त्याने प्रेयसिवर अत्याचार केला आणि पळुन गेला, ती गरोदर राहिली आणि भर रस्त्यात बाळांत झाली.! अकोल्यातील धक्कादायक प्रकार.!
सार्वभौम (राजूर) :-
अकोले तालुक्यातील वारंघुशी येथे प्रेमाचे नाटक करुन एका 15 वर्षीय तरुणीवर तिच्या प्रियकराने अत्याचार केला. त्यात दुसर्याच महिन्यात ती गरोदर राहिली. मात्र, गावात चर्चा व्हायला नको, समाजात चव जायला नको म्हणून तिच्या घरच्यांनी तिला तब्बल नऊ महिने घरातच ठेवले. मात्र, डिलेवरीची तारीख जवळ आल्याने तिला त्रास होऊ लागला म्हणून घरच्या घरी प्रयत्न केला. परंतु, सुईन हिने सांगितले की, ही डिलेवरी नाजुक आहे. त्यामुळे, हिला दवाखान्यात न्यावे लागले. त्यानंतर पीडित तरुणीला अकोले संगमनेर रस्त्याने नेत असताना तिची संगमनेर बस स्थानकाजवळ डिलेवरी झाली. यात मुलीचे वय फार कमी असल्यामुळे, डिलेवरी दरम्यान फार रक्तस्त्राव झाल्यामुळे तिला आता नाशिक येथे दाखल करण्यात आले आहे. या तरुणीने अवघ्या दिड किलोचे गोंडस बाळास जन्म दिला असून दोघींची परिस्थिती चांगली आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी संबंधित प्रकरणात लक्ष घालुन पीडित तरुणीच्या जबाबानुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी मारुती भवारी (रा. वारंघुशी, ता. अकोले, जि. अ.नगर) यास बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित मुलगी ही इयत्ता 7 वी मध्ये शिकत होती. त्यानंतर तिने शाळा सोडली आणि घरकाम करीत होती. याच दरम्यान, ती गावातील एका दुकानात गेली होती. तेथे यांची नजरानजर झाली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले. त्याच दिवशी आरोपी मारुती भवारी याने तिला एका पडक्या घरात नेले आणि तिच्याशी लगट करून करुन तिच्या इच्छेविरूद्ध अत्याचार केला. हे कृत्य केल्यानंतर त्याने पीडित तरुणीस तेथेच सोडले आणि तो निघुन गेला. घडला प्रकार आता कोणाला सांगितला तर लोक काय म्हणतील? घरात आई वडिल राहू देणार नाहीत. त्यामुळे, पीडित तरुणी शांत बसली. मात्र, दोन महिन्यानंतर तिचे फार पोट दुखले म्हणून तिने तिच्या आईस सांगितले. मात्र, घरात अज्ञानपणाचे वास्तव्य असल्यामुळे, त्यांनी या कानाची खबर त्या कानाला सांगितली नाही.
दरम्यान, या पीडित मुलीच्या पालकांनी घडला प्रकार पोलिसांना सांगितला असता तर त्यावर तत्काळ मार्ग निघाला असता. मात्र, लोक काय म्हणतील, मुलीच्या आयुष्याचे काय? नातेवाईकांमध्ये तोंड दाखवायला जागा राहणार नाही. त्यामुळे, झाकली मुठ सव्वा लाखाची. मात्र, या उचापतीबाबत त्यांनी आरोपीला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने तोवर गाव सोडले होते. आता गेली 9 महिने या मुलीला यांनी घरातून बाहेर काढले नाही. तिने घरातच कामे करायची आणि समाजापुढे यायचे नाही. असे हे सर्व दिवस निघुन गेले. मात्र, दि. 14 जानेवारी 2021 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीस प्रचंड त्रास होऊ लागला. तिच्या काळा आणि त्यातून निघणार्या किंकाळ्या हे सर्व काही तिला सहन होणे अशक्य होते. म्हणून तिच्या आईने गावातील एक बुजूर्ग महिला (दाई) यांना बोलावून आणले. मात्र, हिची डिलेवरी मला करता येणार नाही, त्यामुळे, हिला दवाखान्यातच न्यावे लागेल असे सांगितले.
दरम्यान, आता लोकांपासून हे काही लपविण्यात अर्थ नाही. असे त्यांच्या लक्षात आले. म्हणून तिच्या पालकांनी गावात जाऊन एक गाडी आणली. त्यानंतर तिला राजूर-अकोले या दोन्ही ठिकाणी न नेता थेट सांगमनेर येथे हलविण्याचा निर्णय झाला. मात्र, अकोले ते संगमनेर या रोडवर बस स्थानकाच्या दरम्यान तिची डिलेवरी झाली. मात्र, त्याचा तिला फार त्रास झाला. त्यामुळे, अधिकचा रक्तस्त्राव झाल्यामुळे, तिला संगमनेर येथून पुन्हा नाशिक येथे हलविण्यात आले. तेथे गेल्यानंतर पाहिले की, बाळ हे 1 किलो आणि सातशे ग्रॅम असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. गेल्या काही तास बाळ आणि आई या दोघींची प्रकृती चिंताजनक होती. मात्र, आता सांगली असून याबाबत रुग्णालयाने राजूर पोलिसांशी संपर्क केला होता. त्यानंतर राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी तत्काळ मुलीचे जबाब घेऊन गुन्हा दाखल केला आहे. तर, आज त्यास पोलिसांनी बेड्या देखील ठोकल्या आहेत.