पोटच्या मुलीला आईचा मित्र छेडतोय आणि ती म्हणते तो मजाक करतोय.! मुलीने आईसह केला तिच्या मित्रावर गुन्हा दाखल.!

सार्वभौम (संगमनेर) :-

                 आईच्या मित्राने तिच्या मुलीवर देखील डोळा ठेवला.! मात्र, ही असली फालतुगीरी मी खपून घेणार नाही. असे म्हणत त्या मुलीने त्यास चांगलाच धडा शिकविला. हा निर्लज्ज माणूस माझ्या कंबरेत हात लावतो आहे. माझ्याशी अश्लिल चाळे करु पाहत आहे. असे पीडित तथा अल्पवयीन मुलीने आपल्या जन्मदात्या आईस सांगितले असता तिने उत्तर दिले की, तो मजाकमधे करतो आहे. त्यानंतर मात्र, या बालिकेन थेट आपल्या जन्मदात्याकडे धाव घेतली आणि आपल्या आईसह तिच्या मित्रावर देखील गुन्हा दाखल केला आहे. ही धक्कादायक व समाज व्यवस्थेला काळीमा फासणारी घटना दि. 5 आक्टोबर 2021 रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास संगमनेर शहरातील गुंजाळवाडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीनुसार दोघांवर गुन्हा नोंंदविला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर शहरातील इंदिरानगर परिसरात एक कुटुंब राहत होते. त्यांच्या लग्नानंतर गेली काही वर्षे सर्व काही अलबेले होते. त्यानंतर त्यांना दोन मुली देखील झाल्या होत्या. मात्र, काही शंका आणि मतभेद यामुळे दोघे अलिप्त झाले. त्यानंतर हा पुरुष इंदिरानगर येथेच राहत होता. तर त्याची पत्नी आणि दोन मुली ह्या गुंजाळवाडी परिसरात राहु लागले. तेथे ज्या व्यक्तीच्या घरात राहत होते. त्यांच्याशीच या महिलेशी चांगली मैत्री झाली आणि त्यांची उठबस नियमितची होऊ लागली. इथपर्यंत सर्व काही ठिक होते. मात्र, या महाशयांचे चाळे अधिकच वाढत गेले आणि त्यांनी आपल्या मैत्रीणिच्या मुलीशी अश्लिलपणाचे वागणे सुरू केले. मात्र, हा प्रकार 16 वर्षे 3 महिने झालेल्या मुलीस समजणार नाही असे म्हणणे अयोग्य ठरेल. त्यामुळे, हा व्यक्ती कोणत्या हेतून आपल्याला जवळ घेतो आहे. याच्या मनात काय चालले आहे, याची नजर काय शोधते आहे. याबाबत तिला कल्पना आली होती.

दरम्यान तीने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आम्ही ज्याच्या घरी राहतो तो व्यक्ती घरी आई नसली की घरात येतो. माझ्या अंगाला वाईट उद्देशाने हात लावतो. हे मला जाणवले असता, मी ते आईला सांगण्याचा प्रयत्न केला. तीने त्यास समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आईच्या बोलण्याने त्यास राग आला आणि त्यास आईला मारहाण देखील केली होती. त्यानंतर त्याच आईने आपल्या मुलीस समजून सांगितले की, त्यांच्या हात लावण्याचा उद्देश काही नाही. त्यामुळे, तू गैरसमज करुन घेऊ नको. तो मजाकमध्ये तुला असे करतात. त्यानंतर मी समजुन घेतले होते. परंतु, 5 आक्टोबर 2021 रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास मी घरात एकटीच होते. तेव्हा आईचा मित्र आला आणि त्याने कंबरेत हात घालुन मान खाली वाकविली. तर तो वाईट वागु लागला, माझ्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला. याहुन मी त्यास बोलले असता त्याने माझ्याशी हुज्जत घातली आणि त्याने मला व माझ्या बहिनिला ठार मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, फिर्यादीत तिने म्हटले आहे की, हा प्रकार मला फार मानसिक त्रास देत होता. त्यामुळे, आई आणि त्या मानसाच्या डोळ्यासमोर राहणे मला असहाय्य झाले होते. त्यामुळे, मी आता माझ्या वडिलांकडे इंदिरानगर येथे आले आहे. आरोपीच्या कृत्यापासून आजवर मला फार मानसिक त्रास झाला आहे. त्यामुळे, त्याच्या दबावापोटी मी काही एक बोलले नाही. मात्र, आता वडिलांंकडे आल्याने माझ्यावरील दबाव कमी झाला असून माझ्याशी अश्लिल कृत्य करण्याचा प्रयत्न करणार्‍याला धडा शिकविला पाहिजे यावर मी ठाम झाले आहे. कारण, माझ्याबाबत असा प्रकार घडला तो अन्य कोणाबाबत घडू नये यासाठी मी फिर्याद देत आहे. असे म्हणून तीने आपली आई आणि तिचा मित्र अशा दोघांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकीता महाले करीत आहेत.