एकमेकांच्या अंडरपॅन्टी काढणार्‍या हले आता एकमेकांचे मुके घेत आहेत डॉ. लहामटेंची माजी मंत्र्यांसह भाजप नेत्यांवर टिक



सार्वभौम (अकोले) :-

                    अकोले नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपच्या काही नेत्यांनी गुजरी मार्केट येथे विकासावर न बोलता वैयक्तीक पातळीवर टिका टिपण्णी केली. त्यामुळे, त्यास प्रतिउत्तर करताना आज डॉ. किरण लहामटे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील तोंडसुख घेत जशास तसे उत्तर दिले. यात डॉ. किरण लहामटे यांनी काही नेत्यांची नावे न घेता त्यांच्या इतिहासात घडलेल्या काही घटनांच्या आठवणींना उजाळा दिला. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राजे आणि झेडपी सदस्य यांच्यात जी काही अंडरवेअर काढाकाढी झाली होती. त्यानंतर ते एकमेकांशी गेली कित्तेक वर्षे बोलत नव्हते.! मात्र, आता पिचड भाजपमध्ये आल्यानंतर त्यांचे गुणगाण गात असून ज्यांनी अंडरवेअर काढल्या त्यांचे मुके घेत आहेत. अशा पद्धतीची सडोतोड टिका डॉक्टरांनी केली. तर, गेली 40 वर्षे तालुक्याचा विकास झाला नाही. या मुद्द्यावर पिचडांना टोला देत ते म्हणाले की, पिचड साहेब.! केसावर फुगे विकण्याचे काम डॉ. किरण लहामटे यांनी कधीच केले नाही....



खरंतर डॉ. आमदार किरण लहामटे हे जिल्हा परिषदेत लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत होते. तेव्हा त्यांच्यासोबत भाजपकडून त्याचे आणखी काही सहकारी झेडपीत होते. तेव्हा, ते सहकारी अनेकांकडून पाकीट घेत असे, हे डॉक्टरांना कधी सहन झाले नाही. तर त्यांच्या गलिच्छ राजकारणापायी जिल्हा परिषदेच्या तत्कालिन अध्यक्षा शालिनिताई विखे ह्या अक्षरश: रडल्या होत्या आणि आता हेच लोक थुकून चाटायला लागले आहेत अशी टिका डॉक्टरांनी केली. तर, गेल्या चार-पाच वर्षापुर्वी सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यात कोणाकडे गाड्या कशा आल्या, कोणाच्या कोठे जमिनी आहेत, तर कोणी कोणाच्या अंडरवेअर काढल्या हे त्यातून व्हायरल झाले होते. आता तेच लोक माझ्यावर टिका करु लागले आहेत. त्यामुळे, मला त्या क्लिपा वाजवायला लावू नका. खालच्या पातळीवर राजकारण व टिका टिप्पण्णी करण्यास तुम्ही सुरूवात केली आहे. त्यामुळे, आता गाठ माझ्याशी आहे. हिशोब होणार म्हणजे होणार अशा प्रकारची तंबी डॉक्टरांनी भाजप तथा त्यांच्या सहकारी विरोधकांनी दिली.

महाविकास आघाडी झाली नाही. याबाबत डॉक्टरांनी खंत व्यक्त केली. वेळ निघुन गेली तरी आम्ही काँग्रेसचे समाधान करु शकलो नाही. असे म्हणत काँग्रेस वगळता त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडे कौल मागितला. तर शहरात गेल्या पाच वर्षात भाजपला काही करता आले नाही. ना आरोग्याचा प्रश्न सुटला, ना नाना नानी पार्क झाला, ना गटारीचा प्रश्न सुटला ना रस्त्यांचा, ना प्रवरा स्वच्छ झाली, ना मानसे जाळण्यासाठी पाटील पांथा उभा राहिला. यांनी केवळ मानसे जळकीत पोहचवायला वैकुंठरथ तयार केलाय असे म्हणत डॉक्टरांनी पाच वर्षातील कामांची खिल्ली उडविली. तर, गेल्या पाच वर्षात शहरासाठी दोन कोटी निधी आणता आला नाही. त्यांनी विकासाच्या गप्पा का माराव्यात असे म्हणत त्यांनी माजी आमदारांना आपल्या टिकेच्या अजेंड्यावर घेतले. तर मी दोन वर्षाच्या आत 14 कोटींचा निधी शहर विकासासाठी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे, आम्ही विकासाचे राजकारण करतो, टिका टिपण्णी करुन मत मागत नाही असे ते म्हणाले. 

डॉक्टरांनी जो काही निधी आणला आहे. त्यावर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय आणि एमआयडीसी यांसारख्या मुद्यांचे भांडवर केल्याचे त्यांच्यावर आरोप झाले. त्यास उत्तर देताना ते म्हणाले की, सन 2023 ते 24 या कालावधित मी एमआयडीसी आणणार म्हणजे आणणार.! मी जेव्हा एमआयडीसीचा नारळ फोडेल, तेव्हाच मी शांत बसेल. तर गेल्या 40 वर्षापासून उपजिल्हारुग्णालयाच्या नावाखाली जनतेला यांनी भुलवत ठेवले. मात्र, साधा उपजिल्हा रुग्णालयाचा अहवाल देखील मंत्रालयातील आरोग्य विभागात सादर केलेला नव्हता. मला बे ऐके करावे लागले आणि नव्याने तो प्रस्ताव तयार करून आता मी पुर्णत्वास आणला आहे. त्यामुळे, जे काम गेल्या 40 वर्षात पिचडांना जमले नाही. ते उरलेले काम त्यांनी मला सोडले असून ते पुर्ण करण्यासाठी जनतेने मला निवडून दिले आहे. यांना जो पैशाचा माज आहे. तो आपल्याला उतरवायचा आहे अशा कठोर शब्दात आज भाजच्या कमळावर शब्दास्त्र सोडले.

यावेळी, जिल्हा बँकेचे सिताराम पाटील गायकर म्हणाले की, गेल्या 25 वर्षापुर्वी मला या शहराने फार प्रेम दिले आहे. तेव्हा जितु गुजर आणि अन्य नेत्यांनी मला येथून निवडून दिले होते. तेव्हापासून तर आजवर शहराचे प्रेम माझ्यावर राहिले आहे. त्यामुळे, मला खात्री आहे. की, येथील जनता कोणत्याही भुलथापांना बळी पडणार नाही. आम्ही पैशाच्या जोरावर नव्हे तर डॉ. किरण लहामटे यांच्या कर्तुत्वावर निवडूण येणार आहे. आम्हाला कोणावर टिका टिप्पणी करायची नाही. तर, एक सुंदर शहर उभे करायचे आहे. हाच ध्यास ठेऊन डॉक्टर लहामटे यांनी तालुक्याच्या विकासासाठी मंत्रीपद नाकारले आहे. दादांना त्यांनी सांगितले की, साहेब.! मला मंत्रीपद नको, पण माझ्या तालुक्यासाठी निधी द्या. असा अग्रह त्यांनी कायम धरला आहे. त्यामुळे, असा कर्तुत्ववान आमदार तुम्हाला कधी मिळणार नाही. त्यामुळे, कोण काय म्हणेल याकडे लक्ष देऊ नका. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा आर्थमंत्री, नगरविकास मंत्री हे सत्ता महाविकास आघाडीचे आहेत. त्यामुळे, शहराचा विकास करायचा असेल तर आमच्यावर विश्वास ठेवा असे आवाहन गायकर पाटील यांनी केली.