प्रपोज मारायला तो नवी कोरी पिकअप घेऊन गेला आणि पेढ्यांचा बहाणा करुन ज्युसमध्ये गुंगीचे औषध पाजून अत्याचारच करुन आला, ती शुद्धीवर येताच ठोकला गुन्हा.!

 

सार्वभौम (अ.नगर) :-

                               आजकाल प्रेम आणि वासना नेमकी कोणत्या थराला जातील याचा काही नियम नाही. मुळात आपण एद्यावर प्रेम करतोय की वासनेची भूक भागविण्यासाठी अनैतिकतेची पातळी गाठतोय.! हेच कळायला तयार नाही. असाच एक घानेरडा प्रकार नगर शहरात उघडकीस आला आहे. कारण, नुकतीच ओळख झालेल्या एका तरुणीशी बळजबरीने प्रेमाचे संबंध प्रस्तापित करु पाहणाऱ्या तरुणाने मुलीला भेटण्यासाठी नव्या पिकअपचा बहाणा केला. तर पेढे देण्याच्या नावाखाली तिला ज्युस पाजून तिच्यावर अत्याचार केला. जेव्हा मुलगी शुद्धीवर आली तेव्हा आपल्यासोबत असा काही प्रकार घडला आहे. हे समजले आणि ती भान हरपून गेली. ज्या व्यक्तीवर विश्वास ठेऊन बाहेर पडलो त्याने अशा पद्धतीने घात केला. हेच याचे प्रेम का ?  याला खरोखर प्रेमाच्या संकल्पनेत बांधता येईल का? असे अनेक प्रश्न तिच्यापुढे उभे राहिले आणि त्यानंतर, सुरु झाला या मुलाचा पडता काळ.! घडला प्रकार आपल्या पाल्यास कथन केला आणि त्यांनी पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी नगर शहरात राहणाऱ्या मुलीने कोतवाली पोलीस ठाण्यात राहुल शिवाजी वाकळे (वय २८, रा. कौठे बु, ता. संगमनेर, जि. अ.नगर) याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील कौठे बुद्रुक येथे राहणाऱ्या राहुल वाकळे या तरुणाची नेवासा तालुक्यातील एका तरुणीशी २०२१ मध्ये वरवर ओळख झाली होती. तरुणी नगर शहराती कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हल्ली राहत असून यांचा काही काळापुरता एकमेकांशी संबंध आला होता. नजरा नजर नंतर यांचे एकमेकांना मोबाईल नंबर मिळाले होते. तेव्हापासून हाय हॅलो देखील सुरु हाेते. मात्र, लॉकडाऊनमुळे यांना देखील काही बंधने होती. हे असे असले तरी यांच्यात केवळ आणि केवळ मैत्री होती. असे मुलीकडून लक्षात येते. मात्र, वाकळे याचे प्रेम फारच उतू चालल्याने त्याने तिला भेटण्याचा निर्धार केला आणि भेटीचे अवचित्य काय होते.! तर, त्याने एक नवीन पिकअप घेतली आणि त्याचे पेढे द्यायचे म्हणून त्याने तिला साद घातली. मात्र, तिचे टायटल क्लेअर होते. तिने त्यास भेटण्यालस नकार दिला. मात्र, आपण विळद घाट किंवा एखाद्या हॉटेलात भेटूया असे म्हणून तो तिला विनंती करीत होता. परंतु, हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.

           दरम्यान, याने केलेल्या विनंतीला तिने भिक घातली नाही. त्यामुळे, पिकअपचा आनंद आणि भेटण्याची जिद्द घेऊन त्याने तिच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. आता, हाताने ओढून येणारा राडा तिला परवडणारा नव्हता. त्यामुळे, तिने घरी काही प्रश्न निर्माण होण्याऐवजी त्याला बाहेर थांबविणे पसंत केले. मात्र, हा बहाद्दर पुर्वीच फुल तयारीत आलेला होता. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्याने येताना एका हॉटेलातून ज्युस आणले होते. त्यात गुंगिचे औषध असल्याची जरा देखील कल्पना नव्हती. त्यामुळे, पेढे घेतल्यानंतर त्याने आणलेले ज्युस पिल्यानंतर काही क्षणात गुंगी आली होती. त्यामुळे, विळद घाटात निर्जनस्थळी काहीच सुचले नाही. या दरम्यान, भूरळ आल्यानंतर जे काही घडले ते फार विचित्र आणि धक्कादायक तथा मानुसकीला काळीमा फासणारे होते. कारण, या गुंगितच त्या तरुणीवर अत्याचार करण्यात आला. जेव्हा सर्व काही झाले त्यानंतर हिची भुरळ कमी-कमी होत गेली. तेव्हा आपला विश्वासघात झाल्याचे तिच्या लक्षात आले. तिला या प्रकाराचा प्रचंड मनस्ताप झाला. त्यामुळे, तिने त्यास जाब देखील विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे उत्तर निरर्थक होते.

               जेव्हा हा प्रकार या तरुणाने केला. तेव्हा यास माहित होते. की, येणाऱ्या काळात हा प्रकार आपल्याला जड जाऊ शकतो. त्यामुळे, तरुणीचे तोंड बंद करण्यासाठी त्याने तिचे काही अश्लिल फोटो देखील आपल्या मोबाईलमध्ये काढून ठेवले होते. जेव्हा तरुणीने त्यास जाब विचारला तेव्हा तो  म्हणाला की, माझे काम झाले आहे. मी तुमे फोटो देखी काढून ठेवले आहेत. मी या फोटोचे काही एक करणार नाही. परंतु, जर तू या घडलेल्या घटनेबद्दल वाच्चता केली. तर, आज काढलेले फोटो कधाही सोशल मीडियावर व्हायरल होतील हे लक्षात ठेव. अशा प्रकाराची धमकी देखील याने तिला दिली. मात्र, तरी देखील ही पीडित तरुणी पुढे आली. तिने घडला प्रकार आपल्या पाल्यास सांगितला. त्यानंतर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.  या घटनेचा तपास करताना पोलीस उपाधिक्षक अनिल कातकडे यांनी एक विशेष पथक नेमले होते. त्यात पोलीस निरिक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश कवाष्टे, अभय कदम, संतोष गोमसाळे, योगेश भिंगारदिवे, दिपक रोहकले, नितीन शिंदे यांनी थेट संगमनेर गाठले आणि आरोपी राहुल वाकळे यास गावातून अटक केली आहे. याप्रकरणी त्यास पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास कातकडे करीत आहेत.