तो घाबरत-घाबरत बाईला म्हणाला, माझे तुझ्यावर प्रेम आहे, आपण पळून जाऊन लग्न करु.! मग काय.! ठोकला गुन्हा.!
सार्वभौम (संगमनेर) :-
मुझे तुझसे शादी करणी है, मै तुझसे बहुत प्यार करता हुँ, आपण दोनो भाग जाके शादी करेंगे असे म्हणत पीडित तरुणीस वेळोवेळी प्रेम करण्यास उद्युक्त करण्यात आले. मात्र,पीडित तरुणीने नकार देताच तिला शिवीगाळ करत मारून टाकण्याची धमकी देण्यात आली. ही घटना संगमनेर शहरातील श्रमिकनगर परिसरात बुधवार दि. 22 डिसेंबर 2021 रोजी रात्री 9 वा. तर गुरुवार दि.23 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 च्या दरम्यान घडली. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. के. यादव (रा. अश्वी, ता. संगमनेर) या तरुणाला आरोपी करण्यात आले आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अश्वी परिसरात पिडीत तरुणी व आरोपी हे आश्वी परिसरात राहतात. परंतु, काही कामासाठी पिडीत ही मुंबई येथे काही दिवसांसाठी गेली होती. ती मुंबईहुन संगमनेर शहरातील श्रमिकनगर परिसरात राहण्यासाठी आपल्या दोन बहिणींसह आली होती. मात्र, पिडीत महिलेचा पाठलाग करत आरोपी यादव हा दि. 22 डिसेंबर रोजी श्रमिकनगर परिसरातील पिडीत महिलेच्या घरी रात्री 9 च्या दरम्यान आला. तेथे दोन बहिणी घरी असताना तो पिडितेला म्हणाला की, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. माझे तुझ्यावर प्रेम आहे. आपण दोघे पळुन जाऊन लग्न करू असे बोलुन तो तेथुन निघुन गेला.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी 23 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास आरोपी यादव हा पुन्हा श्रमिकनगर येथे येऊन पिडीत तरुणीच्या बहिणीसमोर म्हणाला की, मुझे तुझसे शादी करणी है, मै तुझसे बहुत प्यार करता हु, आपण दोनो भाग जाके शादी करेंगे.! असे आरोपी म्हणताच पिडीत तरुणी म्हणते की, मेरी शादी हो गई है, तेरी वजहसे मेरी जिंदगी बरबाद हो गई.! असे पिडित महिला म्हणताच आरोपी संकेत यादव म्हणाला की, तु परत अश्वी येथे यायचे नाही. आली तर तुला मारून टाकीन अशी धमकी देऊन शिवीगाळ करून तो तेथुन निघुन गेला. त्या अगोदरही आरोपी संकेत यादव याने अश्वी येथे असतानाही पिडित तरुणीला फोनवर बोलत जा. पिडित तरुणीने समजावुन सांगितले असता आरोपीने लग्न करायचे म्हणुन वारंवार त्रास दिला व लज्जा उत्पन्न होईल अशी शिवीगाळ केली. त्यामुळे, पीडित महिलेने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपी यादव याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.
दरम्यान, एकतर्फी प्रेमातून अनेकांचे आयुष्य बरबाद झाले आहेत. तर, अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे, प्रेमाला वय नसते तरी अक्कल असली पाहिजे, प्रत्येकाने सदसद विवेेक बुद्धीचा वापर केला पाहिजे. प्रेम म्हणजे कोणाला बरबाद करणे नव्हे, कोणाला उध्वस्त करणे नव्हे किंवा कोणाच्या संसारात विष कालविणे नव्हे. त्यामुळे, प्रेम ही संकल्पना प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे. अपंग करणे नव्हे तर समोरच्या व्यक्तीला ताकद देणे होय. त्यामुळे, कोण्या एका व्यक्तीचे नव्हे तर संपुर्ण समाजाचे समुपदेशन करणे आवश्यक झाले आहे. (समुपदेशक)