तीन वर्षात अकोले शहराला 50 ते 60 कोटी रुपयांचा निधी देणार, अन्यथा पुन्हा मते मागणार नाही - हसन मुश्रीफ

 


- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :-

                  आ.डॉ. किरण लहामटे हे अकोले शहराच्या विकासासाठी जो काही शब्द देतील, तो माझ्यासाठी प्रमाण आहे. त्यामुळे, त्यांनी शहरासाठी तीन वर्षात 50 ते 60 कोटी रुपयांच्या निधिची मागणी केली आहे. त्यामुळे, मी त्यांच्या पाठीशी अगदी पहाडासारखा उभा आहे. येणार्‍या काळात मी तो अकोल्यासाठी उपलब्ध करुन देईल. जर असे झाले नाही. तर, पुन्हा अकोल्यात तुमच्याकडे मत मागण्यासाठी येणार नाही. अशा प्रकारचे अश्वासन नगर जिल्ह्याचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. ते अकोले नगरपंचायतीच्या प्रचार सभेत बोलत होते. ते माजी मंत्री मधुकर पिचड यांचे नाव न घेता म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाने एका मानसावर प्रचंड प्रेम केले. मात्र, त्यांनी उतारवयात पवार साहेबांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे, आता त्यांना या निवडणुकीतून धडा शिकवायचा आहे. तर ओबीसी निर्णयाबाबत ते म्हणले की, भाजपने यास विरोध केला आहे. मात्र, तरी देखील आम्ही आकाश पाताळ एक करु आणि ओबीसी समाजाला आरक्षण देऊ..

ते पुढे म्हणाले की, अकोले तालुक्याला एक चांगला आमदार लाभला आहे. त्यांना स्वत:साठी काही नको, तर जे हवे ते जनतेसाठी हवे आहे. त्यामुळे, ते अकोले शहराच्या विकासाठी जे काही मागतील. ते आम्ही तुम्हाला देण्यासाठी कटिबद्ध आहोत. तर, त्यांनी त्यांच्या वचननाम्यात जे काही अश्वासने दिले आहेत. ते पुर्ण करण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी पहाडासारखे उभे आहे. ते म्हणाले की, भाजपच्या 2014-15 च्या काळात तुटपुंजा निधी होता. तर, आज महाविकास आघाडीच्या काळात त्यांनी पाच वर्षात दिला नाही तो निधी दोन वर्षात दिला आहे. विशेष म्हणजे येथे कोरोनाचे संकट देखील होते, तरी निधी कमी पडू दिला नाही. त्यामुळे, या निवडणुकीत कोणाला निवडून द्यायचे हे तुम्हीच ठरविले पाहिजे. जर, आम्ही दिलेला शब्द पाळला नाही. तर, पुन्हा येथे कधीच मत मागण्यासाठी येणार नाही असा विश्वास मुश्रीफ यांनी दिला.

डॉ. किरण लहामटे म्हणाले की, गेल्या पाच वर्षात अकोले नगरपंचायतीत निधी आणला नाही. त्यामुळे, शहराचा विकास राहून गेला आहे. या दरम्यान, भाजप आणि राष्ट्रवादी हे सभेत आमने-सामने झाले. तेव्हा डॉ. किरण लहामटे यांनी त्यांची आमदारकी विसरुन अगदी जोश धारण केला आणि राष्ट्रवादी की जय अशा प्रकारचा जयघोष सुरू केला. त्यास जनतेने देखील उदंड प्रतिसाद देत अक्षरश: लोकांनी डान्स सुरू केला. त्यानंतर विरोधकांना टोला देत डॉक्टर म्हणाले की, 2019 मध्ये आपण यांचा माज मोडला आहे. मात्र, उद्याच्या निवडणुकीत देखील आपल्याला तेच करायचे आहे. यांनी विकासाची भाषा कधी केली नाही. फक्त आरोप प्रत्यारोप केले आहे. रेशन बाबत माझ्यावर आरोप होत आहे. मात्र, जर त्या रेशनचा एक जरी तांदुळ चोरला असेल तर मी राजिनामा देतो. मी माझ्या प्रॉपर्टीचा हिसाब देतो, तुमची हिंमत आहे का? तुमच्या प्रॉपर्टीचा हिशोब देण्याची? अशा प्रकारे अगदी कडव्या भाषेत डॉक्टर विरोधकांवर बरसले.


ते पुढे म्हणाले की, मी भगवा घालतो याची अनेकांना अ‍ॅलर्जी आहे. परंतु, भगवा पेलायला जातीवंत हिरे लागतात, हिजड्यांची औलाद हे पेलु शकत नाही. मी भगवं घालतो कारण, हे भागवा शिवरायांचा आहे, हा भगवा पांडुरंगाचा आहे, हा भगवा गौतम बुद्धांचा आहे. त्यामुळे, जनतेला याची अ‍ॅलर्जी आहे. त्यात तुमचं दुखतं काय? यांनी उगच मला जातीयवादी ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. मी विकासाची भाषा करतो, कोणावर टिका टिप्पणी करीत नाही. मात्र, सुरूवात तुम्ही केली तर त्याला उत्तर देखील दिल्याशिवाय राहणार नाही. मात्र, तरी देखील त्यांना सांगु ईच्छितो की, आमच्याकडे गमवायला काही. आयुष्यात फक्त चारित्र्य कमविले आहे. त्यानंतर डॉक्टरांनी काँग्रेसच्या काही नेत्यांच्या देखील कानपिचक्या दिल्या. ते म्हणाले की, आदरणीय थोरात साहेब हे माझ्या आदरस्थानी आहेत. मात्र, येथील काही नेत्यांना माझ्याबाबत फार कान फुकले आहेत. हकनाक आमच्यात मतभेद निर्माण करुन दिले आहेत. हे उपद्वाप का? तर मी त्यांना राष्ट्रवादी पक्षात प्रवेश दिला नाही म्हणून हा प्रकार सुरू आहे.


सिताराम पाटील गायकर म्हणाले की, पाहिल्याच वेळी नगरपंचायतीची स्थापना झाली. तेव्हा जे काही नगरसेवक निवडून आले होते. ते सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते. मात्र, काल ते सगळेच भाजपला जाऊन मिळाले. आता तेच लोक पुन्हा भाजपकडून उभे राहिले आहेत, त्यांच्यावर या जनतेने विश्वास टाकावा तरी कसा? त्यामुळे, जनता त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. हे रंगबदलु लोक आहेत. पाटील यांनी पिचड यांचे नाव न घेता स्पष्ट केले की, जेव्हा पिचड आमदार होते. तेव्हा राज्यात भाजपची सत्ता होती. त्यामुळे, विकास होत नाही, निधी मिळत नाही असे म्हणून त्यांनी भाजपत प्रवेश केला. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे, भाजला देखील निधी मिळणार नाही. अर्थात त्यांना मत देऊन उपयोग तरी काय? कारण, निधी मिळणार नाही, विकास देखील होणार नाही. त्यामुळे, राज्यात मुख्यमंत्री आणि नगरविकासमंत्री शिवसेनेचा आहे तर उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री राष्ट्रवादीचा आहे. त्यामुळे, शहराचा विकास करायचा असेल तर आमच्या उमेदवारांनी मतदान करुन विजयी करा असे अवाहन त्यांनी केले आहे. तर, शेतकर्‍यांच्या मुलांनी भाजपला मतदान करताना पहिले केंद्रातले ते तीन काळे कायदे आठवा, शेकडो जणांचे बळी गेले. त्यांच्या स्मृती आठवा, मुस्लिम बांधवांनी देखील मतदान करताना सीसीए, एनआरसी हे आठविले पाहिजे असे मत पाटील यांनी व्यक्त केले.