दोन वेळा आम्हाला व्यापार्‍यांनी तारले आता तिसर्‍यांदा पुन्हा इतिहास घडेल.! वंदनाताई शेटेंचे सासरे भाऊक झाले.!




सार्वभौम (अकोले) :-
              अकोले तालुका हा मुळत: पुरोगामी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे, आजचे दिशाहीन राजकारण आणि त्याची खालावत चाललेली पातळी ही फार शोकांतीकेची गोष्ट आहे. म्हणून माझं उभं आयुष्य गेलं. पण, मी कम्युनिष्ट पक्ष सोडल नाही. कित्तके आले आणि कित्तेक आपल्या स्वार्थापोटी निघुन गेले. कोणी पक्ष बदलला तर कोणी विचारांनी तिलांजली दिली. मात्र, माझ्यातील प्रामाणिकपणा आणि वैचारिक तत्व आजही जिवंत आहे. माझ्या कुटूंबाला संस्कार, निष्ठा आणि स्वच्छ प्रतिमेचा वारसा आहे. त्यामुळे, माझे वडिल रभाजी शेटे हे देखील अकोल्याचे सरपंच होते आणि त्यांच्यानंतर मी देखील सरपंच होऊन गेलो. सुर्दैवाने आज माझ्या घरातून माझी सुनबाई वंदना शेटे ही देखील राजकीय पटलावर उभी राहिली आहे. त्यामुळे, मला खात्री आहे. येथील समाज हा व्यक्ती, चारित्र्य आणि संस्कार यालाच महत्व देईल. मला कोणावर टिका करायची नाही. मात्र, माझ्या परिवाराला पुन्हा या शहराची सेवा करण्याची संधी तुम्ही द्याल यात मला शंका नाही.
                     खरंतर तो काळ 1944 ते 45 चा असावा, तेव्हा भारताला स्वातंत्र्य देखील मिळालेले नव्हते. त्यामुळे, इंग्रजांच्या वसाहती बेलापूर, नाशिक, नगर अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात बसलेल्या होत्या. इंग्रज अधिकारी अकोल्यात आल्यानंतर तेव्हा माझे वडिल रावसाहेब शेटे यांचे गुन्हाळ होते. तेथे घोड्याला टाच मारुन आलेल्या इंग्रजांची धिटाई व्हायची. ते उसाचा रस आणि गुळाची कहाकी खायची आणि निघून जायचे. त्यांची उठबस आमच्याकडे व्हायची. अर्थात घरी 60 एकरचे जमीनदार आम्ही असल्यामुळे, व्यापारी आणि नोकरदार तथा प्रतिष्ठेची उठबस घरी होई. म्हणून तर जेव्हा अकोले ग्रामपंचायत स्थापन झाली तेव्हा पहिला सरपंच हा ब्राम्हण सामाजाचा तर दुसरा सरपंच म्हणून माझ्या वडिलांना मान मिळाला होता. अर्थात ते काँग्रेसचे काम करीत होते. मात्र, त्यांच्या सोबत राहून देखील माझ्यावर कम्युनिष्ट विचारांचा पगडा होता. कारण, अमर शेख, गळणकर, कडूपाटील, गोविंद पानसरे यांच्याशी माझी उठबस होऊ लागली होती.
                  अर्थात मला राजकीय आणि सामाजिक बाळकडून घरातूनच मिळाले होते. त्यामुळे, 1956 सालानंतर कम्युनिष्ट चळवळ माझ्या राजकीय जिवणाला आकार देत होती. पुढे, 1958 पासून संंयुक्त महाराष्ट चळवळ, पुढे तालुक्यातील मोर्चे, अंदोलने, मार्क्सवाद, लेनीन वैगरे हे एक अभ्यासाचा विषय होऊन गेला. त्यानंतर 1967 साली शहरातील नाही नेत्यांनी मला अकोले ग्रामपंचायतीचा सरपंच करण्याचे ठरविले. मात्र, तेव्हा, मुरलीधर मास्तर, नामादादा अशा काही व्यक्तींनी मला विरोध केला होता. मात्र, तरी देखील येथील व्यापारी वर्गाने मला सपोर्ट केला. त्यात द्वारकानाथा सारडा, मुरलीधर रासणे, बबन कोळपकर यांच्यासह अनेक व्यापार्‍यांनी माझी बाजु बळकट केली. मात्र, तरी देखील माझ्या विरोधात 1967 साली शिवाजी भुजबळ यांनी उमेदवारी केली आणि त्यांना मोठा पराभव पत्कारावा लागला होता. अर्थात तेव्हा एकुण सात वार्ड होते. आज त्याच शहराचे 17 प्रभाग झाले आहे. त्यात प्रभाग 11 मध्ये आजही दिडशे हा व्यापारी वर्ग आहे. तेव्हा त्यांनी मला तारले होते. ते आजही माझ्या सुनामागे ठामपणे उभे राहतील यावर माझा विश्वास आहे.
                      खरंतर, त्याकाळी म्हणजे 1968 साली आज प्रमाणे काही सोई सुविधा नव्हत्या, तरी देखील एक धर्म म्हणून शहरात सोडा, तालुक्यात असा हरिनाम सप्ताह होणार नाही असे नियोजन मी केले होते. त्याकाळी, मा.आ.बी.के.देशमुख, खा.बाळासाहेब विखे. बाबुराव तनपुरे, पुण्याच्या विडी कारखान्याचे मालक ठाकुर सावडेकर यांच्यासह कोल्हापुरच्या गादीसह अनेकांकडून निधी जमा करण्याचा प्रयत्न केला होता. तर शेटे मळ्यातील दत्तमंदीरात तुकडोजी महाराजांना देखील अकोल्यात सप्ताह कारण्यासाठी आणले होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, खुद्द हे सर्व पाहून तुकडोजी महाराज शेटे मळ्यात तीन दिवस ठाण मांडून होते. त्यांना येथील एका मालुंजकर व्यापार्‍याने जीप देऊ केली होती. मात्र, तरी ती त्यांनी नाकारली होती. तेव्हा जीप असणारा तो एकमेव व्यक्ती होता. तर शहरात फक्त अंमलदार, दोन डॉक्टर आणि मी आम्हा तिघांकडे बुलट गाडी होती. त्या काळात जवळजवळ दोनशे ते तीनशे बैलगाड्या भरुन लोक या सप्त्याला आले होते. तेव्हापासून आमच्या कुटूंबाला लोकांनी आपल्या काळजात ठेवले आहे.
                            माझ्या पाठोपाठ माझ्या मुलांनी देखील हीच परंपरा जोपासली आहे. माझी हयात कम्युनिष्ट विचारसारणीची राहिली आहे. मात्र, जेव्हा मी अजारी पडलो तेव्हा आमदार डॉ. किरण लहामटे हे माझ्याकडे आले होते. त्यांनी विनंती केली. मला तुमच्या मुलाला माझ्यासोबत घ्यायचे आहे. तेव्हा त्यांच्या स्वाभाव, त्यांची तळमळ आणि सिताराम पाटील गायकर साहेब, अशोक भांगरे व तरुण मुलगा अमित भांगरे या सर्वाच्या एकोप्याने तो शहरात काम करू लागला आहे. त्याचा स्वभाव म्हणजे कोणाच्या दुखण्यावर देखील तो सलणार नाही, कोणाला अपशब्द वापरणार नाही, कोणाला फिरून बोलणार नाही, त्याच्या व्यावसायात त्याला ज्याला कोणाला मदत करता येेईल तेथे तो कधी कमी पडत नाही. अतीशय नितळ, निर्मळ आणि प्रंजळ स्वभावाचे ते व्यक्तीमत्व आहे. त्यामुळे, त्याचे कर्तुत्व होच त्याला यश प्राप्त करून देईल. अगदी गेल्या काही दिवसांपुर्वी तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. तेव्हा, लोकांच्या बांधावर जाऊन त्याने पंचनामे केले होते. डॉ. किरण लहामटे यांनी शहराच्या विकासासाठी 14 कोटी रुपयांचा निधी आणला आहे. त्याचे वितरण करण्यासाठी सर्वे करताना प्रत्येक प्रभागात न्यायात्मक भूमिका त्याने मांडली आहे. त्याला जर काम करण्याची संधी मिळाली तर येथील रस्ते, हायमॅक्स, आरोग्य, वाघांची भिती, पावसाचे पाणी या सर्व समस्या तो शंभर टक्के सोडवेल यात शंका नाही. कारण, तो व्यक्ती म्हणून आपल्या कर्तव्याशी प्रमाणिक आहे. आज, प्रभाग 11 मध्ये महिला आरक्षण निघाले आहे. त्यामुळे, वंदना शेटे या उमेदवार आहेत. मला खात्री आहे. येथील शेटे बांधव आमच्या इतिहासाकडे पाहून वंदनाला बळ देतील. एका आमदार व गायकर पाटलांचा विश्वास म्हणून तो प्रभागातील 802 मतदारांच्या शब्दास बांधिल राहिल यात मला तिळमात्र शंका नाही.