच्या सानिध्यात आल्यानंतर त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले आणि नंतर यांच्यात अनेक दिवस सालोख्याचे संबंध राहिले. मात्र, दरम्यानच्या काळात एकमेकांमध्ये वाद झाल्यामुळे संबंधित महिलेने थेट अकोले पोलीस ठाणे गाठले आणि आपला मित्र तथा प्रियकर याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सुशिल उमाजी बंगाळ (रा. मेहेंदुरी, ता. अकोले) यास आरोपी करण्यात आले आहे. तर, गेल्या कित्तेक दिवसांपासून जो सिलसिला सुरू होता. त्यावर गुन्ह्याच्या स्वरुपात पडदा पडला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित महिला आणि आरोपी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून मैत्री तथा ओळख होती. त्यानंतर, एकदा ती अकोल्याला जात असताना हे दोघे गाडीवर जात असतान त्याचे रुपांतर कधी प्रेमात झाले हे त्यांना देखील समजले नाही. त्यामुळे, त्यांचे नेहमी व्हाटसअॅपवर हायबाय तर एकमेकांना फोन होत होते. पीडित महिला ही विवाहित असून तिला तीन मुले आहेत. मात्र, तरी देखील बंगाळ याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. कामानिमित्त घरी जाणे आणि तिच्या साध्याभोळ्या पतीसोबत लगट करून याने या महिलेचा फायदा घेतला आणि तुझ्या मुलांना देखील मी संभाळेल असे म्हणून तिला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला.
दरम्यान, या तरुणाने संबंधित महिलेला अकोल्यातून घेऊन पळ काढला आणि त्याने थेट पुणे तर कधी पाथर्डी गाठले. त्यानंतर अनेक जिल्ह्यामध्ये त्याने तिला नेले होते. मात्र, हा प्रकार तिच्या पतीला समजला नाही. त्यानंतर त्यांनी अकोले पोलीस ठाण्यात आपली पत्नी हरविली आहे. अशा प्रकारची तक्रार दिली होती. मात्र, जेव्हा पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा, नेमकी काय प्रकार आहे याची उकल झाली. गावातील बंगाळ आणि ही महिला पसार असल्याचे लक्षात येताच पुढे हा काय प्रकार आहे हे नव्याने सांगण्याची गरज राहिली नाही. मात्र, तरी देखील पीडित महिलेच्या पतीने या दोघांचा शोध घेण्यासाठी रेटा लावला आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या लोकेशनचा अंदाज घेऊन त्यांचा ठावठिकाणा शोधला होता. त्यानंतर तब्बल दिड ते दोन महिन्यानंतर ती आली. मात्र, त्यानंतर पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.
दरम्यान, फिर्यादीने आज अकोेले पोलीस ठाण्यात जाऊन आपली फिर्याद नोंदविली आहे. की, आरोपी याने तिला लग्नाचे आमिष दाखविले आणि म्हणाला की, मी तुझ्याच सोबत लग्न करेल. तेव्हा पीडित महिला म्हणाली की, मला तीन मुलं आहेत. तेव्हा आरोपीने ते तिनही मुले संभाळण्याचे वचन दिले होते. त्यामुळे, 20 सप्टेंबर 2021 ते 11 जानेवारी 2022 या काळात त्यांनी घर सोडले आणि ते नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात खरवंडी कासार येथे जाऊन राहत होते. त्यावेळी बंगाळ याने तिच्यासोबत इच्छा नसताना बलात्कार केला. मात्र, ही घटना घडल्यानंतर पीडित महिलेने त्याच्याशी लग्नासंबंधी विचारणा केली असता त्याने तिला उडवाऊडविची उत्तरे दिली. त्यामुळे, दिलेला शब्द न पाळल्याने तीने आज अकोले पोलीस ठाण्यात सुशिल उमाजी बंगाळ (रा. मेहेंदुरी, ता. अकोले) गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची पुढील चौकशी पोलीस उपाधिक्षक राहुल मदने करीत आहेत.