लोकं मेली तर जळकीवर न्यायला रस्ता नव्हता.! तेव्हा वडजे कोठे होते? हे आयात उमेदवार आम्हाला नकोच.! प्रभाग आठचा गुलाल उधळला.!
सार्वभौम (अकोले) :-
अकोले नगरपंचायतीच्या निवडणुकीत बड्याबड्या व्यक्तींच्या प्रतिष्ठीत पणाला लागल्या आहेत. त्यामुळे, त्यांच्या डोळ्याला डोळा लागेनासा झाला असून त्यांच्यासाठी रात्र वैर्याची ठरली आहे. यात नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, भाजपच्या उपजिल्हाध्यक्षा यांच्यासह अनेकांच्या झोपा उडाल्या आहेत. त्यामुळे, राष्ट्रवादीच्या सामान्य उमेदवारांनी अनेकांची पळता भुई थोडी केली आहे. यात राष्ट्रवादीने बाळासाहेब वडजे आणि परसराम शेळके यांना मात्र फारच अजेंड्यावर घेतलेले दिसते आहे. तर, आमदार किरण लहामटे म्हणाले की, यांचे जर डिपॉजीट जप्त केले. तर, या तालुक्याने मला पालत्व दिले आहेच. मात्र, मी प्रभाग क्र. 8 व प्रभाग क्र. 17 हे दत्तक घेईल. अशा प्रकारचे उद्गार काढताच पानसरवाडी येथे एकच जल्लोष झाला आणि तेथे नागरिकांनी वचन देखील दिले आहे. त्यामुळे, वडजे आणि शेळके यांच्या पायाखालची वाळु सरकली आहे.
आता, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे हे प्रथम प्रभाग क्रमांक नऊमध्ये नगसेवक झाले होते. मात्र, तेथे महिला राखीव झाली आणि त्यांनी आठ नंबरमध्ये उडी मारली. हा त्यांचा पहिला तोटा होता. कारण, त्यांनी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये त्यांनी पत्नी उभी केली असती तर त्या निवडून आल्या असत्या. परिणामी माळी बांधवांचे नगरपंचायतीत प्रभाग क्र. 1, प्रभाग क्र 9 आणि प्रभाग क्र. 8 असे तीन उमेदवार गेले असते. मात्र, त्यांनी तसे न करता वैयक्तीक हितसंबंध जोपासत समाजाचा तोटा केला आणि स्वत:च्या स्वार्थापोटी नऊ प्रभाग सोडून आठमध्ये एन्ट्री केली. जेथे त्यांनी नगराध्यक्ष असताना देखील कवडी मोलाचे काम केले नाही. मग, निवडणुक आली की यांना समाज दिसतो. मात्र, मोठमोठी पदेे मिळाल्यानंतर पाच वर्षे त्यांना समाजाचा विसर पडतो. हे फार मोठे दुर्दैव आहे. अशा प्रकारचा प्रतिक्रिया शेकईवाडीतून उमटू लागल्या आहेत.
खरंतर वडजे यांनी एक समाज म्हणून केवळ प्रभाग क्रमांक नऊ चा विचार न करता संपुर्ण शहराचा विचार करून शेकेईवाडीसह माळीझाप यांचा देखील विचार करणे अपेक्षित होते. मात्र, असे झाले नाही. अखेर शेकेईवाडी तथा प्रभाग क्रमांक आठचा विकास करण्यासाठी अशोक गायकवाड यांनी आमदार महोदयांचे उंबरे झिजवावे लागले. म्हणजे, सामाजाचा माणूस मोठा झाला मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे, आपलेच दात आणि आपलेच ओठ.! बोलणार तरी काय? त्यामुळे, आजवर वडजे यांच्याबाबत झाकली मुठ सव्वा लाखाची अशा प्रकारची भुमीका होती. मात्र, त्यांनी स्वत:चा प्रभाग दुसर्याला बहाल करून समाजाची जागा आडवू पाहिली आहे. त्यामुळे, ज्या अशोक गायकवाड यांनी आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या माध्यमातून विविध कामांसाठी तब्बल एक कोटी रुपयांचा निधी मंजुर केला. त्यांना तेथील जनता कशी विसरु शकेल? असा प्रश्न प्रभाग क्रमांक आठची जनता विचारत आहे.!
प्रभाग क्रमांक आठमध्ये आ. लहामटे यांनी जवळपास एक कोटी रुपयांची निधी दिली आहे. त्यात आठशे मिटर लांबीचा रिलायन्स पेट्रोल पंप ते शिंदे मळा रस्ता, बंधिस्त गटारी, पावसाचे पाणी शाळेत जात होते, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पाचशे मिटर गटार, शाळेसाठी इमारत, स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता असे अनेक प्रकारची कामे आमदार निधीतून मंजूर केली आहेत. तर, या सर्वांची रक्कम ही 90 लाख रूपयांपर्यंत जाते. त्यामुळे, अवाघ्या दोन वर्षात अशोक गायकवाड यांच्या पाठपुराव्यातून एक कोटी रुपये मिळू शकतात. तर, ते नगरसेवक झाले तर शेकईवाडीचा किती विकास होईल.! याची कल्पना नागरिक आणि सुज्ञ मतदारांनी केली पाहिजे. कारण, बवाल खडा करणा हमारा मक्सद नाही.! तस्वीर बदलनी चाहिऐं.! त्यामुळे, वडजे उपनगराध्यक्ष असताना मुलांच्या शाळेत पाणी जात होते. ते त्यांना दिसले नाही. आपल्या समाजाची मानसं मेली तरी त्यांना जाळण्यासाठी जळकीवर नेता येत नव्हते, तेव्हा वडजे कोठे होते? असे अनेक प्रश्न आता सुज्ञ मतदार विचारू लागले आहेत..
आता प्रभाग क्रमांक आठमध्ये राष्ट्रवादी, बंडखोर शिवसेना, मनसे आणि भाजप अशी चौरंगी लढत आहे. येथे एकुण मतदान 1046 असून माळी त्यात गायकवाड 70 ते 80 टक्के आहेत, मराठा 80, ताजणे, 80, शिंदे 70 मुस्लिम 26, ब्राम्हण 20 तर नवीन कॉलन्यांमध्ये महालक्ष्मी, मथुरानगर, दुधगंगा अशा काही ठिकाणी अडिचशे मतदान आहेत. यात बंडखोर शिवसेनेचे मतदान वैयक्तीक मतभेदामुळे राष्ट्रवादीला होईल असे चित्र नाही. तर, मनसेची उमेदवार भाजपसाठी घातक ठरणारी असेल. त्यामुळे, येथे मतांची फार काही तफावत दिसून येत नाही. त्यामुळे, अशोक गायकवाड यांचे काम आणि आमदारांची साथ तथा त्यांची समाजाप्रती असणारी आत्मियता हीच त्यांचे पारडे जड करुन जाणार असल्याचे बोलले जात आहे. तर, प्रभाग क्र. 9 मधील आयात उमेदवार आठमध्ये चालणार नाही. अशा प्रकारची साद शेकईवाडीतून आमदारांना मिळाली आहे. त्यामुळे, अशोक गायकावाड यांच्यावर डॉ. लहामटे यांच्यावर गुलाल उधळला आहे.