...अखेर राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस स्वबळावर.! रात्रभराच्या मॅरेथॉन बैठका निष्फळ.! भाजपला फायदा.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
अकोले नगरपंचायत निवडणुक लागल्यापासून महविकास आघाडी करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी गोळाबेरजेचे गणित सुरू केले होते. मात्र, यांच्यातील ताणाताणीचा सावळा-गोंधळ इतका टोकाचा वाटला की, यांना खरोखर महाविकास आघाडी कराची आहे की नाही? असा संशय निर्माण झाला आहे. कारण, काल रात्री अगदी रात्रभर एकापाठोपाठ बैठका सुरू होत्या. सर्वांनी एकत्र गुलाबजामचा अस्वाद घेतला. मात्र, यांच्यात गोडी का निर्माण झाली नाही.! म्हणजे सत्ता आणि राजकीय स्वार्थ हा किती तिखट असतो, याची प्रचिती काल पहायला मिळाली. राष्ट्रवादीने मोठ्या भावाची भुमीका पार पाडताना काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या अवाजवी किंवा असमाधानकारक मागण्या असल्याचे राष्ट्रवादीला त्यांची बोळवण करताना नाकिनव आला आहे. त्यामुळे, किमान आज सकाळी तरी यांच्यातील वाटाघाटींना यश येईल असे वाटत होते. मात्र, शिवसेना त्यांच्या 5 जागांवर तर काँग्रेस 7 जागांवर अडून बसली. त्यामुळे, यांच्यात एकवाक्यता झाली नाही. परिणामी आज भाजप-रिपाई वगळता कोणाची युती झाली नसून केवळ सत्तेच्या लालसेपोटी महाविकास आघाडीने स्वतंत्र्य चुल मांडण्याची भुमिका घेतली आहे. या संदिग्ध राजकारणामुळे, शहरात वेगळा संदेश गेला असून यांच्यातच एकवाक्यता नसल्याचे पहायला मिळाले आहे. त्यामुळे, वैभव पिचड आज यांच्या भोंगळ कारभाराला पाहून निवांत झोपणार आहे. अशा प्रकारची चर्चा शहरात सुरु होती.
याबाबत सविस्तर माहिती की, गेल्या कित्तेक निवडणुकांमध्ये पिचड कुटुंबाला अनेकचजण फॉर झाल्याचे इतिहास सांगतो. त्यामुळे, महाविकास आघाडीत काही नेत्यांवर आजही शंका उपस्थित होते. त्यामुळे, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील काही नेत्यांकडे पाहताना अनेकांचे डोळे तिरके होताना दिसतात. तर, नगरपंचायतीच्या निवडणुकीत देखील अशा प्रकारचे काही कार्यकर्ते देखील फुटीर असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे, महाविकास आघाडी होऊ नये यासाठी काही लोक कार्यरत असल्याचे बोलले जात आहे. विशेषत: महाविकास आघाडीत जे काही आतृप्त आत्मे आहेत. त्यांची ही दुटप्पी भुमिका किंवा गुप्तहेराचे काम काही कार्यकर्ते चोख पार पाडत आहेत. त्यामुळे, काही चाली खेळताना भाजपला सोपे जाऊ लागले आहे. इतकेच काय.! भाजपच्या काही नेत्यांनी काँग्रेस आणि अन्य काही उमेदवारांची कागदपत्रे देखील पळविल्याच्या घटना समोर आल्या होत्या. मात्र, राडा झाल्यानंतर त्यावर विरजन पडले. म्हणजे, युक्ती, निती, साम, दाम, दंड, भेद अशा पद्धतीने तालुक्यातील राजकारण रुढ होऊ पाहत आहे.
आता, महाविकास आघाडी व्हावी यासाठी डॉ. किरण लहामटे यांचे अतोनात प्रयत्न सुरू आहे. तर, डॉक्टरांना नामोहरम करुन त्यांच्यात गोटात राहुन त्यांच्यावर गुप्त वार करणार्यांची संख्या तथा एक गट नांदतो आहे. त्यामुळे, ज्या काही जागा निवडून येणार नाही. त्यांच्यामागे जनाधार नाही, अशा जागांसाठी काही लोक अग्रह धरताना दिसून येत आहेत. त्यामुळे होईल असे की, राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त जागा पडतील आणि आमदार तालुक्यात यशस्वी कसे नाहीत. हे दाखविण्याचे षडयंत्र त्यांच्याच गोटात असणारे काही नेते करु लागले आहेत. त्यामुळे, आमदारांनी आपले कोण आणि परके कोण? निवडून येणारे कोण आणि आमदारांना खाली पहायला लावणारे कोण? याचा अभ्यास करुन उमेदवार दिले पाहिजे. तर सर्वात महत्वाचे म्हणजे, विश्वासू, अभ्यासू व निष्ठांवंत व्यक्तींच्या हातात ही यंत्रणा देऊन एक समांतर टिम उभी करणे अपेक्षित आहे. उगच कोणाचे ऐकूण जर त्यांनी निर्णय घेतले तर त्यांना येणार्या काळात पराभवाला सामोरे जावे लागले. हे देखील त्यांनी विसरता कामा नये.
आता महत्वाची गोष्ट म्हणजे, नगरपंचायतीच्या निवडणुकीत भांगरे यांनी देखील आपला हस्तक्षेप वाढविला आहे. त्यामुळे, सिताराम पाटील गायकर यांनी थोडे मागे पाऊल टाकल्याचे दिसते आहे. कारण, ज्यांनी शब्द अपशब्दांनी त्यांची आब्रु हकनाक चव्हाट्यावर मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबत हितगुज करणे आणि त्यांच्या शब्दांना पोटात घालणे हे गायकर पाटलांना न जमनारे आहे. म्हणून, आमदार साहेब त्यांच्यावर जी काही जबाबदारी देतील, ती फक्त पार पाडताना गायकर साहेब दिसत आहेत. आता या निवडणुकीतील सत्य असे की, राष्ट्रवादीत जे काही उतावळे व स्वत:ला विद्वान समजणारे नेते आहेत. त्यांच्या भरोशावर आमदार साहेब बसले तर उद्या पराभवाला सामोरे जायची वेळ त्यांच्यावर येऊ नये.! त्यामुळे, या संपुर्ण प्रक्रियेतील अगदी ध्रुवतार्यासारखी अढळ गोष्ट अशी की, जोवर सिताराम पाटील गायकर हे संपुर्ण ताकतीने जोवर सवर्र् यंत्रणेत उतरत नाहीत. तोवर, राष्ट्रवादीवर पराभवाचे सावट असणार आहे. इतकेच काय.! सन 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे भाजप हवेत गेली होती. तशी, आज राष्ट्रवादी हवेत गेली तर हाती पराभव सोडून काही लागणार नाही. त्यामुळे, आमदारांनी प्याद्यांच्या नादाला न लागता आता वजिर हलविणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
खरंतर, महाविकास आघाडीत नको तो हस्तक्षेप जास्त झाल्याने जागा वाटपाचा तिढा ताणला गेला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील हवा देणारे काही लोक पक्षात आहेत. परंतु, दुर्दैव इतकेच की, भाजपला सर्वांनाच नमवायचे आहे. मात्र, माघार घ्यायला कोणी तयार नाही. आज काँग्रेसने त्यांच्या भुमिका स्पष्ट केल्या आहेत. आम्ही आघाडी करण्यासाठी तयार आहोत. मात्र, सन्मानाच्या जागा हव्यात. अन्यथा वेळ आली तर स्वबळावर लढण्यास तयार आहे. अशा पद्धतीची त्यांची भुमिका आहे. त्यामुळे, काँग्रेस सोबत नाही आली तर शिवसेनेला आधिक जागा देऊन राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात युती होईल. यात तिळमात्र शंका नाही. तर, काँग्रेसच्या या ताठर भुमिकेला राष्ट्रवादीचे वरिष्ठ देखील कंटाळले असून त्यांनी स्थानिक नेत्यांना एक संदेश देखील दिला आहे. त्यामुळे, आता काँग्रेस युतीबाबत वरवर चर्चा होऊ शकते. मात्र, त्यांना फार काही फोर्स होईल, असे वाटत नाही. आता मधुभाऊ हे त्यांच्या जागेवर कितपत बरोबर आहे. हे त्यांना त्यांची ताकद किती आहे. हे माहित असल्याने त्यांचा अग्रह असेल. मात्र, शिवसेनेला त्यांच्या मनाजोग्या जागा, काँग्रेसला त्यांच्या मनाजोग्या जागा आणि राष्ट्रवादीला उरीसुरीच्या जागा. त्यामुळे, त्यांचा पराभव झाला तर आमदारांच्या नावे बोंबा ठोकणारे लोक काही कमी नाहीत. त्यामुळे, गायकर साहेब आणि आमदार साहेब या दोघांनीच एकत्र बसून अंतीम निर्णय घेतला पाहिजे. असे अनेकांचे मत आहे, त्यावर आमदार साहेब काय भुमिका घेतात हे पाहणे महत्वाचे आहे.